चैत्र येताच कोकिळ भल्या पहाटेसच कूजन करतो. कुहू कुहू .या मधूर स्वरात तो गात असतो.पहाटे पहाटे
कोकिळ गाताना ऐकल्यावर ऐकत राहवेसे वाटते. कोकिळ पक्षी आपल्या सुमधूर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो.आवाजाच्या दिशेने झाडांवर पाहिल्यास पानात लपलेला कोकिळ काही पटकन दिसत नाही.प्रथम कावळ्यासारखा दिसतो. पानांत लपलेला कोकिळ कुहू कुहू करत प्रणयाराधन करायला लागतात.चार दिवसांपूर्वीच मुंबईत चक्क कोकिळाचे कूजन कानी पडले आणि वसंत ऋतूच्या आगमनाची अकस्मात चाहूल लागली.ही जाणीव खरेच आनंददायी होती.सर्व भारतीय भाषांतील साहित्याला या कोकिळकूजनाने मोठी शब्दकळा दिली.कोकिळ पक्षी प्रेमाचा व सहानुभूतीचा संदेश देतो.
कोकिळ गाताना ऐकल्यावर ऐकत राहवेसे वाटते. कोकिळ पक्षी आपल्या सुमधूर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो.आवाजाच्या दिशेने झाडांवर पाहिल्यास पानात लपलेला कोकिळ काही पटकन दिसत नाही.प्रथम कावळ्यासारखा दिसतो. पानांत लपलेला कोकिळ कुहू कुहू करत प्रणयाराधन करायला लागतात.चार दिवसांपूर्वीच मुंबईत चक्क कोकिळाचे कूजन कानी पडले आणि वसंत ऋतूच्या आगमनाची अकस्मात चाहूल लागली.ही जाणीव खरेच आनंददायी होती.सर्व भारतीय भाषांतील साहित्याला या कोकिळकूजनाने मोठी शब्दकळा दिली.कोकिळ पक्षी प्रेमाचा व सहानुभूतीचा संदेश देतो.
कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो नर कोकिळ पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो.खरे तर कुहू-कुहू-कुहू कोकिळ चे गायन असते वरील कोकिळेच्या रंजनार्थ.
पूर्वी रानात फिरताना या कोकिळ आम्ही पिडायचो व चिडवायचो.त्याच्या सारखाच कुहु कुहु आवाज काढत त्याला चिडवायला मजा यायची.
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकिळ पक्ष्यांचा वीणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाही.मार्च ते ऑगस्ट हा कालावधी कोकिळ पक्ष्यांचा विणीचा हंगाम असून तो कावळ्यांच्या विणीच्या हंगामाशी जुळणारा आहे. या काळात नर कोकिळ कुऽऽऊ, कुऽऽऊ अशी साद घालतो. कोकिळेचा आवाज नरापेक्षा वेगळा असतो, ती बुड, बुड, बुड असा आवाज काढते किंवा एका झाडावरून दुसर्या झाडावर उडत जाताना किक्, किक्, किक् असे सूर काढते. तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाही. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी तिला दिसेल अशा कोण्त्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी सोडून जाते.
कावळा हा कोकिळ पक्ष्याचा आश्रयी आहे. कोकिळा आपली अंडी बहुधा कावळ्यांच्या घरट्यात घालते. कावळ्यासारख्या हुशार पक्ष्यांवर बुद्धिचातुर्याने मात करताना कोकिळ सोपी क्लृप्ती लढवतो. कोकिळा कावळ्याच्या घरट्याजवळ लपून बसते आणि कोकिळ घरट्याजवळ येतो, मोठ्याने शीळ घालतो, कावळ्याला स्वत:चा पाठलाग करायला लावतो आणि हुलकावण्या दाखवीत तो कावळ्याला घरट्यापासून दूर नेतो. मधल्या काळात कोकिळा शिताफीने घरट्यात शिरून अंडे घालते आणि त्याचवेळेस ती कावळ्याचे एक अंडे बाहेर फेकते. अशा प्रकारे कावळ्यांच्या कित्येक घरट्यांत ती अंडी घालते. साधारणपणे कावळ्याच्या एका घरट्यात ती एक किंवा दोन अंडी घालते.
साद कोकिळ घालतो कधी वसंत येईल
पान गळल्या तरुला नवी पालवी देईल
कसा मोहराच्या आधी चोहिकडे परिमळ
वा-यांतून तरंगत येई वसंत चाहुल
शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून. कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच.गुलमोहर फुलायला लागतो. लाल पलाशाला लालबुंद फुलांचे झुपके येतात.सोनमोहर फुलतो पिवळ्या फुलांनी.ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे उद्या अधिकृतपणे आगमन होत आहे.हा वसंत सर्वांना सुखकर होवो आणि सर्वांच्याच आयुष्यात आशांची आणि स्वप्नांची नवी टवटवीत पालवी घेऊन येतो. खरेच नव्या आशांना अंकुर फुटलेले पाहण्याची आपल्याला नितांत मानसिक गरज आहे.
आज कित्येक ठिकाणी कावळा आणि कबुतरांप्रमाणेच अबोली पंख आणि लालचुटुक डोळ्यांचा भारद्वाज,साळुंकी, कोकिळ असे पक्षी शहरी लोकवस्तीमध्येही दिसतात.
काही पक्षीप्रेमीनी 'कुहू कुहू ' ही शिळ आपल्या मोबाईलवर रिगटोंग ठेवली आहे.त्यामुळे प्रवासात पण कुहू कुहू ही शिळ ऐकायला येते.
No comments:
Post a Comment