जवळजवळ प्रत्येक कुटुंबात 'अण्णा' या नावांचा एकतरी ज्येष्ट पुरुष असतोच.या अण्णाना कुटुंबात मानसन्मान दिला जातो.लहानथोर सगळेच त्याना त्याच्यावरील प्रेमाने 'अण्णा'या नावांनेच संबोधतात. अण्णा एक प्रिय व्यक्ती असते. कुटुंबावर त्याचे प्रेम असते.अण्णा या शब्दाचा दरारा असतो.कोणतेही काम अण्णा करण्यास तत्पर असतात.त्यामुळेच अण्णा सर्वाचे लाकडे असल्याने वेगळेच नाते असते.
सध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे.अण्णा या वजनदार ह्या शब्दाने भारत देशात हलविले आहे.सरकारला अण्णा शब्दाने खुपच त्रास दिला आहे.पंतप्रधानांसह सर्व मंत्र्याना सळो की पळो करुन सोडले आहे.
भ्रष्टाचाराला विरोध करणा-या अण्णाना देशातील सर्व थरातील जनतेनी पाठिंबा दिला आहे.अण्णांच्या सांग़ण्यावरुन कोणत्याही हिसंक मार्गाचा अवलंब न करता आंदोलन सुरु आहेत.अण्णांच्या प्रेमाखातर व त्याच्या आंदोलनाला समर्थन देण्य़ासाठी "मी अण्णा" ची गांधी टोपी तरुणांपासून जेष्टांपर्यत सर्व घालत आहेत.युवकांमघ्ये अण्णा प्रसिध्द आहेत.सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वत:हून अण्णाना पाठिंबा दिला.ह्या पाठिंब्याच्या ओझ्याखाली त्याचे अंदोलन सुरु आहे. अण्णानी आतापर्यत खुपशे आदोलंने यशस्वी केली आहेत.
बातम्या,वृतपत्र,कोणतीही चर्चा,नाक्यावर,गाडीत,कचेरीत,चँनलवर अण्णंचीच चर्चा सुरु असते.जगाने अण्णांच्या कार्याचीही नोंद केली आहे.
अण्णानी उपोषण करुन भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केल्याने देशात ते हिरो झाले आहेत.
अण्णांचे उपोषण लांबू न अशी सर्वाची इच्छा आहे.अण्णांची प्रकृती ठणठणीत राहावी अशी सर्वजण प्रार्थना करीत आहेत.
दुसरा स्वातंत्र्यलढा पुकारणार अण्णा आपल्या घरातले झाले आहेत.
No comments:
Post a Comment