Thursday, October 11, 2012

कळलावी


         एखाद्या वनस्पतीचे फुल किती आकर्षक असावे याचे आदर्श उदाहरण म्हणून कळलावी.झुडूपांवर वेल म्हणून वाढणारी कळलावी.
कळलावीची रोपे पाऊस पडताच उगवतांना दिसतात. कळलावीला विविध नावांनी ओळखल्या जाते. हिंदीत – कलीहारी, संस्कृतमध्ये अग्रिशिखा तर इंग्लीशमध्ये मलबार ग्लोरी लिलि म्हणतात.पाऊस सुरू होऊन साधारण महिना उलटला की शेतांवरच्या वईंतून, वनातल्या कुरणांतून गडद लाल-पिवळी अतिशय सुंदर फुले डोकावू लागतात. या दिवसातल्या एवढ्या फुललेल्या निसर्गातही ही फुले आपली नजर दूरवरूनही सहज वेधून घेतात.




काहींच्या मते ही वेल घराच्या अंगणात लावली तर घरात कलहाची कळ लागते म्हणून ही कळलावी.
कळलावी ह्या वेलेचा उपयोग औषध म्हणून गरोदर स्त्रीला बाळंतीण होण्यासाठी कळा लवकर येण्याकरीता केला जातो. 





संपूर्ण आशिया खंडात केवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांत ही वनस्पती आढळते. तेसच आफ्रिकेतही ती दिसून येते. ‘अग्निशिखा’ बेलवर्गीय वनस्पती असून, तिचे शास्त्रीय नाव ‘ग्लोरिओसा सूपर्बा’ असे आहे. ग्रामीण भागात ती ‘कळलावी’ किंवा ‘बचनाग’ या नावानेही ओळखली जाते. अग्निशिखा साधारणपणे ५ ते ७ मीटरपर्यंत वाढते. अग्निशिखाविषयी माहिती देताना येथील अभ्यासक राजकुमार डोंगरे म्हणाले, ‘‘अग्निशिखाचे वैशिष्ट्य म्हणजे ती पावसाळ्यात उगवते व नंतर सप्टेंबरपर्यंत फुललेली असते. नंतर पाण्याअभावी ती सुकून जाते. सुकल्यानंतरही अग्निशिखाचे कंद जमिनीत जिवंत राहतात.






कळलावी या वनस्पतीचा वापर औषधी आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात या प्रजातीचा वापर वेदनाशामक, वेदनानाशक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.






आफ्रिकेत झिम्बाब्वेतही अग्निशिखा मोठय़ा प्रमाणावर आढळून येते. कमळ हे जसे आपले राष्ट्रीय फूल आहे, तसेच अग्निशिखा हे झिम्बाब्वेचे राष्ट्रीय फूल आहे.




आपल्याकडे उगवणार्या पावसाळी वनस्पतींच्या फुलांतली सर्वांत देखणी, सुंदर फुलं कोणती, या प्रश्नाचं उत्तर हमखास 'कळलावीची फुलं' हेच येईल.




   
    कर्करोगावर प्रतिबंधात्मक औषधे बनविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कळलावी (गौरीचे हात) या वनस्पतीची दापोलीतून मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे.

No comments: