११ . ११ . ११ ..... सहस्त्रकातून एकदाच येणारा हा योग !.. हा योग आजच आहे.
लग्न असो की बाळाचा जन्म ... घरखरेदी असो की कारखरेदी ..
' ११ . ११ . ११ ' चा मुहूर्त गाठण्यासाठी ज्याची त्याची धवपळ सुरू आहे .
मिडियाने या मुहूर्तला कँश केले आहे.आज ११.११.११.. आकड्यांचा खेळ घेऊन आलेली ही तारीख जगभर नाना प्रकारचे खेळ मांडून बसली आहे.
आज ११ वाजून ११ मिनिटांनी ११ सेकंदांनी वेळ असेल ११-११-११-११-११-११. कसा असेल, हा काळ?
प्रत्येक शतकात दिवस, महिना व सन निदर्शक एकच आकडा आहे अशी स्थिती असणारा एकमेव दिवस येतो.
शंभर वर्षांनंतर अवतरणाऱ्या 11-11-11 या जादुई आकड्याची अनुभूती घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला आहे. अनेकांनी या आकड्याचा मुहूर्त साधून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.
आकड्यांच्या चमत्काराला "लकी' मानणाऱ्यांनी 11-11-11 साठी पुन्हा एकदा जय्यत तयारी केली आहे.
"अकरा-अकरा'चा योग साधून विक्रम आणि उपक्रम करण्याची अभिनव कल्पना राबवल्या जात आहेत.
शंभराहुन अधिक विवाहेच्छुक जोडपी नोंदणी करण्याची शक्यता आहे.11-11-11 चा मुहूर्त साधून साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी विवाह नोंदणी कार्यालयात उद्या झुंबड होण्याची शक्यता आहे.
ब्लाँगर नी देखील या दिवशी एकतरी पोस्ट टाकावी.
No comments:
Post a Comment