सकाळी बाहेर पडताना मोठ्या मोठ्याने रडण्याचा आवाज एकु आला.बाहेर जाऊन पाहिले तर पहिल्यांदा शालेत जाणारा मुलगा रडत होता.मुलाने शाळेचा नवीन गणवेष घातलेला व दप्तर आणि पाण्याची बाटली आईने घेतली होती.मुलाची आई मुलाला शाळेत घेऊन निघाली होती.मुलाला शाळेत जायचे नसल्याने तो रडत होता.मुलाची आई मुलाला शांत समजवत होती.पण त्याचा हट्ट सुरु होता शाळेत न जाण्याचा.हा प्रसंग पाहिल्यानतंर मला माझ्या मुलाची आठवण झाल्याने हसू आले.

माझ्या मुलासाठी सर्व मुलाप्रमाणे शाळा सुरु होण्याआधी शाळेची सामुग्री उत्सहात खरेदी केली होती.नवा गणवेष,पाटी पेन्सिल,दप्तर,पाण्याची बाटली,रेनकोट व शुज ही शाळेत जाण्यासाठी लागणारी साधने बाजारत जाउन खुशीत आणली होती.घरात या वस्तु घालुन घरभर नाचयचा व उड्या मारीत असायचा.खुषीत होता.शाळेत जाण्याचा दिवस जवळ येत होता.घरातल्यांसमोर गणवेष घालुन फिरायचा तसाच शेजा-यांकडेही जाउन याचचा.
शाळेत जाण्याचा दिवस आला.सकाळी नेहमीप्रमाणे उठून तयारी सुरु झाली.रोजचा उस्ताह दिसत नव्हता.गणवेष चढला दप्तरात डबा भरला.आजोबाना नमस्कार करुन बाहेर पडण्यास दारात आला आणि भोकाड पसरले.घरातले व शेजारचे सर्व जण त्याला पाहायला जमले.सगळे हसातला लागले.कालपर्यत मजेत होता.मग आजच शाळेत न जाण्याचे कारण काय ते सर्वाना समजेना.शाळेत आपल्या घरातील कोणच नसणार या कल्पनेने तो धाबरला होता.त्याला सर्वानी समजवण्याचा प्रयत्न केला.पण तो काही एकत नव्हता.तो हट्टी झाला होता.कपडे काढायला लागला.हसू येत होते त्याच्या कडे पाहुन. थोडा शांत झाल्यावर त्याला मी उचळुन घेतले व तसाच निघालो.शाळेत जाईपर्यत शांत होता.शाळेत शिरल्याबरोबर पुन्हा रडण्यास सुरुवात केली.त्याप्रमाणे इतर काही मुल रडत होती. नवीन येणारी मुले रडतच येत होती.काही शांत असलेली
मुले याना पाहुन रडायला सुरुवात करीत होती.त्याच्या आया मुलाना शांत करण्याच्या प्रयत्नात होत्या.
मुले याना पाहुन रडायला सुरुवात करीत होती.त्याच्या आया मुलाना शांत करण्याच्या प्रयत्नात होत्या.
शेवटी शाळेतल्या शिक्षीकेने रडणा-या मुलाना घरी घेऊन जाण्यास सांगितले. असे काही दिवस हा प्रकार सुरु होता.आईने मला संगितले तु पण असाच शाळेत जाण्यास तयार नव्हतास.जबरदस्तीने शाळेत ढकळुन द्यावे लागायचे.शालेची भीती खुपश्या मुलांमघ्ये असते.त्यामुळे ही रडारड शाळेच्या सुरुवातीला होते.सर्वात जास्त मुलाच्या आईला काळजी असते. मुल शाळेत व्यवस्थित गेल्यास तिला आनंद होतो.
काही दिवसानी मुलांची मित्रमडंळी झाल्यानतंर शाळेत जाण्याची आवड निर्माण होते.
नव्या ग़णवेषाचा रुबाब
पाठीवरती चिऊ काऊचं चित्र असलेली रंगीत संगीत दप्तर
हातात झुलणारी पाण्याची बाटली
नव्या ग़णवेषाचा रुबाब
पाठीवरती चिऊ काऊचं चित्र असलेली रंगीत संगीत दप्तर
हातात झुलणारी पाण्याची बाटली
आईच्या मायेच्या पदराची साथ काळासाठी हातातोन सुटण्याची अनेकांची ही पहिलीच वेळ
मग रडण्याचे शक्य ते सर्व प्रकार अनेक छोट्यांनी शाळाशाळांत लीलया करुन दाखवले
शाळा सुटल्यानतंर मायेचा पदर पुन्हा हाती पडल्यनतंर त्यांना हायसं वाटलं
आणि मग त्यांचा आग्रह सुरु झाला तो 'लवकर घरी चल ना' असा!
No comments:
Post a Comment