Saturday, July 16, 2011

राजकारणी जिकंले.

द्वैवाषिर्क निवडणुकीचा क्रिकेटपटु दिलीप वेगंसरकरांच्या  विरोधातला रंगलेला सामना विलासराव देशमुखांनी पवारांच्या पॅनलच्या पाठिंब्याच्या जोरावर सहज जिंकला. राजकारणी मनोहर जोशी (१९९२ ते २००१)आणि शरद पवार (२००१ ते २०११) ह्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यानी   एमसीएच्या अध्यक्षपदाची धुरा वाहील्यानतंर आता विलासराव देशमुख निवडुन आल्याने राजकारणी जिंकत आहेत.क्लबचे सुजाण मतदार कायम खेळाडुना हरवत आहेत.मनोहर जोशी यांनी १९९२ मध्ये माधव मंत्री यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केला अन तिथपासून राजकारण्यांनीच एमसीएच्या अध्यक्षपदावर कब्जा मिळवला असून आजतागायत त्यांचाच पगडा पडला आहे आणि कायम राहणार आहे असे दिसते.
क्रिकेट संघटनेत क्रिकेटपटूच प्रामुख्याने असावेत असा मतप्रवाह सध्या निवडणुकीच्या अगोदर दिसतो.खेळाडुंची मतेही  राजकारण्याना मिळत असल्याने राजकारणी जिकंत आहेत.राजकारणाच्या मैदानात खेळलेल्या आणि प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानावर खेळलेल्या धुरंधर अशा प्रतिस्पर्धीमधील ही झुंज होती .
कसोटीपटूंची गाडी अडकते ती उपाध्यक्षपदावरच. सर्वश्री दुलीपसिंगजी, एल. पी. जय, खंडू रांगणेकर, नरेन ताम्हणे, अजित वाडेकर, रमाकांत देसाई, सुनील गावस्कर यांनी यापुर्वी उपाध्यक्षपद भूषवले आहे.
भारतीय क्रिकेटसाठी घाम गाळलाय पण राजकारण्यांनी घाम गाळणे तर सोडाच त्यानी एअरकंडिशन्ड केबिनमध्ये बसून  आदेश सोडण्याचे काम करतात.
राजकारण्यांच्या मेजवान्य त्याना फायद्यात पड्ल्या आहेत.खेळाडुनी मजवान्या दिल्या नसल्याने पराभवाला सामोरे जावे
लागले.क्रिकेटमघ्ये पैसा आल्याने राजकारणी या क्लबच्या  अध्यक्षपदावर डोळा ठेवायला लागले.निवडणुकांमध्ये मतदारांनी क्रिकेटपटूच्या नव्हे तर धुरंधर राजकारण्यांच्या बाजूने कौल दिला होता.खेळाडु आपले भवितव्य या राजकारण्यांच्या हातात असल्यने त्याना मते देत आहेत.राजकारनी मडंळी नेहमीच कोठेतरी निवडणुक़ लढवित असल्याने त्याना चागंल्या अनुभवाने व पैशाच्या योग्य वापराने ते निवडणुका जिंकत असतात. खेळापेक्षा राजकारणाला महत्व दिले जात आहेत.
 

No comments: