Wednesday, May 4, 2011

टाइपरायटर आता आठवणीच्या कोशात

टाइपरायटरची टकटक बंद होणार आहे. पूर्वी टायपिस्टची नोकरीला स्टेटस होते.तीच जर काय बँकेतली असेल तर मोठा मान होता.टायपिस्टची नोकरी हे मघ्यमवर्गीयांचे स्वप्न होते.मागच्या पिढीतील  अनेकांना या  टाईपरायटर  नामक यंत्राने सरकारी,निमसरकारी आणि खजगी नोक-या सहज मिळवून
दिल्या हे सत्य नाकारता येनार नाही.सत्तर व ऐशीच्या दशकात मँट्रीकची परिक्षा दिली कि मुले व मुली टाईपिंगच्या क्लास लावीत.बहुतेक नोकरी विषयक जाहीरातीत टाईपिंगची परिक्षा व स्पीड विचारलेला असे.टाईपिंगबरोबर त्याचा मोठा भाऊ शोभावा असा शाँर्टहँड नावाचा प्रकार असे व तो पास होणारे विद्यार्थ्यी मोठ्या मोठ्या कंपनीमघ्ये चांगल्या पदावर निवडले जात असत. टाईपिंग शिकलेल्या उपवर मुलींना लग्नाच्या बाजारात स्पेशल मागणी असे.

टाइपरायटर वापरताना त्यावरील अक्षरांच्या ' की ' ज दाबण्यासाठी अंगठा न वापरता इतर बोटे महत्त्वाची ठरली व अंगठ्याचा उपयोग फक्त ' स्पेस बार ' वापरण्यापुरताच राहिला.संगणकयुग सुरू होण्याआधी टायपिंगचं काम टाइपरायटरवर होत असे , हे आज सांगावं लागतं. कारण अलीकडे टाइपरायटर बघायला मिळणंही मुश्किलच झालंय. टाइपरायटरच्या जमान्यात एका पत्राची दुसरी प्रत इतर व्यक्तींना द्यायची असल्यास कार्बन पेपर लावून कार्बन प्रत (सीसी , म्हणजे कार्बन कॉपी) काढायची पद्धत होती.

    टायपिंग करण्यासाठी टाइपरायटर या यंत्राचीची गरज असते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजेच औधोगिक क्रांती झाल्यानतंर या यंत्राची महती वाढत गेली.त्या काळात व्यापर-व्यवसायासाठी पत्रलेखनाचे प्रमाण वाढल्याने टाइपरायटरच्या साहाय्याने एका मिनिटाला १३० शब्द लिहिता येऊ लागले.लिहिण्यातल्या वेगातील या क्रांतीचा माणसाच्या एक़ंदर प्रगेतीतही मोठा वाटा आहे.प्रत्येक आँफिसमघ्ये हा टाइपरायटर एक अविभाज्य घटक बनला आहे.विविध टप्प्यांवर अनेकांनी त्याच्या निर्मितीत आपले कसब,प्रतिभा, कल्पनाशक्ती लावून यंत्रामघ्ये बदल करीत व्यावसायिक पातळीवर उत्पादन केले. अनेकांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या  यंत्राला त्याचे स्वत:चे व्यक्तीत्व मिळणे ही मोठी गोष्ट होती.टाइपरायटरचा सर्वाधिक वापर हा प्रामुख्याने न्यायालयांत आणि सरकारी कार्यालयात झाला.अंध व्यक्तींसाठी ब्रेल टाइपरायटर होते.
   संगणकाच्या आगमनानतंर टाइपरायटरची सद्दी संपणार ही काल्य़ा दगडावरची रेघ होती. संगणकावर टायपिंग करता येत असल्याने टाइपरायटिंग करणाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली .व्यवसायिकाने या यंत्राचे उत्पादन बंद केलेल्याचे जाहिर केले आहे.एकेकाळी प्रचंड उपयुक्त्तता असलेली एक वस्तू तयार होणार नाही.जगाच्या बाजारपेठेतून कधीच हद्दपार झालेले टाइपरायटर आता भारतातूनही दिसेनासे होणार आहेत. एकेकाळी अहोरात्र टिकटिकणारा गोदरेज अँड बॉईस कंपनीचा मुंबईतील टाइपरायटरचा कारखाना मागणीअभावी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. टाइपरायटरच्या अस्ताने एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा इतिहास शब्दश: ‘शब्दबद्ध’ करणारा साक्षीदारच साथ सोडून चालल्याने जुन्या पिढीच्या माणसांना विषण्ण वाटेल. टायपिंइग करण्यासाठी वापरण्यात येणारा टाइपरायटर आता आठवणीच्या कोशात जाणार आहे.हे यंत्र आता आपल्या पुढच्या पिढिला म्युझियममघ्ये बधायला मिळेल.
कम्प्युटर आणि आता लॅपटॉपच्या काळात टाइपरायटर आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत . या टाइपरायटरवर पोट्रेट काढणे म्हणजे अतिशय अवघड काम असते.श्री.तळवलकर यांनी रेखाटलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे पोट्रेट  त्यांना भेट देण्याचा योग नुकताच आला.पोट्रेट पाहिल्यावर लतादीदींकडून मिळालेली कौतुकाची थाप हा आपल्यासाठी आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याची प्रतिक्रिया तळवलकर यांनी व्यक्त केली.  आपल्या  कारकिर्दीत त्यांनी सुनील गावस्कर,अमिताभ बच्चन,राजीव गांधी,स्मिता पाटिल अशा अनेक दिग्गजांची पोट्रेट काढली . 
     पुर्वी आर्थिक दुरवस्थेतून बाहेर पडण्यासाठी टायपिंगचा जोडधंदा करणा-या हातातला एक हुकमाचा
एक्का गेला. या टाइपरायटरसह काहीच्या  जुन्या आठवणी असतील.काहीची या टाइपरायटरच्या सबंधात आल्याने लग्नही जुळली होती.  ही मडंळी या यंत्राला कधीच विस्सरु शकत नाहीत.
     संगणक व मोबाईलच्या युगात टाइपरायटरला जागा नाही.पण याच टाइपरायटरचा किबीर्ड सगळीकडे वापरला जातो.

No comments: