Friday, June 8, 2012

उधळपट्टी व उपासमार

            दिनांक ५ जूनच्या वृतपत्रात 'टॉयलेटवर उधळले ३५ लाख' व '४ दिवसांत ६ शेतक-यांच्या आत्महत्या'
या दोन टोकाच्या  दोन बातम्या वाचण्यात आल्या.'खिशात २८ रुपये असले तरी व्यवस्थित जगता येते' अशी अजब दारिद्र्यरेषा ठरवणा-या नियोजन आयोगाने स्वतः मात्र टॉयलेटवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे.सरकारने जाहीर केलेली मदत शेतक-यांना वेळेत न मिळाल्याने विदर्भात गेल्या चार दिवसात सहा शेतक-यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्या कमी करण्यात केंद्राला अपशय येत आहे.

नवी दिल्लीतील आयोगाच्या योजना भवन इमारतीतील दोन टॉयलेटच्या नूतनीकरणावर तब्बल ३५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. आयोगाने आपल्या परदेशवारीवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा ठपका आहे.देशात महागाईचा वणवा पेटला आहे.त्याला कसा आळा घालावा,असा प्रश्न केंद्र सरकारला पडला आहे.आर्थिक संकटातून जाणा-या  एका देशाच्या नियोजन आयोगाच्या अधिका-यांचे राहणीमान राजेशाही कसे?


संपूर्ण देशातील योजनांचे नियोजन,सरकारी पैशाचे समन्यायी वाटप,योजना लार्भाथीपर्यत पोहचण्य़ाचे अतिशय  महत्वपूर्ण कामे नियोजन आयोग करीत असताना राजेशाही राहणीमानासाठीही पैशाची उधळपट्टी करीत आहे.योजना लार्भाथींयापर्यत पोहचत नाहीत याबद्द्ल आयोग काय करीत आहेत?नियोजन आयोग देशातील राज्याचा बाजुला ठेवून  आयोग  परदेश वा-यांवर भरपूर पैसा खर्च केला जात आहे. दारिद्र्यांची व्याख्या बनविणा-या आयोगाने गरीबांसाठी कामे करताना आपली चैन कमी करीत देशाचा विकास साधावा. आयोगाने उधळपट्टी कमी करीत उपासमार रोखावी.


देशात गरीबी वाढत आहे.शेतक-यांची कर्जे वाढली आहेत.
देशात गरीबीत राहणा-यांची संख्या मोठी आहे.देशात गरीबीची   चेष्टा सुरु आहे.

No comments: