Tuesday, June 28, 2011

प्युअर सायन्स गरजेचे

विज्ञानाची प्रगती होण्यासाठी प्युअर सायन्सच्या शिक्षणाची गरज आहे.

इंजिनीअरिंग-मेडिकलला प्रवेश मिळाला नाही म्हणून बेसिक सायन्स घेतले हा मागासलेपणा काढून टाका. पालकांनीही इंजिनीअरिंग आणि मेडिकलला प्रतिष्ठेची क्षेत्र केल्याने अन्य अनेक चांगल्या पर्यायांचा विचारही केला जात नाही. है दुदैर्वी आहे.

 बारावीला सीईटीचा रिझल्ट चांगला न लागल्याने इंजिनीअरिंग आणि मेडिकलची दारे बंद होतात. मगच अनेक विद्यार्थी आणि पालक बेसिक सायन्सकडे वळतात. तसे,न करता याच क्षेत्रातल्या संधी जाणून घ्या. रिसर्चर किंवा सायटिस्ट हे एक उत्तम करिअर होऊ शकते. रिसर्चसाठी कुतुहल, आश्चर्य, जिद्द आणि चिकाटी अशा गोष्टींची आवश्यकता असते.

मेडिकल, इंजिनीअरिंगच्या वाढत्या जागांमुळे बीएससीच्या जागा भरणे कॉलेजांना अवघड जात होते. त्यातच बीएससी (आयटी), बायोटेक या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुकड्या वाढल्याने बीएससीवर परिणाम झाला आहे.

फिजीक्स, गणित, केमिस्ट्री, बायोलॉजी यासारख्या प्युअर सायन्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढवण्यासाठी स्कॉलरशिप किंवा इतर काही नवीन योजना हाती घेणे शक्य आहे का?वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने धोक्याचे आहे. प्युअर सायन्स  द्वारे रिसर्च अभ्यासक्रमांकडे वळणा-या विद्यार्थ्यांच्या दिवसेंदिवस घटत्या  संख्येमुळे येत्या काळात तरुण शास्त्रज्ञांची वानवा होत आहे.

सायन्समध्येही प्युअर सायन्स, क्लिनिकल रिसर्च, बायोटेक, न्युक्लिअर किंवा पाटिर्कल फिजिक्स यासारखी विविध क्षेत्रं आहेत. त्यात चांगलं करिअर करता येते.

2 comments:

Anonymous said...

आपणाला फंडामेंटल सायन्सेस म्हणावयाचे आहे असे वाटते.

VIVEK TAVATE said...

मला बेसिक सायन्स बद्द्ल बोलायचे आहे.
बारावीनतंर FYBSc,SYBSc,TYBSc या अभ्यासक्रमासाठी
विद्यार्थ्यी मिळत नाही.