Thursday, June 30, 2011

तस्करी रोखल्यास रेव्हपार्ट्या थांबतील.

रेव्हपार्ट्या म्हणजे अमली पदार्थ्याची विक्रीकेंद्रे आहेत तसेच रेव्ह पार्टी म्हणजे वेस्टर्न कल्चरचा कडेलोट. कर्कश्य पश्चिमात्त्य संगीत, एलएसडीचे ड्रॉप्स, एक्स्टॅसी आणि मेण्ड्रक्सच्या गोळ्या, अफू आणि चरस हे रेव्ह पार्टीचे अविभाज्य घटक. ही सगळी व्यसनं अत्यंत महागडी आहेत. त्यांचं सेवन केल्यावर मेंदूवरचा ताबा सुटतो आणि शरीर बेभान होतं.  

२६ जून रोजी जगभरात अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जात असताना या तरुण तरुणींच मात्र कर्जतकच्या रिसोर्टवर रेव्हपार्ट्या साज-या झाल्या.तरुण पिढी अमली पदार्थ सेवनाच्या अधिन जात आहेत.

औषध कंपन्याना लागणा-या अनेक रसायनांचा अमलीपदार्थ म्हणून रेव्ह पार्ट्यांमध्ये वापर होतो.लिथजिर्क अँसिड डायथिलॅमाइड अर्थात, एलएसडी या ड्रगचा वापर मानसोपचारासाठी केला जाता. पण रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा नशेसाठी सर्रास वापर होतो. मिथाक्वेलन या वेदनाशामक ड्रगचा वापर मेण्ड्रक्सच्या गोळ्या बनवण्यासाठी होतो.

राजकीय नेत्यांची आणि बड्या सरकारी नेत्यांची पोरंबाळंही व मुबंई,पुण्यातील श्रिमंताची व सेलेब्रिटींची मुले  या उद्योजकाच्या रेव्ह पार्टीला हजेरी लावतात.आर्थिक साम्राज्य आणि राजकीय लागेबांधे असल्यामुळे अशा लोकांवर कारवाई होत नाही.  

तरुण पिढिला या अमली पदार्थाच्या सेवनामघ्ये या रेव्ह्पार्टी भरवण्याचा मुख्य हेतु दिसतो.या पार्ट्यामघुन ब-याच पैशाची उलाढाल होते. तस्करी करुन आणलेले  अमली पदार्थ रेव्हपार्टी मोठ्या किंमतीला विकले जातात.दक्ष पोलिस खात्याला या रेव्हपार्टाचा थांगपत्ता नसतो.या  पार्ट्याबद्दल  स्थानिक गांवक-यानी तक्रारी केल्याने या पार्त्यांवर छापा टाकला जातो.पोलिस खात्याला अमली पदार्थाची तस्करी न रोखल्याने या रेव्हपार्ट्या वाढल्या आहेत.आतातर कर्जतच्या रीसोर्टवर पडलेल्या धाडीत अमली पदार्थ  विरोधी पथकाचे निरिक्षकच सापडल्याने पोलिसावरचा विश्वास उडला आहे.म्हणुनच आता या पार्ट्या थोपवण्यासाठी व तस्करी थांबण्यासाठी महाराश्ट्र सरकार दिल्ली अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत घेणार आहेत.

तरुण पिढीला या व्यसनी बनवणा-या रेव्हपार्ट्या लवकरच बंद व्हायला पाहिजेत.