Thursday, May 19, 2011

प्राइम टाइम का नाही?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची पताका लागली आता तरीही दजेर्दार मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्सेसकडून प्राइम टाइम का नाही? कितीही टुकार असले तरीही प्राइम टाइमची वेळ हिंदी सिनेमांसाठी मल्टिप्लेक्सेसकडून राखून ठेवली जाते पण महाराष्ट्र राज्यात दजेर्दार मराठी सिनेमांना प्राइम टाइम न मिळणे ही अत्यंत दुदैर्वाची बाब आहे.

मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्रदशिर्त होऊ लागला तरी त्याची उपेक्षा थांबलेली नाही. मल्टिप्लेक्सचालक प्राइम टाइमला मराठी चित्रपटास स्थान देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.थिएटरवाल्यांच्या या एकांगी धोरणामुळे उत्तम मराठी सिनेमे असूनही ते पाहण्यासाठी प्रेक्षकांसमोर मधल्या वेळेचाच पर्याय उरलाय.मराठी सिनेमांना प्राइम टाइम देण्यासाठी राज्य सरकारनेच मल्टिप्लेक्स मालकांना ठणकावून सांगितले पाहिजेत.

खूप वेगळ्या विषयांवरचे 'गजर', 'बालगंधर्व',' ता-याचे बेट','मस्त चाललंय आमचं', 'अरे बाबा पुरे' सिनेमे नुकतेच रिलीज झाले. हिंदीच्या तुलनेत जोरदार चर्चा असलेल्या या मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्सचा 'प्राइम टाइम' मात्र मिळालेला नाही.संध्याकाळी सातनंतर यातला एखादा मराठी सिनेमा बघावा असं प्रेक्षकांना वाटलं तर 'प्राइम टाइम'ला मराठी शो असलेलं थिएटर बारकाईने शोधावं लागतं.मराठी सिनेमे दजेर्दार नसतात असे थिएटरवाल्यांना वाटते.पण थिएटरवाल्यांनी प्राइम टाइम दिले तरच प्रेक्षक सिनेमाला येतील.

अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विविध प्रकारांत अकरा पुरस्कारांवर नाव कोरत मराठी चित्रपटांनी आणि कलावंतांनी आपली मुद्रा उमटविली आहे. ' बाबू बँड बाजा' या चित्रपटाला पदार्पणातील दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला असून, या सिनेमाने या प्रकारातील सुवर्णकमळही मराठीच्या नावावर केले आहे. सरोगसी या विषयावर व्यापकतेने प्रकाश टाकणा-या 'मला आई व्हायचंय'ला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा आणि 'मी सिंधूताई सपकाळ'ला परीक्षकांकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक आशयावर आधारित सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून 'चॅम्पियन्स'ला मान मिळाला आहे.या पुरस्कारांबरोबरच मिताली जगतापला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (बाबू बँड बाजा), बालकलाकारांमध्ये शंतनू रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर (चॅम्पियन), विवेक चाबुकस्वार (बाबू बँड बाजा) यांना पुरस्कार मिळाला आहे. कित्येक दशके आपल्या आवाजाची जादू कायम ठेवलेल्या सुरेश वाडकर यांना 'मी सिंधूताई सपकाळ'साठी मराठी विभागात सर्वोत्कृष्ट गायक म्हणून, तर रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'मोनर मानुश' या बंगाली चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. इश्किया या चित्रपटाच्या लोकेशन साउंड रेकॉर्डिंगसाठी कामुद खराडे यांना पुरस्कार मिळाला आहे.


थिएटरमधील मराठी सिनेमांच्या शोजबद्दल मराठी निर्माते-दिग्दर्शकांनी याबाबत आपली ठाम भूमिका मांडली.मल्टिप्लेक्सवाल्यांनी मराठी सिनेमांचा दर्जा ठरवू नये. प्राइम-टाइममध्ये त्यांनी मराठी सिनेमे लावल्यास प्रेक्षकांची नक्कीच गर्दी होईल.

हिंदी सिनेमांचेही सगळे शो काही हाऊसफुल्ल जात नाहीत. तरीही त्यांचे शो काही थांबवले जात नाहीत. न चालणाऱ्या हिंदी-इंग्लिश सिनेमांचे शो जर मल्टिप्लेक्समध्ये होत असतील तर महाराष्ट्रात मराठी सिनेमांचे का नको? मुळात मराठी सिनेमांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. मराठी कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. मराठी सिनेमांचा दर्जा आता उंचावला आहे. मराठी सिनेमे पाहायला प्रेक्षक जातात. फक्त मराठीच नव्हे तर नॉनमराठी लोकंही गर्दी करतात हा अनुभव 'नटरंग' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतो' या सिनेमांच्या वेळी आला होता.

मराठी सिनेमांच्या शोची संख्या कमी होणं हे साफ चुकीचंच आहे. महाराष्ट्रात आपल्या मराठी सिनेमांची ही अवस्था असेल तर ते कसं चालेल? पण याबाबतीत माझी प्रेक्षकांनाही विनंती आहे की त्यांनी मराठी सिनेमे पाहायला थिएटरमध्ये आलं पाहिजे. चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवर मराठी सिनेमे येताहेत. प्रेक्षकांसाठी बनलेले हे सिनेमे त्यांनी पाहिले नाहीत तर काय उपयोग?

प्रेक्षकांना सोयीची नसलेली वेळ मराठी चित्रपटांना दिली जात आहे. मात्र, मल्याळी व इतर चित्रपटांना प्राइम टाइम दिला जात आहे.



No comments: