पूर्वी 'बीपी’हा शब्द उच्चारायला घाडस लागायचे.हा शब्द ऐकायला आले तर कान टवकारले जायचे. हा शब्द गुपचुप उच्चारला जायचा.मोठ्याने बोलला जात नव्हता.सार्वजनिक ठिकाणी हा शब्द वापरण्यास भीती वाटायची.हा शब्द बोलण्यात आला तर तो आंबटशोकीन समजला जायचा.हा शब्द संवादात वापरणा-यांचे १७ च्या पुढचे असायचे.चारचौघांत बोलताना बीपी हा शब्द उच्चारताना संकोच वाटायचा.समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जाते.पण या नावाचा मराठी सिनेमा आल्याने लहानथोर मंडळी हा शब्द खुलेआम आपल्या संवादात वापरत आहेत.ही या सिनेमाने केलेली क्रांती होय.
'बीपी’ या इंग्रजी शब्दांच्या अनेक छटा आहेत. पण वयानुसार शब्दच्छटा बदलतात. काहींच्या मते ते ब्लडप्रेशर असतं, तर काहींच्या मते ती आंतरराष्ट्रीय तेल उत्खनन कंपनी असू शकते. पण अगदी कालपरवापर्यंत बीपीचा सर्वमान्य रूढ अर्थ होता ब्लू फिल्म्स.
पौगंडावस्थेत असताना बीपी शब्द उच्चारला तरी आजुबाजूच्या लोकांचे कान टवकारायचे. अगदी परवापरवापर्यंत अशी स्थिती होती. पण,'बीपी' तथा बालक पालक या सिनेमाची घोषणा केली आणि प्रत्येकाच्या बीपी हा शब्द बेधडक येऊ लागला.
ही बीपी आठवायचं कारण म्हणजे नुकताच आलेला ‘बीपी’ हा मराठी सिनेमा. सिनेमाचं नाव आहे बालक-पालक. पण मूळ थीम बीपी हीच आहे. पौगंडावस्थेतल्या मुलांमधील सेक्शुअलिटी आणि त्यायोगे येणारे बालक आणि पालकांच्या आयुष्यातले अवघड प्रसंग यावर हा सिनेमा भाष्य करतो.सिनेमाचे नाव थेट ‘बीपी’ हा शब्द वापरलाय.पालक आणि मुलांमध्ये संवाद पाहिजे हा ‘बीपी’ या सिनेमाचा उद्देश.अगदी सहज आणि सोप्या भाषेत मनोरंजन करत, लैगिकतेचे धडे देण्याचे काम बीपी करतो.
ब्लू फिल्म्सच्या सीडी बाजारात विकल्या जायचा.त्याही गुपचुप.कोणाच्या घरात लपत लपत बधायच्या.या सर्व कार्यक्रमाला बीपी पाहणे म्हणायचे.
बीपी’चा फुलफॉर्म काय किंवा त्याचा अर्थ काय हे बहुधा कोणाला सांगायची गरज नसावी. आज बाप्ये झालेले बहुसंख्य जण कधी ना कधी ‘बीपी’च्या मांडवाखालून गेले असतील. भलंबुरं काहीही म्हणा, पण ‘बीपी’ हा आपल्या पॉपकल्चरचा भाग झालाय आणि त्याला जबाबदार आहे आपली समाजव्यवस्था.
समाजात मोठा बदल झाला आहे.समाजाने 'बीपी' हा शब्द आता स्विकारला आहे.मुलामुलीमघ्ये ह्या सिनेमांबद्द्ल चर्चा होताना दिसते.सार्वजनिक ठिकाणी ह्या शब्दाचे उच्चारणे होत आहे.हा बद्ल स्वागतार्ह आहे.याचे श्रेय 'बीपी' हा सिनेमा काढणा-याना जाते.
No comments:
Post a Comment