देशातले मोठे राजकारणी राष्ट्रपती निवडनुकीत गुंतल्याने रुपयाच्या घसरणीकडे लक्ष देण्यास वेळ नाही.देशाचे अर्थमंत्रीही राष्ट्रपती पदाच्या शर्थतीत आहेत.अर्थमंत्री या नात्याने प्रणव मुखर्जी यांनी काही ठोस पावले टाकली पाहिजे.रुपया टिकवण्यासाठी ‘आमच्याकडे मर्यादित पर्याय आहेत’ असे सरकार आणि रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
डॉलरला मागणी कायम राहिल्याने रुपयाचे मूल्य सुधारले नाही.आयतदारांकडून डॉलरला सातत्याने मागणी राहिल्याने सत्रांतर्गत व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे.युरोपातील वित्तीय पेचामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे देशाच्या निर्यातीवर त्याचा परिणाम झाला असून,व्यापार तूट वाढण्याबरोबरच करंट अकाउंटवरील तूट वाढली आहे ; तसेच भांडवली ओघ कमी झाला आहे, रुपयाचे मूल्य घसरण्याबरोबर शेअर बाजारात घट झाली आहे. जागतिक परिस्थितीमुळे वाढीचा वेग मंदावला आहे.
युरो क्षेत्रातील घसरणीमुळे रुपया घसरतोय असे सरकार सांगते. जागतिक अर्थकारणातील चढउतारातून आर्थिक अनिश्चिततेचे हे संकट उद्भवले आहे. रुपयाला दुबळा करण्यात आपले वाढते आयात बिल हेही एक मोठे कारण आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २0 अब्ज डॉलर्सचे विदेशी ऋण यावर्षी परत करायचे आहे.
रुपया घसरतोय म्हणजे नेमके काय होते? देशाचे चलन दुबळे होणे ही बाब निर्यातदारांसाठी वरदान ठरू शकते. कारण त्यांचा नफा वाढतो. पण महागाईत भरडल्या जाणार्या जनतेच्या अडचणी सारख्या घसरणार्या रुपयामुळे आणखी वाढणार आहेत.
भारत दरवर्षी अडीच लाख कोटी रुपयाचे परकीय चलन पेट्रोलियम पदार्थ आयातीसाठी खर्च करतो. रुपया घसरल्यामुळे आता आपल्या देशाला ६0 ते ६५ हजार कोटी रुपये जास्तीचे द्यावे लागतील.व्यापारातील तूट आणखी वाढेल.रुपयाच्या घसरणीमुळे आयात केलेल्या उपभोगाच्या वस्तू तर महाग होतीलच. पण उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, धातू हे देखील महाग होतील. उद्योगविश्वही महागाईच्या वणव्यात होरपळून निघते आहे. औद्योगिक उत्पादन वाढीचा दरही घसरला आहे.
आता प्रश्न हा आहे की, रुपयाची घसरण कशी थांबवायची? सरकारला काही धोरणात्मक निर्णय करावे लागतील. परदेशातल्या गुंतवणूकदारांना आपल्या शेअर बाजारात पैसा गुंतवण्यापेक्षा अमेरिकन सरकारच्या रोख्यांमध्ये पैसा गुंतवणे अधिक सुरक्षित वाटते आहे. त्यामुळे भारतात त्यांनी गुंतवलेले डॉलर्स काढून ते भारताबाहेर पाठवत आहेत. वीज प्रकल्प, टेलिकॉम उपकरणे, उपभोग्य वस्तू, सोन्याचांदीसाठी आयात होत आहे. त्यामुळे व्यापारातील तोटाही वाढत आहे. चीनमधून मोठय़ा प्रमाणावर माल भारतात येतो आहे. त्यामुळे रुपया तर दुबळा होत आपल्या उद्योगांनाही तडाखा बसला आहे. पेट्रोलियम पदार्थांचे वाढते बिल पाहता सौरऊर्जा, पवनऊर्जा या सारख्या स्रोतांना प्रोत्साहन म्हणून उपाय योजले पाहिजे.
देशात आर्थिक मंदी येण्याअगोदर रुपयाची घसरण रोखली गरजेचे झाले आहे.तसे कठोर उपाय योजले पाहिजेत.नाहीतर पुढील दिवस कठीण आहेत.
No comments:
Post a Comment