Sunday, October 28, 2012

गरीब कर्जदार

                               
      जेवढे कर्ज जास्त तेवढा तो श्रीमंत असे बोलले जाते.मग तो श्रीमंत असो की गरीब   असो.शेती.लग्न,शिक्षण व  घर बांधण्यासाठी कर्ज घ्यावे लागते.गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना कर्ज घेण्याची नितांत आवश्यकता असते. गरीब कर्जदार कमी रकमेची कर्जे घेतात, त्यावरील  चढ्या दराने आकारण्यात येणारे व्याज नियमित भरतात आणि वेळेत कर्जाची परतफेड करतात.कारण एक कर्ज फिटल्यानंतर त्यांना दुस-या कर्जाची गरज भेडसावत असते.गरीब हे अतिशय प्रामाणिक कर्जदार असून,त्यांच्याकडून कर्ज बुडविण्याची आगळीक शक्यता नसते.कर्जदार बडा असेल , तर बँकांचे अधिकारी त्यांच्याकडे वारंवार खेटे मारतात.मात्र,गरीब अथवा छोटा कर्जदार असल्यास त्याला बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात.

            बँका आणि वित्तीय संस्थांचा नकार मिळाल्यानंतर गरीबांना कर्जांसाठी नाइलाजास्तव खासगी सावकारांवर अवलंबून राहण्याची वेळ येते.या कर्जांवर इच्छा नसतानाही अधिक दराने व्याज भरावे  लागते.मिळणारे संपूर्ण उत्पन्न खर्ची घातले,तरी कर्ज फिटण्याची शक्यता नसते.याने गरीबांची कर्जे न फिटल्याने वाढत जातात.सरकारने खासगी सावकारीवर निर्बंध घातले नाही तर गरीब गरीब राहुन मरुण जाईल.


           गरीबाना कर्ज देण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी का - कू न करता पुढे येण्याची गरज आहे. बँकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी बड्या कर्जदारांच्या मागे लागण्यापेक्षा गरिबांवर मेहेरबानी करण्याची आवश्यकता आहे.


                 कर्जासाठी अर्ज करणारे गरीब असतील तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते, त्यांना कर्जे मिळण्यात असंख्य अडचणी येतात. मात्र हे गरीब अर्जदार अप्रामाणिक नसतात, त्यांची जीवनमूल्ये उच्च असतात.कर्जाचे व्याज कितीही असो, प्रतिकूल परिस्थितीतही हे गरीब कर्जदार कर्ज फेडतात.त्यांना कर्ज देताना बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करू नये.

                    तारण देऊ न शकणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना दैनंदिन गरज भागविण्यासाठी सावकारांच्या दारी जाऊन धान्य कर्जाऊ घ्यावे लागत असे. शेतीच्या हंगामानंतर कर्जाची परतफेड करताना कर्जाऊ घेतलेल्या धान्याच्या दीडपट किंवा दुप्पट धान्य सावकाराला द्यावे लागत असे. 

         गरीब लोकच सर्वांत चांगले व प्रामाणिक कर्जदार असल्याची पावती सरकारने हल्लीच दिली आहे.पण या गरीबानी हे कर्ज म्हणजे  सरकारनी आपल्याला दिलेली मदत न समजता त्याची परतफेड केली पाहिजे.
             
 

No comments: