ठाण्यात पाणीपुरी विक्रेत्याने केलेल्या किळ्सवाण्या प्रकाराने संतापलेल्या जनतेनी पाणीपुरी विक्रेत्यांविरोधात आंदोलन पुकारले होते.त्या विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवला गेला.काही लोकानी पाणीपुरी खाणे बंद केले. पण कित्येक वर्ष गटाराच्या पाण्यावर रेल्वेमार्गालगतच्या घाणीच्या जागेवर उगवलेली पालेभाजी मुबंईकर चवीचवीने खात आहेत.हि भाजी खाणे शरीराला अपायकारक आहे हे माहित असून देखील मुबंईकर शांत कसे? ह्या पालेभाज्या आरोग्यास हानीकारक असुनही या भाज्या पिकवून तथेच घाणेरड्या पाण्याच्या डबक़्यात घूवून बाजारत विकल्या जातात. पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.म्हणून पालेभाज्या चांगल्या धुवून घेत खाल्ल्या जातात पण त्या कुठे पिकवल्या जातात हे पाहिले जात नाही.हि पालेभाजी करणारी कुटुंब तेथेच राहुन तेथेच घाणही करतात.रासायनिक द्रव्ये.गँस, प्लासटिक,विषारी द्रव्ये व सांडपाणी असलेल्या पाण्यावर ह्या पालेभाज्यांचे पिक घेतले जाते.सांडपाण्याच्या गटाराच्या बाजुने जाताना नाक बंद करतो व त्याच पाण्यावरच्या पिकवलेल्या हिरव्या ताज्या भाज्या विना तक्रार बिंदघास्त खातो. नेहमीच स्वत:चे आरोग्य जपणारे मुबंईकर ह्या ताज्या पालेभाज्या वर्ज्य का करीत नाही त हे एक कोडे आहे.आरोग्य खाते या विषयी या भाज्यांचे उत्पादन बंद का करीत नाहीत.या पालेभाज्या खाल्ल्याने मुबंईकराना मोठे आजार बळावत आहेत. आपल्या आहारात पालेभाज्या असल्याच पाहिजेत. पण कोणत्या भाज्या कुणी खाव्यात, कुठे रुजलेल्या भाज्या खाऊ नयेत, हेही पाहायला हवे.हा गलिच्छपणा रेल्वेप्रशासनाने लवकरात लवकर थांबायला पाहिजे.
रेल्वे रूळांना खेटून वाढणा-या या भाज्यांचे मळे कोणत्या पाण्यावर पोसले जातात हे शोधलं तर पालेभाज्यांच्या पौष्टिकपणापुढे नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नाले आणि गटारांच्या पाण्यावर पोसलेल्या या ‘पौष्टिक’ भाज्यांमुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. लोकल प्रवासात हिरव्यागार पालेभाज्यांचा गालिचा सर्रास दिसतो. यात पालक, मेथी, चुका, लाल माठ, अळू, शेपू, मुळा, चंदन बटवा, चाकवत या भाज्या असतात. यापैकी बहुतेक मळे रूळांजवळून वाहणारी गटारे आणि नाल्यांतील सांडपाण्यावरच पोसले जातात. या भाज्या मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईत कमी किमतीत विकल्या जातात. सांडपाण्यातील नायट्रेट भाज्यांवाटे शरीरात गेल्यामुळे श्वसनाचे विकार जडतात. या भाज्यांतून शरीरात शिरकाव करणा-या अमिबासारख्या एकपेशीय जीवामुळे क्रॉनिक डिसेंट्रीसारखे विकार होतात.नाल्यांतून कारखाने, गृहसंकुलं, शौचालयांचं सांडपाणी वाहतं. त्यातील नायट्रोजन, फॉस्फरस, शिसं अशी विषारी द्रव्यं शरीराला अपायकारक ठरतात. शिसं आणि इतर जडधातू रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. नायट्रेट लालपेशींमध्ये प्रवेश करते. त्यामुळे प्राणवायूच्या पुरवठय़ात अडथळे येतात. या भाज्या खाणा-यांना श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अमिबासारखे एकपेशीय जीव मुळा किंवा गाजरांच्या केशमुळातून शरीरात जातात. त्यामुळे लहान मुलांना हगवण होण्याची शक्यता असते,भाज्या मुळांवाटे पाण्यातील अनारोग्यकारक द्रव्यं शोषून घेतात. विशेष म्हणजे ही द्रव्यं त्यांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. फुकट मिळणारं सांडपाणी आणि झटपट वाढणा--या भाज्यांमुळे या शेतक-यांची चंगळ होते. रेल्वे रुळाजवळील जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून नाममात्र शुल्कावर ही जागा शेतीसाठी दिली जाते. मात्र आरोग्यास हानिकारक ठरतील अशा भाज्या पिकवण्यासाठी तिचा वापर होत आहे.
सांडपाण्यावर वाढणा-या पालेभाज्या घातक आहे.
‘आहारात पालेभाज्यांचा समावेश भरपूर करावा..’ असा सल्ला नेहमीच दिला जातो पण पौष्टिक म्हणून मिरवणा-या या भाज्या प्रत्यक्षात कितपत पौष्टिक आहेत, हे पडताळून पाहणं गरजेचं आहे.
2 comments:
मला वाटत नैसर्गिक अस आता काही उरलंच नाही आहे .
kharach aapan sadhi chappal air conditioner dukanatun khredi karato aani roj khanari bhaji aswacha jagevar taklelya bhajichya dhigaryatun. GOOD POINT OF VIEWS
Post a Comment