Monday, April 9, 2012

देणगी नाकारावी.

अजमेरच्या संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याला पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी रविवारी भेट दिली. त्यांनी दर्ग्याला दहा लाख डॉलरची (सुमारे पाच कोटी रुपये) देणगीही जाहीर केली. झिया उल हक आणि परवेझ मुशर्रफ यांच्यानंतर अजमेरला भेट देणारे झरदारी हे पाकिस्तानचे तिसरे अध्यक्ष ठरले.दर्ग्याच्या दर्शनासाठी पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. जे भाविक अजमेरला दर्शनासाठी येऊ इच्छितात,त्यांना भारत सरकारने व्हिसाही लवकर द्यावा, अशी सूचना र्दग्याच्या समितीने केली आहे. दिल्ली-अजमेर बस सुरू करण्याचीही सूचना दर्ग्याच्या व्यवस्थापन समितीने केली आहे.

दर्ग्याला पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी दिलेली देणगी दर्ग्याच्या व्यवस्थापन समितीने नाकारावी.पाकिस्तान हा आपला शत्रु आहे.त्याची कोणतीही मदत स्विकारु नये.जो देश आपल्या देशात दहशतवादी कारवाया करण्यास छुपा पाठिंबा व मदत करीत आहे.त्यांच्या कडुन मदत घेणे योग्य नाही.
 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद आणि इतर आरोपींवर कारवाई झाल्यानतंरच पाकिस्तानशी मैत्री होऊ शकते अशा कड्क भाषेत पाकच्या अध्यक्ष असिफ अली झरदारी याना सुनावले आहे.आणि त्यांच्या कडून आपण देवस्थानासाठी मदत घेणे योग्य वाटत नाही.


भारताविरोधातील कारवायांसाठी पाकच्या भूमीचा होणार वापर होत आहे.एकीकडे दहशतीवादी कारवाया करायच्या व दुसरी कडुन मदत म्हणजे प्रथम मारायचे व नतंर मदत करायची.दहशतवादाविरोधात आधी पाकने पावले उचलावीत नतंर देवस्थानाना मदत करावी.असल्या लोकांकडून मदत घेणे बंद करावेत.

दर्ग्याला देशातील भाविक मोठ्या संस्खेने मदत करीत असताना देशाबाहेरील व्यक्तीकडून अशी मदत घेणे देशातील भाविकांना मान्य आहे का?


No comments: