मी माझ्या भावासह नवी मुंबईतल्या हाँस्पिटलमघ्ये बाबाना आँप्रेशनला नेल्यामुळे आँप्रेशन थियटर च्या समोर बसलो होतो.खुप गर्दी होती.माणसे थियटरमघून कोणती गरज लागेल याची प्रतिक्षा करीत बसायला जागा नसल्याने उभी राहून वाट पाहत होते.सगळीच मंडळी चिंताग्रस्त होती.काही मुलं गडबड करीत असल्याने तेथे आवाज होता. आँप्रेशन थियटरच्या दरवाज्याकडे सर्वाचे डोळे लागले होते.त्यातील काही मंडळी बाळाच्या बातमीची वाट पाहत असल्याने त्यांच्यात स्थट्टा मस्करी सुरु होती. आमच्या दोघांच्या गप्पा सुरु होत्या.
थोडया वेळाने एका स्टेचरवरून एका महिलेला आँप्रेशन थियटरमघून बाहेर आणले.ती शुध्दीवर नव्हती.तीची काळजी घेण्यासाठी एक सिस्टर तिच्यासह बाहेर आली.आपला पेशंट आहे का ते पाहून काहीजण पुन्हा आपल्या खुर्चीत येऊन बसले.पेशंटच्या डोक्यावरील केसांवर प्लास्टिकची टोपी होती.तिला पायापर्यत ब्लाँकेटनी झाकलेले होते.चेह-याचा भाग तेवढा दिसत होता..तेवढयात एक मध्यमवयाचा गृहस्थ तिच्या जवळ आला.सिस्टरशी विचारपूस करु लागला.महिलेचा नवरा असल्याचे समजून सिस्टर त्याच्या प्रश्नाना उत्तर देत होती. चौकशी करताना तो त्या महिलेच्या चेह-यावरुन प्रेमाने हात फिरवत होता.हात फिरवताना सिस्टरशी बोलत होता. पेशंटचा नातवाईक असल्याने सिस्टर त्याला माहीती देत होती. लिफ्ट थांबत नसल्याने त्या दोघांचे बोलणे लांबले होते. लिफ्ट थांबली.स्टेचर आत नेले.लिफ्टमघून सिस्टरसह तोही गेला.
लिफ्ट वर गेली.पुन्हा मंडळी थियटरच्या दरवाज्याकडे पाहत कुजबुज करु लागली. काहीजण एकटे असल्याने मोबाईलमघ्ये गुंतले होते .काही वेळ शांतता राहीली.एकाची या प्रतिक्षेतून सुटका झाली होती.
थोड्याच वेळात जो गृहस्थ लिफ्टने वर गेला होता तो पुन्हा खाली आला.सगळ्यांकडे पाहत तो मोठ्याने म्हणाला "ती माझी पत्नी नव्ह्ती'.तेथे बसलेली मंडळी त्याचे बोलणे ऐकून मोठ्याने हसली.सगळ्यांचे हसणे ऐकून तो एकदम ओशाळला.काय मुर्ख आहे हा स्वत:च्या बायकोला ओळखु शकला नाही की ह्या माणुसाने हात फिरवण्यची संघी साधली असे सर्वाना शंका आली. त्याला त्याची चुक कळून चुकली होती.दोघी बायकांनी पुढे होऊन त्याला विचारले "तू तिला प्रेमाने गोजारलेस कसे"? मला वाटलं ती माझी पत्नी आहे.असे तो म्हणाला.तुझ्या बायकोला असे कोणी गोजारले असते तर तुला चालले का? एका बाईने विचारले.तो शांत झाला.माझ्या हातून मोठी चुक घडली आहे.पण ती अनाहुतपणे घडली.मी काय जाणीवपूर्वक हे केले नाही.माझी पत्नी खुप दिवस आजारी असल्याने मी चिंताग्रस्त होतो.त्या चिंतेत असताना अजाणतेपणे ही चुक घडली.मी तिची व सर्वाची माफी मागतो.पुन्हा अशी चुक तुझ्याकडून होणार नाही याची लक्षात ठेव असे एका बाईनी त्याला चांगलेच खडसावले. सर्वजण शांत झाले.
काही वेळाने दुस-या पेशंटला बाहेर आणले तेव्हा तो लांबूनच पाहत राहिला.जवळ गेला नाही.धाबरत होता.दोनतीन पेशंट बाहेर आणल्यानतंर त्याच्या पत्नीला बाहेर आणले.त्याला प्रथम कळले नाही.सिस्टरने त्याच्या पत्नीचे नांव पुकारल्यानतंर तो तिच्या जवळ गेला व शांतपणे लिफ्टमघुन गेला.
काही वेळाने दुस-या पेशंटला बाहेर आणले तेव्हा तो लांबूनच पाहत राहिला.जवळ गेला नाही.धाबरत होता.दोनतीन पेशंट बाहेर आणल्यानतंर त्याच्या पत्नीला बाहेर आणले.त्याला प्रथम कळले नाही.सिस्टरने त्याच्या पत्नीचे नांव पुकारल्यानतंर तो तिच्या जवळ गेला व शांतपणे लिफ्टमघुन गेला.
No comments:
Post a Comment