Sunday, May 22, 2011

तिहार तुरुंगात भरती

दक्षिण आशियातील सर्वात मोठा तुरुंग तिहारचा तुरुंग आहे.हल्ली या तुरुंगात प्रतिष्ठित कैद्यांचा भरणा झाला आहे. सध्या तिहार तुरुंग भरला आहे.एका वर्षात ह्या तुरुंगात मोठी भरती झाली आहे.तुरुंगातील अधिका-याना व कर्मचा-याना खुप कामे लागली आहेत.कैद्याना भेटण्यायला येणा-यांची  गर्दी उसळली आहे.मिडियाची वेगेळीच झाली आहे.
टू जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी शुक्रवारी अखेरीस तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांची खासदार कन्या कनिमोळी यांना अटक करण्यात आली. स्पेक्ट्रम घोटाळ्यात कनिमोळी यांच्यावर कलैग्नार टीव्हीच्या माध्यमातून २०० कोटी रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप असून कलैग्नार टीव्हीचे संचालक शरदकुमार यांचाही आरोपींत समावेश आहे. कनिमोळी व शरदकुमार यांची तिहार तुरुंगात रवानगी झाली. राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कलनाडीची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.टेलिकॉम कंपन्यांचे उद्योगपती, माजी मंत्री, खासदार अशा अनेक नामवंतांनी सध्या तिहार तुरुंग भरला आहे.  राष्ट्रकुल खेळांचे पदाधिकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मांसारखे जुने सवंगडी अगोदरच तिथे पोहोचलेत. न्यायमूर्तींनी १८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला आणि सुरेश कलमाडींची त्यात नव्याने भर पडली.
कोट्यवधी रूपयांच्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांची रवानगी अगोदरच तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे.स्वान टेलीकॉमचे प्रवर्तक शाहीद बलवा यांचीही राजा पाठोपाठ तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तुरुंगाधिका-यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेगळ्या बराकीत ठेवले आहे.
या वातावरणाची सवय नसल्याने ह्या मडंळीना वेगवेगळे त्रास होत आहेत.जेलमध्ये असलेले सुरेश कलमाडी चक्कर येऊन बेशुद्ध पडले. जेलमध्ये असल्यामुळे आलेले टेन्शन आणि वाढत्या उकाड्याच्या त्रास झाल्याने कलमाडींची तब्येत बिघडली.एसी केबिनमध्ये आराम करण्याची परवानगी मिळाली आहे.
ए. राजा यांना तर जेलमध्ये टाइमपास म्हणून बॅडमिंटन खेळण्याची परवानगी मिळाली आहे.जेलमध्ये वृत्तपत्रे वाचायला आणि वृत्तवाहिन्या बघायला परवानगी मिळाली आहे.दररोज योगासने करीत आहेत. घरचे जेवण घेण्याची मुभा विशेष कोर्टाने यांनी दिली आहे.

जी मडंळी तिहार मघ्ये आणखी किती दिवस काढतील याची शाश्वती नाही.त्याना मोठी शिक्षा झाली तरच हे भ्रष्टाचार कमी होतील.
 तिहार संकुलात एकूण १० तुरुंग असून त्यात ५०० खोल्या आहेत.तिहार तुरुंगाच्या कैद्यांसाठी असणा-या नियमांनुसार सरकारी कर्मचारी, अतिमहत्त्वाचे कैदी आणि ६० वर्षांवरील तसेच संसर्गजन्य रोग असणा-या कैद्याना  वेगळे ठेवण्यात येते. सरकारी कर्मचारी कैद्यांवरील हल्लयाच्या वाढत्या घटना पाहता त्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात येते. तुरुंगात वेळ घालवण्यासाठी टीव्हीचा छोटा पडदा असतो तेथे गप्पा मारायला आपल्यासारखे मोजके मित्रही असतात.
तुरुंग किंवा जेल म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर खतरनाक गुन्हेगार, अंधारकोठड्या हेच येते. पण तुरुंगात बरेच वेगळे  उपक्रमही चालतात. अगदी शेतीपासून रजया शिवण्यापर्र्यंत आणि कम्प्युटर शिकण्यापासून विपश्यनेपर्यंत....

देशातील सर्वात मोठे कारागृह म्हणून ओळखले जाणारे ‘तिहार जेल’ही फेसबुकच्या प्रेमात पडले असून या संकेतस्थळावर ‘सेंट्रल जेल तिहार’ या ‘आयडी’ने नवे पेज सुरू करण्यात आले आहे.
तिहार कारागृहाच्या विविध योजना, उपक्रम त्याचप्रमाणे कारागृहाच्या परिसरात होणारे विविध कार्यक्रम याची माहिती या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचू शकेल. केवळ इतकेच नाही तर देशभरातील लोकांकडून सूचना, प्रतिक्रिया आणि त्यांची मतेही मागवण्यात येतील. 
 

No comments: