Monday, October 31, 2011

वाढीचे साम्राज्य

वाढ,वाढ,वाढ आणि वाढ....

रोज वृतपत्रातून कसल्या ना कसल्याची वाढ झालेल्या बातम्या येत आहेत.वाढ काय थांबत नाही ती वाढतच आहे. या वाढीने विलक्षण वेग पकडल्याने नवनविन विक्रम नोदंवले जात आहेत.महागाई वाढतच आहे.त्यातच या वाढीने सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत केले आहे.लोकांची कर्जे वाढत आहेत.जगणे कठीण झाले आहे.रोजच्या वाढीना रोखणार कोण? वाढीना अंत दिसत नाही.सरकारचे या गोष्टीचे नियोजन नसल्याने जनतेला या वाढीना रोजच सामोरे जावे लागते. या वाढीवर सरकारचे केव्हा नियत्रंणात येणार?सरकारला पाहीजे तेथे वाढ होत राहते.पण सर्वसामान्याना जेथे वाढ पाहिजे  असते तेथे सरकार केव्हाच वाढ करीत नाही.काही वाढीने जनता सुखावते व काही वाढीने दुखावते.बेसुमार वाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.अनिर्बंध वाढीला प्रोत्साहन दिले जात आहे.

व्याजदरात वाढ,शैक्षणीक फी वाढ,चलनवाढ,वीज दरात वाढ,पेट्रोल व इधंन तेलाच्या दरात वाढ,पाणीपट्टीची वाढ,गँसच्या दरात वाढ, किमंतीत वाढ,कर्जात वाढ,भ्रष्टाचारात वाढ.

सोनेचांदीच्या भावात वाढ,क्राईममध्ये वाढ,सेन्सेक्समध्ये वाढ,औद्योगिक उत्पादनातील वाढ,मानधनात वाढ,पारितोषिकांच्या रक्क्मेत वाढ, अपघातात वाढ,करात वाढ,कर्मचाऱ्यांना डीए ची वाढ,कोठडीत वाढ,निधीत वाढ,आर्थिक वाढ,लोडशेडिंगमघ्ये वाढ,लोकसंख्येत वाढ,पगारात वाढ,

जीवनाश्यक वस्तुचे भाव भीडले गगना !!
ससांराचे बजेट सांभाळताना हैराण होती ललना !!

No comments: