खुप दिवसानतंर राजमाची वरची भटक़ंती करण्य़ाचा योग आला.सवंगड्याना ट्रेकची माहीती दिल्यावर जाण्यचे ठरले. थंडीची मजा घेण्यासाठी ट्रेकची तयारी करुन वेगवेगळ्या दिशेने येऊन लोणावळ्याला जमलो.तुंर्गालीला पोहचल्यानतंर चहा घेऊन पुढे निघालो.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन.पुढे जाताना हे दोन्ही बाल्लेकिल्ले नजरते आल्याब्ररोबर आमच्यात उत्साह वाढला.थंडी कमी असल्याने उन्हाचा त्रास झाला.
रमतगमत 'उंधेवाडी' गांवात पोहचण्य़ास दोन वांजले.गावात श्री.बबन सावंत यांच्याक़डे राहण्यासु उत्तम सोय झाली.आणलेले डबे उधडले.थोडासा आराम करुन 'श्रीर्वधन' या बाल्लेकिल्यावर चढाईला स्रुरुवात केली.भेरवनाथाच्या मदीरात दर्शन घतले.ह्ल्ली येथे नेव्ही चे ट्रेनींग सुरु आहे.
डाव्या बाजुच्या बुरुजुवरुन 'ढाकभैरी'दिसत होता व आम्हाला आव्हान देत होता.दुस-या बुरुजाहुन 'मिनी कोकणकडा' व लांबवर 'नागफणी'चे शिखर दिसत होते. गड फिरत फिरत उंच शिखरावर पोहचलो.तो पर्यत सुर्यास्ताची तयारी सुरु झाली होती.तो नयनरम्य सोहळा पाहण्यास आम्ही तेथे थांबलो.आकाशात विविध रंगाची उधळण सुरु होती.लाल रंगाचा तेजस्वी गोळा अस्त होताना अंधार होत गेला.सपुर्ण परीसरावर नजर फिरुन खाली उतरलो.
रात्री कँमफायर करीत दंगामस्ती केली.भाकरी व ठेच्या सह चविष्ट जेवण केले.
रात्री कँमफायर करीत दंगामस्ती केली.भाकरी व ठेच्या सह चविष्ट जेवण केले.
दोन दिवसापुर्वी त्रिपुरा पौर्णिमा झाल्यामुळे शुभ्रचांदणे पडल्याने गांवबाहेर फिरुन आलो.हवेत गारवा होता.
पहाटे लवक़र उठुन मनरंजन या बाल्लेकिल्यावर सुर्योदय पाहण्यास निघालो.हवा जोरात वाहत होती पण थंडी नव्ह्ती.गवत डोलत होते.गडावरुन लांबलांबवर लाईट्स दिसत होत्या.आकाशात गुलाबी छटा दिसायला लागल्या होत्या.
समोरच श्रीर्वधन किल्ला दिसत होता.त्याचा पाठुन सुर्योदय होण्याची शक्यता होती.आम्ही पहाटेची गाणी गात होते.ती वेळच प्रसन्न होती.थोड्याच वेळात सुर्याचा उदय झाले होते. लाल रंगाचा तेजाचा गोळा वर येताना दिसला झाला. खुप आनंद झाला.आम्ही सर्वजण आनंदाने ओरडत होतो.काही क्षणातच तो लाल गोळा खुप वरती आला होता. सकाळच्या सुर्याच्या किरणांमघ्ये गड फिरलो.वातावरणात प्रसन्नता होती.
पटापट खाली गावात उतरलो व तेथुन सरळ गोवर्धन मंदीर गाठले.पुरातन मंदिर पाहुन कँमे-यात उतरवण्य़ाचे आव्हान घेतले.समोरच तलावा थोडी डुंबण्याची मजा घेतली.भाकरी व पिठलाची लज्जत घेतल्यानतंर लगेच बँगा भरल्या.
'जय शिवाजी जय भवानी' घोषणा देत वाटेला लागलो.सरळ उभा उतार उरण्यास त्रास होत होता.गाणी गात सावध राहुन उतरत होतो.चढण्यापेक्षा खाली उतरणे कठीण असते याची जाणीव होते.
'कोंडाणे लेणी' पाहण्यास थोडी विश्रांती घेतली.काही ठिकाणी पाणी मिळाले ते गार पाणी भरुन घेत उल्हास नदीच्या पात्राच्या बाजुने शेवटची पट्टा संपवला.शेवटी शेवटी उन्हाचा त्रास जाणवला.ट्रेकची मजा कायम स्मरणात राहील.
!! जय महाराष्ट्र !!
1 comment:
Nice pics and information
Post a Comment