Tuesday, December 13, 2011

ही मंदीची चाहुल?


रुपया घसरला.शेअर बाजारांत झालेली घसरण, आंतरराष्ट्रीय परकीय चलनपेठेत अमेरिकन डॉलरचे प्रतिस्पर्धी परकीय चलनांच्या तुलनेत वधारलेले विनिमयमूल्य यामुळे भारतीय रुपयाच्या मूल्याची डॉलरच्या तुलनेत आज तब्बल ८१ पैशांनी घसरण झाली आहे.रुपयाच्या दराने सोमवारी गाठलेला नीचांक, मंगळावारी आणखी खाली गेला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मंगळवारी एका डॉलरसाठी ५३.१९ रुपये एवढे झाले. सोमवारपेक्षा ०.७ टक्के दराने झालेल्या या घसरणीमुळे रुपयाने आतापर्यंतची सर्वात खालची पातळी गाठली आहे.औद्योगिक उत्पादन घटल्याच्या वृत्ताने गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री करण्याचा सपाटा लावल्याने 'सेन्सेक्स' पुन्हा १६ हजार अंशांच्या पातळी खाली गेला.




अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी पुन्हा एकदा उच्च आर्थिक वाढीच्या मार्गावर आणणे, महागाई रोखणे आणि जागतिक प्रतिकूल आर्थिक घडामोडींपासून देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवणे, ही देशापुढील तीन प्रमुख आव्हाने सरकार समोर आहेत.

या आर्थिक वर्षात ( २०११ - १२ ) जीडीपी नऊ टक्के राहील,असा अंदाज होता.तो फोल ठरला आहे.' जीडीपी ' च्या अंदाजात घट करण्यात आली असून , तो साडेसात टक्क्यांजवळ राहील . यात पाव टक्का वाढ किंवा घट होऊ शकते. 

देशाच्या उद्योग क्षेत्राच्या उत्पादनात गेल्या ऑक्टोबरमध्ये ५.१ टक्क्यांची घट झाली आहे.


जागतिक अर्थव्यवस्था मंदीत जाईल आणि त्याचबरोबर भारतालाही त्याच फटका बसेल असा तज्ञांचे भाकित आहे.

निर्गुंतवणुकीबाबत अनिश्चितता आणि अनुदानासाठी अधिक तरतूद करावी लागण्याची शक्यता यांच्यामुळे २०११ - १२ मध्ये वित्तीय तूट ४.६ टक्क्यांवर राखले जाण्याची शक्यता कमी असल्याचे सरकारने स्पष्ट केले . 

युरोपातील वित्तीय पेचामुळे मागणीवर परिणाम झाल्याने नोव्हेंबरमध्ये निर्यात घटून ४.२ टक्क्यांवर आली असून, २२.३ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याचे सरकारने जाहीर केले. याच काळात आयात २९.१ टक्क्यांनी वाढून ३५.९ अब्ज डॉलरची आयात झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २१.४ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. 



भारताची आर्थिक वाढ मंदावली असल्याने आपण त्यास मंदी म्हणु शकतो.पण सरकार ते दाखवत नाही.



अर्थव्यवस्थेबद्द्ल रोज नवीन बातम्या येत आहेत.त्यातील बहुतेक आपल्या भविष्याच्या द्दष्टीने चांगल्या नाहीत. आपले पंतप्रधान अर्थतज्ञ असताना अशी परीस्थीती का व्हावी? जनतेला त्यांच्याकडुन मोठ्या अपेक्षा आहेत.

2 comments:

mynac said...

विवेक,
सर्व सामान्य माणसाला हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे,तथापि जे लोक शेयर बाजाराशी निगडीत आहेत त्यांना सुद्धा सध्या वरील प्रश्न भेडसावतो आहे.तथापि ५३२८ हे आजचे निफ्टीचे २०० DSMA (२०० दिवसाची निफ्टीची आज बाजार बंद होतानाची सरासरी) पहाता,नि मंदी सदृश परिस्थिती नि तिला पोषक अशा बातम्या पहाता,चुकून माकून येथून शेयरबाजार जरी वर गेला तरी तो फार काळ वर टिकेल असे बिलकुल चित्र नाही.२००८ मध्ये जेव्हा निफ्टी ६३०० होती तेव्हाचे रिलायंस,स्टेट बँक किंवा आय सी आय सी आय बँक ह्या सारख्या शेयरचे रेट पहा नि आज जेव्हा निफ्टी ५००० च्या आसपास आहे तेव्हाचे त्यांचे रेट पहा,म्हणजे वास्तवता काय आहे ते लगेचच लक्षात येईल.ते त्यांच्या त्या वेळच्या टॉपच्या तुलनेत आज २५% किंवा ५०% खाली आहेत,म्हणजेच खरे तर बाजार हा कधीच,पूर्वीच पडलेला आहे,तो बॉटम आउट होण्यासाठी निफ्टी,सेन्सेक्स ढेपाळणे फक्त बाकी आहे.त्या मुळे आत्ता हे विधान फारच धाडसी नि हास्यास्पद वाटेल पण सर्वच म्हणजे अगदी सोन्या सकट सर्व शेयरचे रेट हे त्यांच्या "आजच्या" रेटच्या किमान ५० टक्के होणे हा जागतिक मंदीचा भविष्यातील परिणाम म्हणून दिसला तर आश्चर्य वाटायला नको.अर्थात ते त्वरित होणे नाही तथापि अनपेक्षित गोष्टीच जेथे सदैव अपेक्षित असतात त्या सट्टे बाजारात हे "बिलकुल" अनपेक्षित नाही.

Anonymous said...

भारताची अंतर्गत बाजारपेठ मंदीचा धक्का शोषून घेऊ शकते असे मला वाटते.