सध्याचा जमाना 'सोशल नेटवर्किंग'चा आहे.सोशल नेटवर्किंग हे मतं मांडण्याचे व्यासपीठ आणि संवाद साधण्याचे साधन झाले आहे.नेटविश्वात सध्या ब्लॉग्ज , ऑर्कुट , फेसबुक , ट्विटर ही सोशल नेटवर्किंगची साधनं लोकप्रिय ठरली आहेत. हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सोशल नेटवर्कीग करणा-यांचे प्रमाण वाढत आहे.'सोशल नेटवर्किंग'हे संपर्काचे सशक्त माध्यम आहे.त्यामुळे एखादी वेबसाइट किंवा ऑनलाइन चॅटिंग कट्ट्याऐवजी ते मित्रांबरोबर,कुटुंबातील सदस्याबरोबर वेळ व्यतित करीत आहेत.फेसबुक, टिव्टर, हायफाय अशा वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करत फ्रेण्ड सर्कल वाढवण प्रतिष्ठेचे समजले जाते.एकाचवेळी आपल्या हजारो मित्रांपर्यंत पोहचवणारी ही मायाजालातील सोशल नेटवर्किंग सिस्टिम सध्या बहुतेकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनली आहे. व्यक्त होण्यासाठी उपलब्ध झालेल्या या व्यासपीठाचा शाळकरी मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत व महिलांचा वापर वाढत आहेत.एकमेकांच्या आवडत्या विषयांवर चर्चा, रोजच्या घडामोडी, एखादी चळवळ सुरू करण्यापासून अगदी डेटिंग, प्रेमप्रकरणांपर्यंत आहे. पुस्तकप्रेमींसाठी, शाळेतल्या मुलांसाठी, कॉलेजच्या मुलांसाठी, प्रवासाची आवड, फोटो शेअरिंग, नुसत्या गप्पा हाडदण्यासाठी वेगवेगळ्या साइटही तयार करण्यात आल्या आहेत.
तरुण किंवा शाळकरी मुलं प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल नेटवर्किंग साइट्सवर भेटणे, शेअर करणे अधिक पसंत करतात. पूर्वी दहावी-बारावीचा निकाल लागले की, आपल्या नातेवाईकांना मित्रांना भेटून आनंद शेअर केला जात असे, मात्र आता तरुणाई हे आनंद फेसबुकवरून शेअर करू लागली आहे. तरुणाईला व्यक्त होण्यासाठी हे माध्यम योग्य वाटते. अगदी लग्न ठरलं इथपासून ते त्याचं आमंत्रण देण्यासाठीही तरुणाई या माध्यमाचा सहज वापर करते. पण फेसबुकवर असलेली वयाने थोडी मोठी मंडळी म्हणजे मध्यमवयीन पिढी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवरचे शेअरिंग अधिक पसंत करतात. आपल्या आयुष्यात नवं काही घडल्याचा आनंद, दु:ख जगाशी शेअर करण्याचं व्यासपीठ बनलेल्या सोशल नेटवर्किंग क्षेत्रावर गेली पाच-सात वर्षे अधिराज्य गाजवणा-या फेसबुकची लोकप्रियता क्षणाक्षणाला युजर्सच्या रूपात वाढत आहे.
जगभरात मिळून जितका वेळ 'सोशल नेटवर्किंग'वर खर्च करण्यात येतो, ट्विटर, फेसबुकसारख्या वेबसाइटवर एकूण युजर्सपैकी महिलांचे प्रमाण तब्बल ५८ टक्के इतके आहे. त्यातही 'फेसबुक' आणि 'ट्विटर'वर महिलांची उपस्थिती अधिक असल्याची बातमी वाचण्यात आले आहे.महिलांनी आपल्या गुजगोष्टी शेअर करण्यासाठी 'सोशल नेटवर्किंग'ला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे. महिलांनी या क्षेत्रातही पुरुषांना कधीच मागे टाकल्याचे दिसून आले आहे.महिला बहुतांश भावना आणि नातेसंबंधांविषयीची माहिती फेसबुकवर अपलोड करतात.
जगभरात दिवसभरात महिला ८१ मिनिटे तर पुरुष ६४ मिनिटे फेसबुकवर व्यतीत करतात असे या निर्दशानात आले आहेत.मग भारतात काय परीस्थीती आहेत? भारतासारख्या देशात सोशल नेटवर्कीग सकारात्मकरित्या वापरले गेले तर क्रांती घडू शकते.
जगभर या साइटसचा वापर करून आंदोलने,चळवळी उभ्या राहत आहेत.भारतातही अशा ऑनलाइन लोकचळवळींना सुरुवात झाली असून भविष्यात त्या सत्तापालटही घडवू शकतील. सोशल नेटवर्कीग या शब्दांचा खरा अर्थ जोडून त्याने समाज जोडायचा ठरवला तर नक्कीच परिवर्तनाचे वारे वाहू लागतील.
'सोशल ड्रिंकिंग'च्या गोंडस नावाखाली अलीकडे सिगारेट,हुक्का किंवा मद्याचे सेवन करणा-या महिलांची संख्याही वेगाने वाढते आहे.
जगाप्रमाणे भारतातही महिलांचा 'सोशल नेटवर्किंग'मघ्ये सहभाग वाढला पाहिजे.त्यानाही आपली मते मांडता येतील.विद्यार्थी व सामाजिक कार्य करणा-या महिलांचा सहभाग आहे.पण गृहीणींचाही या 'सोशल नेटवर्किंग'मघ्ये सहभाग वाढला पाहिजे.

No comments:
Post a Comment