Wednesday, June 27, 2012

दुसरा सचिन

 क्रीडारसिक ज्याची वाट पाहत होते ती वेळ आली आहे.शंभर शतके करून सचिन तेंडुलकरने विक्रमांच्या हिमालयाचे एव्हरेस्ट सर केलेल्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन मैदानात उतरत आहे.एक मराठी योध्दा युध्दाच्या तयारीला लागला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट करिअरच्या इनिंगची ओपनिंग केली आहे.अर्जुन सचिन तेंडुलकरचा मुंबई क्रिकेट संघाच्या ( एमसीए ) चौदा वर्षाखालील संभाव्य संघात समावेश करण्यात आला आहे.
  धीरुभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलमध्ये शिकणारा बारा वर्षाचा अर्जुन डावखुरा फलंदाज तसेच उत्तम गोलंदाज आहे . उन्हाळ्यात घेण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अर्जुनने छान कमागिरी केली होती . त्याने पाच सामन्यात पन्नासच्या सरासरीने अडीचशे धावा केल्या होत्या.या कामगीरी मुळे तो संघात सामिल झाला आहे.

अर्जुनने वडिलांच्या वाटेवर चालण्यास सुरुवात केली असली तरी तो क्रिकेटच्या जगात वडिलांइतकी उंची गाठू शकेल काय याबद्दल सर्व क्रिकेट जाणकारांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडुन मोठ्या असल्याने त्याला त्या पूर्ण करताना भारी जाणार आहे.
अपेक्षांचे ओझे घेऊन न खेळता त्याने नैसर्गिक खेळ केला पाहिजे.क्रिकेटच्या खेळतला तेंडुलकरांचा वारसा चालवला पाहिजे.

सचिनने त्याला क्रिकेटखेळाडु बनण्यासाठी लहानपणापासून आपल्या सोबत ठेवला होता.त्याचा फायदा अर्जुनला मिळाला आहे.त्यानीही खेळात प्राविण्य संपादन केले आहे.

विकेट न देता शेवटपर्यंत धावपट्टीवर खंबीर उभे राहणे, संघाला मोठी धावसंख्या उभारून देणे, सामना जिंकण्याची संधी खेचून आणणे व तसेच संयम, मेहनत, जिद्द, विनम्रता या सा-या गुणांनी त्याने खेळ केला तर तो सचिनच्या विक्रमांपर्यत पोहचु शकतो.

सत्शील,संवेदनशील,सद्गुणी असा दुसरा सचिन सापडला आहे.


No comments: