Monday, May 30, 2011

रोगापेक्षा रोगावरचा उपाय घातक

वांरवार केंद्रसरकार वेगेवेगळ्या रोगापासून बचाव करण्यासाठी बालकाना लसीकरणाच्या मोहिमा राबवल्या जातात.मनुष्याला अपंगत्व देणा-या या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करणं आवश्यक झाले  आहे.
केवळ पोलिओच नाही,तर अनेक रोगांना आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण करण्यात येते. एखादा जीवघेणा आजार नामशेष करण्यासाठी लसीकरणाची सक्ती हा चांगला मार्ग ठरू शकतो. त्यामुळे संसर्गजन्य किंवा जीवघेणा रोग आटोक्यात आणणं शक्य आहे.बाळाच्या नित्य संगोपन व आजार याबद्दल माहिती घेताना विविध लसींची माहिती होणे आवश्यक आहे. पोलिओ, बीसीजी, कांजिण्या अशा काही लसी देणे गरजेचे आहे. पूर्वी लसीकरण फारच त्रासदायक होते. आता त्यात ब-याचशा सुधारणा झाल्या असून, लसीकरण वेदनादायक राहिलेले नाही.राज्याच्या आरोग्य खात्यातील अधिका-याकडून लहान मुलांच्या लसीकरणाचे लक्ष्य कागदोपत्री पूर्ण करण्यासाठी आकडे फुगविण्यात येत असल्याचे निर्दशनात आले आहे.एकच रोग अथवा विषाणू याविरुद्ध विविध तर्हेच्या लसी उपलब्ध आहेत. त्यांचे इंजेक्शन व तोंडाने दिली जाणारी लस असेही प्रकार पडतात. मात्र, लसी कोणत्या व कधी द्यायच्या याबद्दल पालकांच्या मनात शंका असतात.लसीकरणाच्या वेळेस बाळाची शारिरीक बाळ व बौद्धीक विकास होत आहे का हे तपासून घ्यावे. 

परंतू निकृष्ट दर्जाच्या लसी वापरल्याने बालकांचे बळी गेले आहेत.आपल्या राज्यात दगावलेल्या बालकांची संख्या मोठी आहे.रोग प्रतिबंधक म्हणून लहानग्या मुलांना दिले जाणारे लसीकरणाचे डोस त्यांच्या जीवावरच उलटत असल्याची धक्कादायक आकडेवारी गेल्या तीन वर्षांत समोर आली आहे. लसीकरणानंतर २०१० साली १२८ चिमुरड्यांचा बळी गेला असून, त्याआधीच्या दोन वर्षांत अनुक्रमे १११ आणि ११६ बालकांचा मृत्यू झाला होता.सक्तीचं लसीकरण म्हणजे सरकारचा व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप किंवा ते तेवढंसं सुरक्षित नसल्याचं मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. 

निकृष्ट दर्जाच्या लसी, लसींच्या साठवणुकीतील हेळसांड आणि लस टोचल्यानंतर मुलांच्या शरीराची विपरित परिणामामुळे  मृत्यू होत आहेत.बालकांना लसी देताना फिल्ड लेवलवर झालेली हेळसांड हे कदाचित त्यामागचे कारण असू शकते.लसींच्या उत्पादनात काही स्टँडर्ड पद्धतींचा वापर केला जावा.उत्पादनापासून मुलाला लस देईपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर लसी विशिष्ट थंड तापमानात ठेवणे, अर्थातच 'कोल्ड चेन' राखणे आवश्यक असते. ग्रामीण भागात वीजपुरवठ्याची समस्या असताना हे कसे जमणार? परिणामी लसीचा प्रभाव नाहीसा होऊ शकतो, परंतु लसीचे विषात रूपांतर होण्याची शक्यता असते.सरकार भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती कशी रोखणार? निष्काळजीपणाने बालकांचे मृत्यू झाले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्यभरात विशिष्ट बॅचमधील लसींचा वापर बंद करण्यात यावा.

आरोग्य खात्याची ही नामुष्क़ी आहे.यापुढे आरोग्य खात्याने हेडसाळ थाबंवून सावधानता बाळगली तरच बालकांचे बळी थांबतील.

स्वच्छता, लसीकरण, निरोगी बालक तपासणी व पालकांची सतर्कता हाच आपल्या बाळाच्या निरोगी व आनंददायी आरोग्याचा महामार्ग आहे.बाळाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लसीकरण केलेच पाहिजे अशी जाहिरात सरकारच नेहमीच करतात पण लसीकरणाची काळजी सरकारकडुन घेतली जात नाही.

1 comment:

classicmarathi said...

The statistics shown here is incomplete. The vaccine doses given are more than a crore per year in MH and comparatively lives saved by vaccines are much more. Vaccines caused a major role in reducing bellow 5 year children mortality frm thousands per lac to bellow 50 per lac. Now invariantly every drug incl. vaccine is associated with some side effects like fever, convulsions and rarely may lead to death. So its not so horrible situation like media is showing. One can check aunthentic figures from www.maha-arogya.gov.in