आतापर्यतच्या मुबंईतल्या बाँम्बस्फोट मालिकेतील मुख्य घटनांचा आढावा.
दहशतवादी मुबंईला लक्ष करीत मुबंईत बाँम्ब पेरतात.
त्यानी ठरवलेल्या वेळेला दहशतवादी बाँम्बस्फोट करतात.
घटनास्थळी हाहाकार उडतो धावपळ होते.
मुबंईकर कोणाचीही वाट न पाहता मदतीला लागतात.
मृताना तेथेच ठेवून जखमीना मिळेल त्या वाहनानी दवाखान्यात हलवितात.
तेव्हाच मोबाईल सेवा बंद पडते.
सुरक्षा यंत्रणेची धावपळ होते.
मिडियाला नविन विषय मिळतो.
राज्याचे गृहखात्याचे अपयश दिसुन येते.
थोडक्यात वाचलेले आनंद मानतात तर मृतांचे आप्त दु:ख व्यक्त करतात.
मुबंईकर काही काळापुरती घास्तावतात.
घटनास्थळाना राज्यांच्या मंत्र्याच्या भेटी.
दवाखन्यात जखमीची मत्र्यांकडुन विचारपूस.
देशातून व परदेशातून निषेध होतो.
चौकश्या व आरोप सुरु होतात.
मुबंईकरांच्या बँम्बस्फोटाच्या गप्पा रंगतात.
गुप्तचर व पोलिस यत्रँणेला दोषी ठरवले जातात.
पोलिस व राजकीय नेत्यामघ्ये सौहार्दपुर्ण सबंध बिधडतात.
देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री दौरे होतात.
जखमीना व मृताना पैशाची मदत जाहीर होते.
बाँम्बस्फोटाचे राजकारण केले जाते.
बाँम्बस्फोटाने मुबंईकराच्या सुरक्षेचा प्रश्नाची चर्चा होते.
अतिरेकी पळुन पाकिस्तानात जातात.
नविन बँम्बस्फोटाच्या हल्ल्याची आखणी सुरु होते.
संशयित आरोपीना पकडुन फाशीची शिक्षा दिली जाते.
फाशी न देता आरोपीना तुरुंगात पोसले जातात.
पण कट रचणारे कधीच सापडत नाहीत.
काही दिवसानी आपण फक्त तारखा लक्षात ठेवतो.
सुरक्षा यंत्रणा व जनता सुस्त झाल्यावर पुन्हा नव्या ठिकाणी बाँम्बस्फोट.
पुन्हा याच घटनांची मालिका सुरु होते.
सरकारने बाँम्बस्फोट न होण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कडक केल्या पाहिजेत.
आपण आपलीच सुरक्षा करायला शिकले पाहिजे.
No comments:
Post a Comment