Saturday, January 14, 2012

आचारसंहिता


 


आचारसंहितेने शिस्त येते.
सरकरकडुन आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाते.पण आपल्या पक्षातील कोणाकडुन आचारसंहितेचा भंग केल्यास  कानाडोळा केला जातो.निवडणुक आयोगाने आचारसंहिता लागू केलेली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राजकीय आखाड्यात परस्परांना चीत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.मुंबई आचारसंहिता लागू झाल्यामुळे अनेक कामे तर थांबलीच आहेत.आचारसंहिता लागू झाल्यानंतर आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही.त्यामुळे त्यापूर्वीच अधिकाधिक योजनांना मंजुरी मिळविण्यासाठी सर्वच स्तरांवरील पदाधिका-यांची घावपळ सुरू झालेली आहे.प्रतेकाची नैतिक जाबाबदारी असते आचारसंहितेचे पालन झाले पाहिजे.गैरव्यवहार टाळण्यासाठी आचारसंहिता लागू केलीच पाहिजे.  आगामी पालिका व जिल्हा पंचायतीच्या निवडणूक काळात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता भंगाचा गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगकडुन आचारसंहिता भंगाची नोटीस पाठवली जाते.हल्ली सगळीकडे आचारसंहितेची बोबांबोम सुरु आहे.नेते मडंळीना या आचारसंहितेची पिडले आहे. कार्यकत्ते आचारसंहितेचा भंग होउ नये म्हणुन काळजीत आहेत व गपचुप कार्य करीत आहेत.
निवडणुकीचे टप्पे संपल्यामुळे निवडणूक आयोगाकडुन आचारसंहिता शिथिल केली जाते.

प्रत्येक यंत्रणा आपलल्या आचारसंहितेचे पालन करीत असतात.संसद,विधानसभा,लोकसभांपासुन पोलिसठाण्यापर्यत सर्वजण आचारसंहितेचे पालन करीत असतात.


                                                                     =**=


सरकारी बाबूंना त्यांच्या संघटनेने भ्रष्टाचारमुक्त होण्याकरिता कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिले .
घरी जाताना एक आचारसंहिता त्यांच्या हातावर ठेवली ...


कार्यालयातील टेबलाचा ड्रॉवर उघडा ठेवू नका .
सहा खिशांचे सफारी घालून कार्यालयात जाऊ नका .
कामाकरिता आलेल्या व्यक्तीकडे चहापाणी,भेटीगाठी असे शब्द उच्चारू नका .
सरकारी कार्यालयाबाहेरील पानवाला,चहावाला,झेरॉक्सवाला यांच्याशी घसट निर्माण करून लोकांत उगाच गैरसमज निर्माण करू नका.
आपल्यासमोर फायलींचा गठ्ठा साठून विनाकारण अपप्रचार होणार नाही,याची काळजी घ्या .
कामाकरिता आलेली व्यक्ती समोर बसली असताना मुलाकरिता मॅनेजमेंट कोट्यातून अँडमिशन घ्यायचेय,मुलीच्या लग्नाकरता सोने घ्यायला सुरूवात करायचीय असे विषय काढू नका .
घरात नवा एसी बसवायचाय किंवा वॉशिंग मशिन जुनं झालय या गप्पा समोर कामाकरिता आलेली व्यक्ती बसली असताना बायकोशी करू नका .
सुट्टीच्या दिवशी घरातल्या आरशासमोर दागदागिने घालून उभे राहा .
ज्या व्यक्तीचे तुमच्याकडे काम आहे त्याच्याकडे लिफ्ट मागू नका .
दिवाळीला येणा्रया प्रत्येक व्यक्तीकडे आशाळभूताप्रमाणे पाहू नका .
शेजारच्या टेबलावरील व्यक्तीची कमाई जास्त आहे आणि आपल्यावर नेहमीच अन्याय होतो अशा गोष्टी सांगत गावभर फिरू नका.
काम न झाल्यानं बिथरलेला आमदार आला तर श्रीमुखात खा पण बेकायदा काम करू नका.
मंत्र्याने बोलावून गैरकायदा काम सांगू नये याकरिता मी अण्णा हजारे असे लिहिलेली गांधी टोपी घालून मंत्र्याच्या दालनात जा .
आपली मोटार घेऊन कार्यालयात जायचेच असेल तर फर्लांगभर अंतरावर ती उभी करा आणि बसने कार्यालय गाठा .
सूर्यास्त होताच पाय तिकडे ओढले जात असतील तर दिवसभर कार्यालयात तुमच्यासमोर बसलेल्या माणसाला सोबत घेऊन बसू नका .
आपल्या छंदाकरिता सरकारी पदाचा गैरवापर करू नका .
आचारसंहितेचा हा कागद खिशात ठेवून मधेमधे वाचत जावा .

अशा आचासंहितेच्या मजेशीर अटी वाचण्यात येतात.

No comments: