Saturday, September 29, 2012

सर्वानी असे धाडस दाखवणे गरजेचे.

       

     जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराला महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमीतील मुख्य अभियंता विजय पांढरे यानी वाचा फोडली.सिंचन घोटाळ्याप्रकरणी ज्यांच्या खळबळजनक पत्रामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे.विजय पांढरे यांचा जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट झाल्यानतंर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे.विजय पांढरे याना मनोरुग्ण असल्याचा आरोप केला आहे. जलसंपदा घोटाळाप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी याच्यात व्यवहारिक नातेसंबंध असलेल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.अंजली दमानिया यांच्या आरोपांनी अडचणीत आणल्याने अस्वस्थ झालेल्या गडकरींनी अखेर कायदेशीर नोटीस जारी केली आहे.या कारणामुळे दोघाना पोलीस संरक्षण दिले आहे.या दोघानी खुप अन्याय सोसल्यानतंर  यानी ही कृती केली आहे.शासनातील सगळ्या यत्रंणा सुधाराव्या अशी इच्छा या दोघांची आहे.

    राज्यातील  भ्रष्टाचार या समस्येवर रान उठवले आहे हे कौतुकास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाल्यानंतर त्यांनी सारा देश या मामल्यावर हलवला आहे आणि विशेष म्हणजे तरुण पिढीही भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यास सज्ज होत आहे. भ्रष्टाचार ही राष्ट्रीय समस्या आहे आणि ती जुनी आहे. किंबहुना ज्या दिवशी आपण स्वतंत्र झाला तेव्हापासून ती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दशकात, आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून ती हाताबाहेर गेली आहे. आता याचा परिणाम केवळ सवंसाधारण प्रशासनावरच झाला आहे असे नव्हे तर, लष्कर आणि न्यायपद्धती यावरही झाला आहे. भ्रष्टाचार, आज आपल्या रोजच्या जगण्याचा आणि राष्ट्रीय चारित्र्याचा एक भाग झाला आहे.

    या दोघानी धाडस दाखवून सरकारला व नेत्याना अडचणीत आणले.नोकरीत राहून सरकारच्या विरोधात जाणे म्हणजे आगीत झेप घेणे आहे.देशात भ्रष्टाचार फोफवला आहे असे आपण सर्वजण म्हणतो पण त्या प्रक्रियेच्या विरोधात जात नाही.जनता याच्या विरोधात जात नाही म्हणुनच हा भ्रष्टाचार वेगात वढत आहे.देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपण सर्वानी असेच धाडस दखवले पाहिजे.सरकारी सेवेतल्या कर्मचा-यानी असेच धाडस दखवित शासनातील यंत्रणावर वचक  ठेवल्यास भ्रष्टाचार कमी होईल.सर्व गटातील देशवासीयानी एकत्र लढा देउन देशातून इग्रजाना हाकलून लावले.तसेच  या भ्रष्टाचाराला देशातून बाहेर घालविण्यास जनतेनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. 

     आता लोकांनीच एकत्र येऊन उठाव करावा आणि प्रामाणिकपणाने वागून मातृभूमीचे रक्षण करावे. ती वेळ आता आली आहे असे माझे ठाम मत आहे.भ्रष्टाचाराचे अत्यंत कठोर मार्गाने उच्चाटन होणे आवश्यक आहे. दोषींना, कोणतीही दयामाया न दाखवता तातडीने शिक्षा व्हावी.

No comments: