Friday, December 23, 2011

भ्रूणहत्या मागचे एक कारण

शहरात मुली सुरक्षित नाहीत हे भ्रूणहत्या मागचे मुख्य कारण आहे. बड्या शहरांतील देहविक्रयाच्या काळ्याबाजारात अल्पवयीन मुलींचेच सर्वाधिक शोषण होत आहे.रेडलाइट एरियाममध्ये तरुणींच्या तुलनेत १४ ते १७ वयाच्या अल्पवयीन मुलींना जास्त ' मागणी ' आहे .या मुलीना  विकणा-यांना अधिक किंमत मोजली जाते. त्यामुळे अल्पवयीन मुलींच्या खरेदी - विक्रीचा बाजार तेजीत आहे .मुंबईत महिन्याला अशा सुमारे एक हजार अल्पवयीन मुली विकल्या जात असाव्यात. मुंबईत अल्पवयीन मुलींवर होणा-या बलात्काराची पोलिसांची आकडेवारी पाहिल्यास दर तिस-या दिवशी एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे लक्षात येते. अल्पवयीन मुलींचे फक्त देहविक्रीच्या बदनाम वस्त्यांमध्येच शोषण होते,असे नाही.मुबंई बाहेरच्या सुरक्षित जगातही त्या सुरक्षित नाहीत. या धंद्याचे आर्थिक गणित किमान १०० कोटींचे आहे थर्स्टी फर्स्ट सेलिब्रेशन ही अनेकांसाठी आनंदाची पर्वणी असते. परंतु या अल्पवयीन मुलींच्या दृष्टीने हा दिवस सर्वाधिक शोषणाचा व काळा दिवस मानला जातो.मुंबईतून अनेक ग्रुप परदेशातही पाठवले जातात.काही मुलीना नोकरीचे अमिष दाखवून फसविले जाते व या धंद्यात आणले जाते.या बाजारातील दलालाना मोठ्या व्यक्तिचा वरदहस्त असल्याने हे  दलाल  असले खुलेआम करतात. 
       

मस्तवाल पैसेवाले आपली मस्ती करण्यासाठी व सेक्सची भूक भागवण्यासाठी अल्पवयीन मुली वापरण्य़ाच्या
 विकृतीने हे 
शोषण सुरु झाले आहे.या अल्पवयीन  मुलींचे गरीब पालकच पैसे घेऊन शोषणासाठी काळे धंदेवाल्यांच्या हवाली करतात.नुकत्याच वयात आलेल्या मुलींना विकून पालक लाखो रुपयांची कमाई करतात .गरीब घरातील मुलींची विक्री होत असल्याने त्याना पैसा देऊन गप्प केल जाते.त्यांच्या मागे कोणीच नसल्याने त्या मुलीना  होणारे अत्याचार सहन करीत आयुष्य काढावे लागते.
   

या बाजारातून मोठमोठे व्यवहार खुलेआम पडतात.पण सबंधित यंत्रणा ह्या गोष्टीकडे काना डोळा करीत आपली झोळी
भरीत आहेत.शासनाने या यंत्रणेचे अधिकार काढुन घेतले आहेत का?  या देहविक्रीच्या बाजारात कोणते धंदे चालतात याची चौकशी केली जाते का? सगळ्या अत्याचाराना समंती दिली आहे.


समाजाला ही लागलेली किड काढण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही.या बाजारावर शासनाने निर्बंध घालण्याची गरज आहे.भ्रूणहत्यासाठी शासन,राजकीय नेते,सामाजिक संस्था जनजागृती करीत आहेत.पण या अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा विषय कोठेच चर्चेत येत नाही.   


पैशेवाल्यांचा हा हव्यास असाच वाढत गेला तर मुली सुरक्षित राहु शकणार नाही या भितीने भ्रूणहत्या वाढत आहेत. भ्रूणहत्या मागचे हे एक मुख्य कारण आहे.आपण मुलीचा वाचवू शकत नाही व त्याना सुरक्षितही ठेवू शकत नाही.ही समाजाच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे.

भ्रूणहत्या सह अल्पवयीन मुलींचे शोषण थांबवले पाहिजे.

No comments: