Wednesday, June 1, 2011

करबुडव्यांची यादी


  ज्याना कर बुडवण्याची सवय लागलेल्या करबुडव्यांचा नावाची यादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याची योजना इन्कम टॅक्स विभागाने राबवण्याच्या विचारात आहे.तब्बल एक लाख कोटी रुपयांची कराची रक्कम थकीत असल्याने त्याची करवसुलीसाठी करण्यासाठी इन्कम टॅक्स विभाग अभिनव उपाययोजना राबवण्याच्या प्रस्ताव विचारात आहे.या प्रस्तावाने नावे जाहीर झाल्यास गेड्याची कातडी असलेल्या या करबुडव्यांना काय फरक पडेल का? इन्कम टॅक्स विभागाकडुन  करवसूली होइल असे वाटत नाही.ह्या देशद्रोही ठरवून त्याचे व्यवहारांवर बंदी आणावी.
कर चुकवून पैसा परदेशी बँकांत दडवून ठेवणा-यांची नावे देशवासीयांसमोर यावीत अशी केंद सरकारचीही इच्छा आहे. केंदीय बजेट या जमा झालेल्या कराच्या मार्गाने जमा होणा-या रककमेवर अवलंबून असते.विकासाचा वेग वाढत ठेवण्यात आपल्याला यश येत असताना आपल्याला अधिक आथिर्क शिस्त बाळगावी लागणार आहे. ती न बाळगल्यास ही आथिर्क प्रगती काही प्रमाणात रोखली जाण्याचीच भीती जास्त आहे.

कर न भरणारे जो नोकरदार माणूस प्रामाणिकपणे वा घाबरून निमूटपणे कर भरत असतो, त्याच्यावरच करांचे ओझे अधिकाधिक टाकले जाते आणि कधीही कर न भरणारे तसेच मोकळे राहतात,ही वस्तुस्थिती आहे.मध्यमवगीर्य माणूस मात्र मुकाट्याने कर भरून मोकळा होतो.प्रामाणिकपणे कर भरणारे लोक फार कमी आहेत. कर भरण्यापेक्षा तो कसा टाळता येईल हे पाहणारेच बरेच आहेत.

देशातला काळा पैसा बाहेर काढण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर अनेकदा झाले आहेत. त्यांना अगदीच किरकोळ यश मिळाले आहे. याचे कारण एकच. आपल्याकडील दोन नंबरचा पैसा जाहीर केल्यावर प्राप्तिकर खात्याकडून होणा-या संभाव्य कारवाईची भीती लोकांना वाटत असते. शिवाय हा बेहिशेबी पैसा पांढरा केल्यावर पुढे त्यावर कायम कर भरावा लागेल,ही बाबही या लोकांना अडचणीची वाटते. दुस-या बाजूला खर्च वाढतच असल्याने सरकारला पैशांची कमतरता कायमच भासते. याचमुळे प्रामाणिक करदात्यांकडून अधिकाधिक पैसा गोळा करण्याचा प्रयत्न सरकार नेहमीच करतात. कर भरणारा सामान्य नागरिक शिक्षेच्या भीतीने का असेना, पण निर्णय पाळतो. किंबहुना त्याला काही पर्यायच नसतो. हा माणूस काही पैसे उरलेच, तर ते बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवत होता. 

कर भरुन देशाला मदत करावी.बचत करुन आपला कर वाचवावा.पण कर न भरल्याने देशाचा विकास थांबू शकतो..

No comments: