Sunday, July 10, 2011

'हॅरी पॉटर'भारतभेटीला येणार

 जगभरात लहान थोरांच्या मनावर जादू करणारा व जादुई झाडूने आकाशाला गवसणी घालणारा तोच ‘ हॅरी पॉटर ’, अर्थात अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ भारताच्या जबरदस्त प्रेमात पडलाय.तुमचा-आमचा-आपला सगळ्यांचा लाडका जादुगार ‘ हॅरी पॉटर ’ लवकरच भारतभेटीवर येणार आहे.स्वतः डॅनियलनेच ‘ टाइम्स ’ ला दिलेल्या मुलाखतीत आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे.आपली जनता क्रिकेट वेडी असल्याने तो वर्ल्डकप पाहण्यास भारतात येणार होता.त्याला आपला सचिन तेंडुलकर व शाहरुख खान खुप आवडतो.

हॅरी पॉटरचे सिनेमे आता संपत आले आहेत. शेवटचा भाग आता प्रदर्शित लवकरच होत आहे.जगातील मुलांसह मोठ्यांनाही एका अनोख्या जगात घेऊन जाणा-या पॉटरनाम्यातला हा शेवटचा अध्याय.पॉटरचे रसिक या शेवटच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ आता हॅरी पॉटरची भुमिका करणार नाही.पॉटरनाम्याची पडद्यावरची अखेर जरी होत असली तर त्याची जादू कायम स्मरणात राहणार आहे. या भुमिकेमुळे त्याला जगात प्रसिध्दी व फॅन्स मिळाले हे तो विसरत नाही. 

सचिन तेंडुलकर फॅन्टॅस्टिक आहे तर शाहरूख खान ग्रेट आहे. हे कौतुकाचे उद्गार आहेत हॅरी पॉटरची अजरामर भूमिका करणारा डॅनियल रॅडक्लिफ याचे.तो ‘ हॅरी पॉटर ’ ची इमेज मघुन बाहेर पडुन हॉलिवूड मघ्ये दिसणार आहे. 
या जादुगारावर आपल्या देशाने व लोकानी जादु केली असल्याने तो भारताबद्दल बोलताना दमतच नाही. प्रत्यक्ष भारताला भेट दिल्यानंतर त्याचे भारताबद्द्लचे  आकर्षण, ओढ, कौतुक कमी होऊ नये.

भारतातही असा  ' हरी '  व्हावा.

2 comments:

Anonymous said...

your post is really good but topic about english celebrity and word used by u sanskrit............
Boston Flights|Edmonton Flights

VIVEK TAVATE said...

My blog is mainly in Marathi language.