Saturday, June 11, 2011

न्याय मिळेल का?

पाकिस्तानचे राष्ट्रीय हित जपण्याची जबाबदारी आयएसआय या गुप्तचर संस्थेवर असून भारतात घातपाती कारवाया घडवण्याची जबाबदारीही ही संघटना पार पाडते हे सिध्द झाले आहे.मुंबईवरील दहशतवादी हल्ला थेट पाकिस्तान सरकार व आयएसआय यांच्या इशा-यावरूनच झाला असल्याचा खळबळजनक कबुलीजबाब या प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणा याने अमेरिकन कोर्टात दिला आहे.तरीही तहव्वूर राणाला मुंबई हल्ल्याच्या खटल्यात निदोर्ष ठरवून व डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार बनवून अमेरिकेने भारताचा विश्वासघात केला आहे.दहशतवादी विरोधात अमेरिकेच्या मदतीची वाट न पाहता भारताने स्वत:हून पाकिस्तान सरकारच्या हालचालीवर लक्ष ठेवून पाकमधली दहशतवादी यत्रणा उद्ध्वस्त करावी.दाऊद आणि अन्य  अतिरेक्यांचा काटा काढायचा तर अमेरिका वा अन्य देशांची मदत मागणे वा मिळवणे भारताला शक्य नाही.  अमेरिकेतील कोर्टाच्या निर्णयाने पाकमधल्या दहशतवादी संघटनाना आणखी बळ येणार आहे.त्यानी भारताविरोधात आणखी दहशतवादी करवाया कराव्यात हाच हेतू या निर्णयातून उघड होत आहे.अमेरिकेचा पाकिस्तानला सरकारला हा छुपा पाठिंबा आहे  .भारताने पाकिस्तानशी   कोणतीही वाटाधाटी न करता    पाकिस्तानतल्या   दहशतवादी  यंत्रणा उद्ध्वस्त  करण्य़ासाठी कठोर पावले उचलावित अशी आम जनतेची मागणी आहे.

क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात अखेर अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला यश आल्यानतंर  अमेरिकेत सण साजरा झाला.पण ओसामाचा अंत झाल्यामुळे दहशतवादाचा एक अध्याय संपला असला,तरी आता दहशतवाद संपला,असे मानता येणार नाही.त्याने तयार केलेल्या संघटना कार्यरत आहेत.त्या शांत बसणार नाही याप्रचिती येत आहे.

अमेरिका हे 'व्यापारी राष्ट्र' आहे. ओसामाला ठार मारल्यानंतर त्यांचे पाकिस्तानबरोबर वैर कायम राहील क? अमेरिकेने पाकिस्तानला 'दहशतवादी राष्ट्र' जाहीर केल्यास त्या देशाबरोबर अमेरिकेला व्यापार करता येणार नाही आणि पाकिस्तानात आपले लष्करी तळही ठेवता येणार नाही.

भारताच्या दृष्टीने सर्वात खतरनाक दहशतवादी दाऊद इब्राहिम व त्याचा भाऊ अनीस आणि टायगर मेमन आदी
सहका-यांसमवेत पाकिस्तान सरकारच्या संरक्षणात लपुन बसले आहेत.

९/११च्या हल्ल्यात ज्यांचे आप्तेष्ट मृत्यूमुखी पडलेल्याना ओसामा बीन लादेनला मारुन अमेरिकेने न्याय मिळवून दिला.तसाच भारतात झालेल्या दह्शतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आप्ताना न्याय मिळेल का?

No comments: