Saturday, July 28, 2012

इस्पितळात दाखल


माझ्या संपुर्ण आयुष्यात मी प्रथमच इस्पितळात दाखल झालो.डास चावला.ताप आला.प्लेटलेट्स कमी झाल्या.धावपळ झाली.बाहेरुन प्लेटलेट्स आणल्या.चढवल्या.तरीही प्लेटलेट्स कमी होत होत्या.दोन दिवसानी शरीराने प्लेटलेट्स बनवण्यास सुरुवात केल्यानतंर मी घरी परतलो आहे..


जसे मोठे मोठे नेते इस्पितळात दाखल होतात तसे मला वाटत होते.यापूर्वी मी मित्रमडंळीना पाहण्यास व मदत करण्यास जात असे. पण  मला नातेवाईक व मित्रमडंळी भेट्ण्यास येणार हे काही वेगेळेच वाटत होते.
इस्पितळात पेशटंस ना बरे केले जाते.मी पण लवकर बरा होण्यासाठीच दाखल झालो होतो.



दाखल झाल्यावर प्रथम माझ्या शरीराची तपासणी झाली.पैसे भरावे लागले.मी इस्पितळात दाखल होण्यास चागंले  चालत आलो होतो.पण येथे आल्यावर मला व्हिलचेअर बसवून फिरविल्रे गेले.काय राजेशाही थाट होता.विचित्र वाटत होते.नतंर कळले यासर्वाचे ते पैसे घेणार आहेत.माझ्या बेडजवळ आणले.मला इस्पितळाचा पेशटचा ड्रेस घालण्याची वर्दी दिली गेली.गुपचुप सर्व गोष्टी केल्या.आता मला आजारी असल्यासारखे वाटायला लागले.माझ्या रुम मध्ये सिस्टर व वार्डबाँय या लोकांची धावपळ सुरु झाली.सर्व वस्तुची पाहणी केली.आणीबाणीत लागणा-या गोष्टी पाहुन घेतल्या.



डाँक्टरांची विझीट झाली.लगेच रक्त घेउन गेले व औषधांची यादी हाती दिली.हाताला सलायन लावले.तेथूनच इंजेक्शन दिली गेली.गोळ्या दिल्या.मला आराम करण्यास सांगितले.मी शांत पडुन होतो. मी इस्पितळात दाखल झाल्याने कोणती कामे राहिली व ती कामे कशी करायची त्याची आखणी करीत होतो.


घरातले धास्तवले होते.त्याना माझी काळजी वाटत होती.मी मात्र मजेत व बिंदधास्त होतो.रक्ताचे रीपोर्ट चागंले नव्ह्ते.डाँक्टरांच्या विझीट वाढल्या होत्या.मी पण मळुन झालो होतो.इस्पितळातील जेवण चांगले होते पण मला जात नव्ह्ते.जेवूच नये वाटायचे.ताकद व प्रतिकारक शक्ती वाढ्वण्यासाठी मला नाईजास्तव जेवावे लागत होते.अशक्तपणा वाढला होता. पाहावयास येणारी मित्रमडंळी व नातेवाईक वाढले होते.भेटण्यास येवू नये असे आव्हान केले.सुरुवातीला मोबाईल सर्वाशी बोलायचो.पण नतंर कंटाळा यायचा व त्रासही व्हायचा.मोबाईल बंद ठेवला.



दिवस रात्री एक माणूस माझ्यासोबत नेहेमीच असायचा.पाळीपाळीने प्रत्येकजण माझी काळजी घेत होते.त्याची होणारी घालमेळ पाहवत नव्हती.सर्व आपापली कामे सोडून माझ्यासाठी इस्पितळात राहत होते.माझ्यामुळे त्याना होणारा त्रास पाहुन खुप वाईट वाटायचे.



तीन दिवसानी शरीराने प्लेटलेट्स बनवण्यास सुरुवात केल्यानतंर बरे वाटायला लागले.रोज रक्त काढून तपासले जायचे.त्याचा कंटाळा येऊ लागला.पण रक्तातील प्लेटलेट्स वाढल्यात ते पाहण्यासाठी रक्त काढले जायचे.



डाँक्टरानी डिसचार्ज दिल्यानतंर सर्वाना आनंद झाला.पहिले इस्पितळाचा ड्रेस बदलला.त्यावेळेला माझी सुटका झाल्यासारखे मला वाटले.पुन्हा औषधे सांगितली.पुन्हा पैसे भरले.सिस्टर व वार्डबाँय लोकांचा निरोप घेउन मी घरी पळालो. रस्त्याने सर्व नवीन पाहयतोय असे वाटत होते.खुप दिवसानी घरी आल्यासारखे वाटले.तेव्हाच कळले आपल्या घरासारखे सुंदर ठिकाण दुसरे नाही.






No comments: