Thursday, March 1, 2012

हुक्क्याला रोखा

                           आजचे   युवक  'हुक्का'  या नव्या   फँशनच्या    आहारी जात    आहेत त्याला   रोखले पाहिजे.
मुंबईत ठिकठिकाणी हुक्का पार्लर असल्याने शाळा-कॉलेजांतील मुलांचा तेथे मोठ्या प्रमाणात राबता असल्याचे निर्दशनास आले.तंबाखू-सिगारेटपेक्षाही घातक असतानाही ऐश करण्याची तल्लफ शमविण्यासाठी 'टीन एजर्स'वर हुक्का पार्ट्यांचा विळखा पडत आहे. शहर व परिसरातील हुक्का पार्लर्समध्ये जाणाऱ्यांमध्ये १७ ते २२ या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय बनली आहे. इतकेच नव्हे, तर मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा हक्काचा अड्डा म्हणून या पार्लर्सचाच पत्ता दिला जात आहे. अनेक ठिकाणी गुपचूपपणे अशा हुक्का पाटीर्ज किंवा हुक्का नाइट्सचे आयोजन केले जाते.


'कॅफे कॉप्या प्युरो... कॉफीचा मग , मद्याचा ग्लास , सोबत हुक्का या सरंजामासह रात्र रंगीन करण्याची क्रेझ  निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे नुसत्या तरुणांसह उच्चभ्रू स्त्री वर्गाशी या हुक्क्याने अगदी दिलजमाई केल्याचे दिसून येत आहे.सिगरेट, हुक्का या व्यसनांकडे 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन शहरी महिलांमधे जोमाने वाढत आहे.काही बड्या लग्नातही खानपानाच्या सोयीबरोबरच फ्लेवर्ड हुक्क्याचीही हल्ली सोय करण्यात येते. 

हुक्का या व्यसनाचे  दुष्परिणामांबाबतही हि युवक मंडळी अनभिज्ञ आहेत.नियमित हुक्का सेवन करणा-यांपैकी ८० टक्के युवक हे १७ ते २२ या वयोगटातील आहेत, तर १५ टक्के २२ ते २५ आणि पाच टक्के हे १२ ते १६ वयोगटातील आहेत. यातील सुमारे ९० टक्के युवकांना हुक्क्यामध्ये तंबाखू असते,हे ठाऊक नाही. तर ७५ टक्के विद्यार्थ्यांना हुक्का हा सिगारेटपेक्षा कमी हानीकारक वाटतो.या गैरसमजुतीना बळी पडत आहेत.

भारतीय बनावटीच्या  हुक्का तुलनेने स्वस्त असल्याने निकोटिनचे प्रमाण अधिक असते.भारतीय फ्लेवर्स अतिशय स्वस्त असल्याने त्याला विद्यार्थ्यांची अधिक पसंती आहे. हुक्क्याच्या नियमित सेवनातून निकोटिनची सवय लागण्याची शक्यता असते. सणासुदीला आणि वाढदिवस दिन,फ्रेंडशिप डेसारख्या स्पेशल ऑकेजन्सला हल्ली  हुक्का पार्टी आयोजित केल्या जातात.हुक्क्याचे साहित्य हुक्क्याचे भांडे, फ्लेवर्स आणि हुक्का ओढण्याचे पाइप्स याची मोठ्या प्रमाणात विक्री वाढत आहे.

व्हाया हुक्का ही मुलं-मुली सिगारेटच्या जाळ्यात ओढली जातात. या मुलांना याचा पत्ताच लागत नाही. सुरुवातीला असणा-या उत्सुकतेच पर्यावसान नंतर व्यसनात होते. तरीही या हुक्क्याची मुलांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. मुंबईतील हुक्का बारमध्ये अल्पवयीन मुलांना हुक्क्याची विक्री करण्यात येत असून त्यामुळे धुम्रपानविरोधी कायद्याचा भंग होत असल्याचा मुद्दा एरणीवर आला आहे.


 महापालिकेनी या पार्लरवर कारवाईचा बडगा उगारुन अनधिकृतपणे चालणारे असंख्य पार्लस बंद केल्यास हि पिढि या व्यवसापासून थोडी लांब राहिल.पण यांचे प्रबोधन करणे जास्त गरजेचे आहे.प्रत्येक काँलेजने असे प्रबोधनाचे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले पाहिजेत.
  

हुक्क्याच्या विक्रीला मनाई करणाऱ्या मुंबई पालिकेच्या परिपत्रकावर हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे.पण या धंद्यात मोटःया लोकांचा सहभाग असल्याने कारवाई पाहिजे तशी होत नाही.

हुक्का पार्लर्सची वाढती संख्या पालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.शहारातुन हुक्का तडीपार केला तरच नवीन पिढी व्यसनाधिन होणार नाही.
 

No comments: