हेरगिरी व हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकेने ड्रोन या मानवविरहीत विमानातून विविध ठिकाणी हल्ले केले तेव्हापासून जगाला या 'ड्रोन' विमानाचे महत्व जगाला कळले.यापुढे अशाच मानवविरहीत युध्दसाम्रुगीनेच युध्द लढले जाणार याची ही नांदीच आहे. युद्धात आणि नागरी टेहळणीसाठी याचा जास्त वापर केला जाणार आहे.
तेव्हापासून दहशतवाद्यांच्या तळांचा अचूक वेध घेणा-या अमेरिकेच्या मानवरहित क्षेपणास्त्रवाहू 'ड्रोन'च्या तोडीच्या विमानांची निर्मिती भारताने सुरू केली आहे.महत्त्वाकांक्षी योजनेसह शस्त्रसज्ज मानवरहित वाहनाची निर्मिती करण्याचाही भारताचा विचार आहे. हवाई हल्ल्यांसाठी उपयुक्त या ड्रोन विमानांच्या बरोबरीनेच जमिनीवरील आव्हान परतवण्यासाठीही मानवरहित शस्त्रसज्ज वाहनांची निमिर्ती करण्याचाही विचार भारताने सुरू केला आहे.यामुळे जवानांचा जीव धोक्यात घालून केल्या जाणाऱ्या सशस्त्र कारवाईला सशक्त पर्याय उभा करता येणार आहे.
अमेरीकेने नेहमीच अफगाण व पाकिस्तान सीमेवर या मानवरहित क्षेपणास्त्र वापर केला आहे.दहशतवाद्यांकडून
मिळणा-या धमक्यांना भीक न घालता अमेरिका पाकिस्तानतील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर कायम ड्रोन विमान हल्ले करीत आहे.या वाढ्त्या ह्ल्ल्यामुळे अफगाण,पाकिस्तान व वझिरिस्तानात बिथरले आहेत.त्याना या मानवरहित क्षेपणास्त्रला कसे सामोरे जायाचे हा प्रश्न पडला आहे.यामुळे अमेरीका या क्षेपणास्त्र योग्य उपयोग करण्यात यशस्वी झाली आहे.अमेरीकेच्या सैनिकांनी अतिरेक्यांशी सामना न करताही तालिबानचे खतरनाक अतिरेक्यांचा खातमा करण्यात यश आले आहे.लादेनच्या खातम्यानंतरही अमेरिकेकडून पाकिस्तानमध्ये केले जाणारे ड्रोन हल्ले थांबलेले नाहीत.

स्पाय, ड्रोन विमानांकडून सातत्याने मिळणारे युद्धभूमीवरील व्हिडिओ,फोटो,शत्रूपक्षाचे ऑडिओ संभाषण आदींचा बारकाईने अभ्यास करून त्यातील कळीचे मुद्दे हे विश्लेषक मिलिटरी चॅटरूम्सच्या माध्यमातून युद्धभूमीवरील गुप्तवार्ता अधिका-यांना पुरवतात.ते नंतर रेडिओवरून आघाडीवरच्या लढवय्यांना पुरवले गेल्यास पुढचे निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे.शत्रुच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठीही याचा उपयोग होत आहे.खर्चिक असेल तरीही उपयोग मोठा असल्याने सर्वच देश या क्षेपणास्त्रनाचा वापर जास्त केला जाणार आहे.
येत्या काळात युद्ध आणि हेरगिरीसाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर वाढतच जाणार हे सिद्ध झाले आहे.तसेच नक्षलींविरोधी आपल्या देशातील लढ्यात हवेत 'ड्रोन' विमानाचा वापर करुन देशातील नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखल्या पाहिजेत.

1 comment:
good information .
Post a Comment