पुण्य़ातील अनुज बिडवे या भारतीय विद्यार्थ्याच्या लंडनमध्ये झालेल्या हत्येने भारतात तसेच ब्रिटनमधील भारतीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.अनुज बिडवे या भारतीय विद्यार्थ्याच्या लंडनमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.लँकेस्टर विद्यापीठात अनुज काही महिन्यांपूर्वीच आला होता, त्याचे करिअर नुकतेच आकार घेत होते, त्याच्या मृत्यूने आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत, त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,अशी प्रतिक्रिया लँकेस्टर विद्यापीठाचे डेप्युटी व्हाइस चॅन्सेलर प्रा. बॉब मॅकिन्ले यांनी दिली. बिडवे या कुंटुबावर ओढावलेला हा प्रसंग कुणाचेही हृदय हेलावणारा आहे.तरीही या कुंटुबाने आजवर जो सयंम दाखवला आहे.माघ्यमांशी बोलताना या कुंटुबातील सर्वानी सयंमितपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रकरणात मँचेस्टरच्या पोलिसांनी सोमवारी पुण्यात येऊन बिडवे कुटुंबाची भेट घेणे ही घटनाही ब्रिटनच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली आहे.तीन वरिष्ठ अधिका-यांनी पुण्यात येऊन कुंटुबाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे ही गोष्ट भारतात क्वचित घडणारी आहे.ही मंडळी त्यांच्या देशाची प्रतिमा डागाळु नये यासाठी हा दौरा केला आहे.पण आपल्या एकाही राजकारण्याने त्यांचे सांत्वन करण्याचे सौजन्य दाखवले नाही.निवडणुकांच्या रणघुमाळीत कोणाही नेत्याला या प्रकरणात कुंटुबीयांचे सांत्वन करण्यास वेळ नाही.ही मडंळी गलोगल्ली उदघटनांचा घमाका उडवणा-या छोट्यामोट्या राजकारणानी दुर्लक्ष केले आहे.या झालेल्या घटनेबद्द्ल खेद केला पाहिजे.
आपण परदेशींच्या वेगेवेगळ्या क्षेत्रातील संस्कृतीचे अनुकरण कायम करीत आहोत.मग आपले राजकारणी व नेतेमडंळी हे अनुकरण का करीत नाहीत? कोणत्या गोष्टीना महत्व देणे हे त्यांच्या सोयीने ठरवले जाते.
नको त्या गोष्टींचे अनुकरण करतो पण चागंल्या गोष्टींचे अनुकरण करण्यापासून लांब राहतो.हा आपला अनुकरणातला दोष आहे.
नको त्या गोष्टींचे अनुकरण करतो पण चागंल्या गोष्टींचे अनुकरण करण्यापासून लांब राहतो.हा आपला अनुकरणातला दोष आहे.
No comments:
Post a Comment