Saturday, July 7, 2012

टपावरचे टपोरी

मुबंईतल्या लोकलच्या टपावर बसून प्रवास करणारा तरुण पेंटाग्राफमध्ये अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकात घडली.ओव्हरहेड वायरमधील वीज प्रवाहामुळे या तरुणाचे शरीर ज्वाळांनी वेढल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली. मोटरमनने स्टेशन मॅनेजरला कळवल्यानंतर २० मिनिटांनी विद्युत प्रवाह खंडीत करण्यात आला. त्यानंतर या तरुणाची सुटका करण्यात आली.असे भयाणक अपघात नेहमीच घडत असल्याने तरुण मरत आहेत.


मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दोन जागा पटकवण्यसाठी प्रवाशांमध्ये स्पर्धा लागलेली असते. सेंकड क्लासच्या डब्यातील चौथी सीट पकडण्यासाठी आणि विंडो सिट पकडण्यासाठी तर ती आणखी तीव्र होते. गर्दीच्या वेळेस तर प्रवासी जीवावर उदार होतात. 

गाड्यांची गदीर् वाढल्याने काही प्रवाशी खिडकीवर उभे राहू लागले. निव्वळ गंमत म्हणून याच्याही पुढे आता तर यांची मजल टपावर उभे राहून आणि झोपून प्रवास करण्यापर्यंत गेली. रेल्वेबाहेर लटकण्याला किंवा टपावर उभं राहून प्रवास करण्याला थ्रील मानणारी ही मुलं, आथिर्क विवंचनेतली. दाटीवाटीच्या बैठ्या चाळीत किंवा अगदी स्टेशनजवळच्या झोपड्यांमध्ये राहणारी. यांच्या घरची परिस्थिती यथातथाच शिवाय शिक्षण अर्धवट राहिल्याने ठिकठिकाणच्या ऑफिस किंवा बँकांतून डिलिव्हरी बॉय किंवा शिपायांची कामं करणारी आहेत. तर काही मोटार गॅरेजमध्ये हेल्पर असणारी. कोवळ्या वयात बापाने चार पैसे मिळवण्यासाठी यांना घराबाहेर धाडलेलं.

लोकलक्या टपावरचे  प्रवासी म्हणजे निव्वळ काही तरी आगळंवेगळं करण्यासाठी हा आत्मघाती प्रवास करतात. लोकलच्या टपावरुन प्रवास करणे ही ह्या टपोरी मुलांची फँशन झाली आहे.टपावर धावणं, हेडलाइटवर उभं राहणं अशासारखे धाडसी प्रयोगही करू लागले आहेत.मुबंईतल्या लोकलच्या टपावर टपोरी पोरे बसून प्रवास करताना नेहमीच अपघात होत आहेत.हे टपोरी डोक़्यावरुन हायव्होल्टेज असलेल्या वायरच्या खाली व वेगात जाणा-या लोकलया टपावर बसून टपोरीगीरी करीत गर्दीच्या वेळी प्रवास करतात.एवढे मोठे संकट घेऊन प्रवास करण्यात या कोणते साहस मिळते. असे जीवावर बेतणारे साहस करून त्यांना काय मिळते? लोकांच्या शिव्या, अपशब्द हे यांना दररोज मिळणारे 'पारितोषिक'. यांना मोकळ्या हवेत बसून प्रवास करण्याची मजा येते तर याच मजेसाठी कधी कधी दिव्यावर झेप घेणाऱ्या पतंगासारखा ते आत्मघात करून घेतात आणि एका कोवळ्या जीवाची दारूण शोकांतिका होते.तरीही डोळ्यादेखत खांबावर आपटून किंवा पेंटाग्राफला चिकटून राख होत गतप्राण होताना पाहूनही त्यांचं हे वेड काही कमी झालेलं नाही.


बाजुने जाणा-या गाडीतल्या प्रवाशाना त्रास देणे,महिलाची चेष्टामस्करी करणे ह्यांचे नित्याचे आहे.पोलीसी कारवाई होते पण त्याचा त्याना काहीच फरक पडत नाही.त्याचा प्रवास पाहताना पाहणा-या भिती वाटते पण
ते बिनघास्त व थट्टामस्करी करीत मजेत प्रवास करीत असतात.रेल्वे पोलीसानी त्यांच्यावर कडक कारवाई केल्यास हा प्रवास बंद होईल.हा प्रकार पोलिसानी लवकरच बंद केला पाहिजे.

No comments: