Thursday, July 7, 2011

माहुली गड






  पावासानतंरच्या पहिल्या 'माहुली गड' या ट्रेकला मोठी मागणी होती.सर्वानी होकार दिला.मोठी लिस्ट तयार झाली. 




सकाळी 'आसनगांव' स्टेशनावर मोजणी केली.पच्चावन ट्रेकर जमले होते.माहुली गड ढगात लपले होते.त्या दिशेने  प्रस्थान केले.सुरुवातीला वेग होता.गड चढायचा होता व काही मडंळी नवखी असल्याने पुढे काही अतंर डंपरने प्रवास केला.एका डंपरमघ्ये सर्वजण चढलो.हेलकावे खात आरडाओरड करीत मजा करीत प्रवास केला.

 पायथ्याच्या शंकराच्या मंदिरात थांबुन चहापाणी करुन 'जय महाराष्टृ'व 'जय भवानी' पुकारा करीत जगंलात शिरलो.ट्रेकरना सुचना दिल्या.

हिरवा रंग डोळ्यात भरत होता.निसर्ग बहरला होता.सर्वाचा उत्साहाच्या भरात पटापट चढत होते.उन्हाने गरम झाल्याने घाम निथळायला लागला.पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो.

माहुली गडाची शिखरे ढगातून मघ्येमघ्ये दर्शन देत होती.
पावसाच्या मोठ्या सरीने आम्हाला चागलेच झोडपले.


 




ज्या मजेसाठी आम्ही आलो होतो.ती मजा आम्हा सर्वाना घेता आली.तरुण ट्रेकर पटापट चढत गेले पण वयस्कर दम खात चढत असल्याने चढण्यास वेळ लागत होता. बाराच्या सुमाराला वरती गडावर पोहचलो.






पळ्सगड व भंडारगड पाहिले.ढगातून डोकावत आम्हाला पाहत होते.नवरा,नवरी,करवली चे दर्शन झाले.फॉटॉग्राफी झाली.












आमच्याकडचे पाणी संपले होते.काही मडंळीना पाण्याच्या शोधात कल्यान दरवाज्याकडे घाडले.तेथून पुढे सर्वासह कल्यान दरवाज्यापर्यत गेलो.तेथले वातावरण घुद होते.दाट झाडीत ढगाचे आक्रमण झाल्याने अंधार होता. गडावर फेरी मारली.आणलेले डबे खाल्ले.गाणी गायली. 
उतरायला सुरुवात केली.सर्वाना सावकाश उरतण्याच्या सुचना दिल्या.एवढ्या सर्वाना एकदम उतरताना वाटेवर गर्दी होत होती.


तरीपण एकामेकाच्या मदतीने उतरत होते.खाली आल्यावर काहीना धबधब्यावर जाण्याची इच्छा होती.पण उशिर झाल्याने सर्वाना घेउन खाजगी वाहनाने स्टेशन गाठले.ट्रेक मस्त व मजेशीर झाला.  

1 comment:

Anonymous said...

gr8 snaps & article : AA