Friday, June 10, 2011

एकतरी रो प टे लावा.

आपल्या राज्यात व तसेच देशात यावर्षीचा पाऊस सुरु होत आहे.पावसाळा सगळ्यांच्या आवडीचा असल्याने पावसाबरोबर पहिल्या  पावसाच्या मेल,गाणी,फोटो,एसएमएस,पिकनीक रेलचेल सुरु होते.पाऊस म्हटला कि गरमागरम भजी व चहा ह्या  समिकरणासह प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येकाने  एकतरी रोपटे लावण्याबद्द्लही जनजागृती झाली पाहिजे.दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला स्वत:च्या हातांनी पावसात भिजत भिजत आपल्या परिसरात कुठेही किमान एका तरी वृक्षाचे रोपटे लावून ते वाढविण्याचा प्रयत्न करावे.शाळेय शिक्षणात विद्यार्थ्याना झाडांचे महत्व शिकवले जाते व त्यांच्याकडुन झाडेही लावून वाढवली जातात पण ही मडंळी मोठी झाल्यावर त्या सर्व गोष्टी जाणताही दुर्लक्ष करीत आहेत. 
 
मातेच्या उदरातून बाहेर पडीत बाह्य जगतात प्रवेश करणा-या नवजात अर्भकाची प्राथमिक गरज आणि क्रिया असते ती 'श्वास घेण्याची'! त्या श्वासातून हवेतील प्राणवायू त्याच्या रक्तात निसर्गत:च शोषला जाऊन शरीराला नको असलेला वायू उच्छवासाद्वारे बाहेर सोडला जातो. त्या क्षणापासून त्याची ही क्रिया त्याच्या आयुष्याच्या अंतापर्यंत चालू असते. त्याचे श्वास घेणे थांबले की त्याला या जगाचा निरोप घेणे क्रमप्राप्त असते. त्या नवजात बालकाला 'अन्न, वस्त्र, निवारा' या सगळ्या 'मूलभूत गरजा' समजल्या जाणा-या घटकांपेक्षाही सर्वाधिक गरज असते ती त्या प्राणवायूची. म्हणूनच तर त्याला आपल्या भाषेत 'प्राणवायू' असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले आहे. आपल्या शरीराच्या गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात आणि तेवढ्या शुद्ध स्वरूपात हा प्राणवायू त्या बालकाला आपल्या परिसरात मिळत राहील, हे बघण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. 
मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्याचे पालक अन्न-वस्त्र-निवारा या गोष्टींबरोबरच त्याच्या इतर गरजा वेळच्यावेळी भागत राहतील यासाठी प्रयत्नशील असतात. त्याचे शिक्षण, आरोग्य इत्यादींची तरतूद करण्यासाठी 'संचय' करायलादेखील सुरुवात होते. पण त्या बालकाला आणि त्यांना स्वत:लादेखील जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू भरपूर आणि अप्रदूषित स्वरूपात मिळावा म्हणून आपल्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात का? 
हा प्राणवायू मिळतो वृक्ष आणि वनस्पतींपासूनच फक्त. त्यामुळेच आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लावण्यावर, त्यांची जोपासना आणि संगोपन करण्यावर भर देणे आवश्यक असते. वृक्षांच्या मुळांद्वारे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. त्यांच्यापासून आपल्याला मिळतात फळे, फुले आणि अन्नासाठीचे इतर घटक. वेगवेगळ्या कारणांसाठी होणारे बांधकाम, कागद, फनिर्चर, खेळणी, इत्यादीसाठी लागणारे लाकूडही मिळते. डोक्यावर सावली आणि वन्य जीवांना खाद्य व आसरा मिळतो. आपली जैविक साखळी आणि पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी वृक्षांचे अस्तित्व खूपच महत्त्वाचे असते. म्हणूनच आपल्याकडे वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने वड, पिंपळ, उंबर, बेल,आपटा अशा अनेक वृक्षप्रजातींची पूजा केली जाते आणि त्यातूनच त्यांच्या रक्षणाचा संदेश दिला जातो. 

जंगलांचे महत्त्व जनमानसावर बिंबवण्यासाठी यंदाचा जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र पाळला गेला आहे.पर्यावरणाबाबतची ही सजगता समाजाच्या सर्वच थरांत निर्माण होणे ही आता काळाची गरज आहे. आज जागतिक पातळीवर हवामानात अनिष्ट बदल होत आहेत. त्याला जबाबदार कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारखे वायू आहेत. हे वायू उष्णताशोषक आहेत आणि त्यामुळेच हवा तापत चालली आहे. या तापणा-या हवेचे दुष्परिणाम जागोजागी दृग्गोचर होऊ लागले आहेत.
 
ज्याप्रमाणे सुवासाविना फूल,सायीविना दूध,पावसाविना धारित्री व्यर्थ आहे,त्याचप्रमाणे वृक्षाविना माणसांचे जीवनही व्यर्थ आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा.

'कावळा करतो काव काव,
म्हणतो पक्षांसाठी,
माणसा, 'एक तरी झाड लाव' .


आपण लावलेले हे रोपटे वृक्षात रूपांतरित होईल तोपर्यत त्याचे संगोपन झाले पाहिजे.निसर्गाची बांधलकी असल्याने  प्रत्येकाने एकतरी रोपटे लावा.


3 comments:

मी मराठी .... said...

निसर्गाचा समतोल राखण्यात झाडांचे अनन्यसाधारण महत्व आहेच. आणि हे पण खरच की पावसाळ्यात पिकनिक , चहा-भाजी यांच्या जोडीला एखादा रोपटं लावून खरच निसर्गाचा समतोल तर राखला जाईलच आणि आपल्या भावी पिढीसाठी पण खूप काही चांगल्या गोष्टींची तरतूद आपण करून ठेऊ शकतो. सिमेंटच्या जंगलात राहून आपल्या आयुष्याचा पायाच विसरून गेलेल्या लोकांना पण काही अंशी झाडांचं महत्व समजून घ्यायला उद्युक्त करू शकू.

VIVEK TAVATE said...

भावी पिढीसाठी हे गरजेचे आहे.

Anonymous said...

I fully agree with you. We have planted small trees on the ground floor of our building and encourage others to do the same : AA