Sunday, May 1, 2011

सावध,घरावर नजर

शाळा व काँलेजना  सुट्टी पड्ल्यावर मडंळी बाहेरगावी पर्यटनासाठी किंवा आपल्या गावी कॉटुंबीक कार्यक्रमासाठी जातत.तुमचे घर तुम्ही बंद करून जाता,तेव्हा कुणीतरी तुमच्या घरावर नजर ठेवून असू शकते.सावधान रहा.यासाठी आपण खबरदारी घेतो . तशीच आणखी एक खबरदारी घेणे गरजेची आहे : ती म्हणजे आपल्या घराची सुरक्षितता. उन्हाळा सुरू झाला की घरफोड्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते.पुरेशी काळजी घेतली नाहीत तर तुम्ही तिकडे सुट्टीची मौजमजा लुटत असताना इकडे तुमचा फ्लॅट लुटला जाऊ शकतो आणि तुमची आयुष्यभराची पुंजी तुम्ही गमावून बसू शकता.गतवर्षी तीन हजारांहून अधिक घरफोडीच्या घटना झाल्या व त्यापैकी केवळ ९०० प्रकरणांत मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागल्या होत्या असे पोलिसांचे म्हणणे आहे. घरफोड्यांवर आता दुष्काळी भागातून येणा-या समाजांची मक्तेदारी राहिली नसून परराज्यातील चोरटे आणि असंख्य बेरोजगार तरुण घरफोड्या करू लागले आहेत.

बाहेरगावी निघालेली बहुतांश मंडळी आपल्या कार्यक्रमाचा गाजावाजा करतात. सोसायटीत गप्पा मारताना, रेल्वे डब्यात मित्रमंडळींसोबत गप्पा छाटताना बरेचजण आपण कुठे, किती दिवस, कसे, केव्हा जाणार आहोत याची खुलेआम चर्चा करु नका.
फ्लॅटला असलेले सेफ्टी डोअर, मेन डोअर आणि घरातील बेडरूमचे दरवाजे यांच्या सुरक्षेवर आपला दांडगा विश्वास असतो. मात्र ही सुरक्षा कुचकामी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्यामुळे घराबाहेर पडणा-यांनी दागदागिने,चांदीची भांडी शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये जमा करावीत.घरांची लॅच , कुलपं , तिजोरीच्या चाव्या याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
 
र्बग्लर अलार्म आता सर्वत्र मिळतात. शक्य असल्यास ती सिस्टिम घरात बसवून घ्या. त्यामुळे चोर शिरलाच तरी आसपासच्या लोकांना ते कळू शकेल. तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर चालला आहात , याची माहिती नजीकच्या पोलिस स्टेशनला पत्र देऊन कळवा.चांगल्या दर्जाचे ' सीसीटीव्ही ' कॅमेरे किंवा दरवाजा उघडला गेला तर मोबाइलवर अलर्ट मेसेज येऊ शकणारी उपकरणे बाजारात आहेत . त्यांचा वापर करणे गरजेचे झाले आहे .
सोसायटीच्या वॉचमन हा आपल्याला फ्लॅटचा रखवाला वाटत असला तरी तो जुना, परिचित असेल तर ठीक, अन्यथा तोच घरफोड्या करणा-यांचा टिपर असू शकतो. त्यामुळे वॉचमनला आपल्या पर्यटनाची माहिती देताना पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.कमी पगार द्यावा लागतो म्हणून अनेकदा दुबळ्या आणि वयस्कर लोकांना वॉचमन म्हणून नेमले जातात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते निरुपयोगी असतात.

दरवाज्यात पडलेल्या पेपरमुळे चोराला सहज कळते की हा फ्लॅट बंद आहे . कुंड्यामध्ये पाणी टाकलेले नसल्याने झाडे सुकलेली असतात . अशा कुंड्यावरही चोरांचे बारीक लक्ष असते . घरात कोणी नसल्याचे परक्या व्यक्तीला सहजा सहजी कळणार नाही , याची काळजी घेणे गरजेचे आहे . 

टेहाळणी करणा-या संशय येउ नये यासाठी घरातील किमान एक दिवा सुरू ठेवावा.

शेजा-याना आपण कोठे व कीती दिवस जाणार आहात याची माहीती देण्याची गरज आहे व घरावर लक्ष ठेवण्यास सांगणे.

घरफोडी करणा-या टोळीतील काही सदस्य दिवसभर भंगारवाले,रद्दीवाले व आंब्याची पेटी घेऊन फिरतात.त्यावेळी बंद घरांची माहिती ते गोळा करतात.अशा वांरवार फिरणा-या  नवीन फेरीवाल्याची माहीती पोलिसाना द्या.सोसायट्यांच्या परिसरात फिरणारे फेरीवाले , कुरीअरवाले आणि कचरा गोळा करणा-यांकडे दुर्लक्ष करू नका.
संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.पणही सावधानता बाळगली पाहिजे. छोट्या छोट्या ट्रिक वापरून आपण चोरीला काही प्रमाणात पायबंद घालू शकलो तरच  सुट्टी मजेत घालवू शकतो.




No comments: