Wednesday, May 30, 2012

दोन खान


 ह्ल्ली सिनेमासृष्टीतले दोन खान प्रसिध्दीच्या झोतात आहेत..एक अमिर तर दुसरा शाहरुख खान.वेगवेगळ्या कार्यासाठी प्रसिध्द आहे.एकाला समाजात मान मिळत आहे तर दुसराल्या शिव्या पडत आहेत.एक सामाजिक कार्यासाठी आणि दुसरा बेफिकीरेने वागण्यामुळे.पहिला खान देशातील सामाजिक समश्या सरकारपुढे मांडत आहे.त्या कार्यासाठी तो   पैसा जमवित आहे.तर दुसरा खान कायदे न पाळता कायदा आपल्या हाती घेत दंगामस्ती करीत पैशाची उधळण करीत आहे.
  
  
आमिर खानसारख्या वलयांकित अभिनेत्याने सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन देणारा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम बघून ...जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा आहे असे वाटते.‘सत्यमेव जयते’ला आमीरमुळे प्रसिद्धी मिळत आहे. आमिर खानचा 'सत्यमेव जयते' हा रिअलिटी शो पाहिल्यानंतर आज समाजाला उच्च कोटीच्या नैतिकतेची किती आवश्यकता आहे याची जाणीव होत आहे.‘स्त्रीभृणहत्या’ हा ज्वलंत विषय,हुंड्याची समस्या  व मुलांवरील लैंगिक अत्याचारच्या वादाला तोंड फुटले. याआधी राज्यसभेत पास झालेले ‘बाललैंगिक शोषणा’साठीचे विधेयक लोकसभेत अमान्य करण्यात आले होते, मात्र लोकसभेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या दिवशी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला गेला आणि विधेयक पासही झाले. हे बदल नक्कीच समाजाच्या हितासाठी आहेत.सामाजिक बांधिलकी ठेवत आमिर खान सामाजिक कार्य करीत आहे. 
कोलकाता नाइट रायडर्सचा संघमालक शाहरुख खानने बुधवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांशी केलेली बाचाबाची आणि सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की त्याच्या अंगाशी आली आहे.वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकांना त्याने मारहाण केली. शिवीगाळ केली. दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचा आरोप त्याच्यावर आहे.  त्यामुळे शाहरुखने केलेल्या गैर वर्तनाबद्दल एमसीएच्या सर्व सदस्यांनी त्याला दोषी ठरवले असून त्याला वानखेडे स्टेडियमवर पुढील पाच वर्ष दर्शक म्हणून बंदी घालण्यात आली आहे.वानखेडेवरदेखील शाहरूखने पुन्हा ‘माय नेम इज खान’ दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेही खानाचा हा शो फ्लॉपच झाला! अमेरिकेच्या विमानतळावरील सुरक्षा रक्षक शाहरुख खान यांना चार-पाच तास अडकवून ठेवतात. त्यांचे कपडे उतरवून झडती घेतात तरी खान यांचा रागाचा पारा चढत नाही व ते पुन: पुन्हा अमेरिकेत जाऊन स्वत:चा अपमान करून घेतात; पण वानखेडेवरील गरीब सुरक्षा रक्षकांशी मात्र ते हुज्जत घालतात.

एप्रिल महिन्यात आयपीएल खेळांच्या दरम्यान जयपूरच्या सवाई माधोसिंग मैदानात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना शाहरुख कॅमे-यात कैद झालेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या आयपीएल मॅचमध्ये शाहरुख खानला सिगारेट पिताना टीव्हीवर अनेकांनी पाहिले होते.जेव्हा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतो तेव्हा तो नकळत एक चुकीचा संदेश तरुण चाहत्यांपर्यंत पोहचवतो. शाहरुखने सामाजिक कार्य नाही केले तरी समाजाला त्रास देउ नये.


No comments: