Tuesday, August 16, 2011

सोने झळाळले चोरांना भावले

शेअर बाजार पडला पण सोन्याचे भाव कडाडले.गेल्या दोन वर्षात दहा हजार रुपयानी सोन्याचे भाव वाढ्ले.सोन्याला ही झळाळी प्राप्त झाली आहे ती जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे. जागतिक बाजारातील परिस्थितीवर सोन्याचे भाव ठरतात.सणासुदीचे दिवस आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीमुळे सोन्याचा भाव गगनाला भिडले आहे. तसेच चांदीच्या किमतीनेही नवा उच्चांक गाठला आहे.  येत्या काळात हे सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या शक्यतेने सामान्य शेअर बाजारात पैसे न गुतंवता सोन्यात पैसा टाकत आहेत.महिला सोन्याच्या भाव वाढण्याच्या भाकितामुळे सोने खरेदीला लागल्या आहेत.यानेच सोन्याचे भाव आणखी वाढत आहेत.

सोने खरेदी करुन ते सांभाळायचे कसे हा प्रश्न पडला आहे.ह्या सोन्याच्या वाढत्या भावामुळे चोरांचे फावले आहे.
सोनारांच्या दुकानावर दरोडे,सोनसाखळ्या खेचणे,घरफोडी,लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.जे सोने चोर चोरत आहेत त्याने चोराना जास्त पैसा मिळत आहे.सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे चोर मडंळी खुषीत आहेत.भुरट्याचोरांच्या चो-या वाढल्या आहेत. 

घेतलेले सोने सुरक्षित ठेवले तरच त्याने पैसा मिळेल.वाढत्या चोरीच्या प्रकरणाने पोलिसांवर दबाव पडत आहे.त्याची चो-या पडकण्याची कामे वाढली आहेत.महिलांची असुरक्षितता वाढत आहे. महिलानी सुरक्षित जागेतच सोने वापरावे. मोबाईल चोरण्यापेक्षा सोने चोरल्यास त्याना पैसा जास्त मिळत आहे.सोन्यासाठी आता खुनही पडतील.चोराना सोने  चोरण्यास व ते लंपास करण्यास सोपे जाते.टोळ्या कार्यरत आहेत.सामान्यानी सोने वापरणे कमी करावे.फक्त गुतंवणुक करावी

No comments: