यावर्षी हापूस आंब्याचा सीझन लवकर सुरू झालाय. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत पीकही चांगलं आहे. आंबा व्यवसायिक आणि उत्पादक शेतकरी खुश आहे. यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सिझन सुरू झाला. मार्च- एप्रिलअखेर देशभर तसेच विदेशांमध्ये आंबा वेळेवर पोहचल्याने यंदाची आर्थिक उलाढाल मागील दोन वर्षांच्या नुकसानीची भरपाई करून देणारी ठरेल.महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून पिवळे धम्मक,कधी केशरी तर काही गवताच्या पेंढीत ठेवलेले हिरवेगार आंब्यांची प्रचंड आवक असे सारेच आंबामय वातावरण मार्केटमध्ये दिसते.आंब्याचा खास सुगंध मोहरून टाकतो.आंबा.हा फळांचा राजा. कोकणात याचं मूळ असलं तरी अख्या जगात याचं खूळ आहे.अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते.आंबा हे भारताचे राष्टीय फळ असून ताचा उल्लेख रामायण महाभारतामधे आढळतो.स्वर्गामध्ये जसे अमृत तसे पृथ्वीवर आंबा अशी या फळाची महती आहे. सर्वाना हवाहवासा वाटणारा आंबा आपल्या सगळ्याच इंद्रियांना तृप्त करतो.
मोसमातला पहिला आंबा. आंबा आला आला म्हणता, त्याची शोधाशोध करुन मोसमातलं ते पहिलं फळ खाण्याचा आनंद स्वर्गीयच असतो.पहिल्या आंब्याची गोडी काही वेगळीच असते.आंब्याचा मोसम येण्याची सर्वजण वर्षभर वाट बघत असतात. आंब्याचं वेड म्हणजे वेगळंच असतं. कुणाला आंब्याचा राजा हापूसचीच हौस असते, तर कुणाला रसाळ पायरी आवडतो. आंब्याच्या प्रकारानुसार त्याचं रंगरुप, आकारमान, चव सगळंच बदलतं.देशामध्ये पिकणा-या अन्य आंब्यामध्ये कोकणच्या हापूसची चवच न्यारी आहे. या चवीमुळे देशविदेशामध्ये या आंब्याला विशेष मागणी आहे.
हापूस सुरुवातीला रत्नागिरीत आला पण देवगडात तो अधिक विसावला. आज देवगड ही हापूसची राजधानी ठरली आहे. अद्याप देवगडच्या ' पायरीला ' हापूसच्या विश्वात कुणी धक्का लावलेला नाही. हापूसला हा जो मान मिळालाय तो त्याच्या अद्भूत चवीनं.रसाळपणानं.हवाहवासा वाटणारा हा हापूस फळांचा राजा ही ओळखसुद्धा टिकवून आहे.
देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच तो आंबा थेट शेतकऱ्यांकडून योग्य भावात थेट लोकांपर्यंत पोहचविण्यात यावा, साठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. दिवसेंदिवस हापूस आंब्याची मागणी वाढते आहे आणि उत्पादन मात्र कमी होत चालले आहे. हवामानाबरोबरच त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी हापूस आंबा भविष्यात शेतकऱ्यांना तारणहार ठरेल असे वाटते.
निर्यातीसाठीच्या अटी आणि कालावधी लक्षात घेता ९९ टक्के आंबा देशातच पाठवला जातो. निर्यात केला तर चांगला भाव मिळतोच असं नाही.राज्य सरकारला आंबा व्यवसायातून कोटय़वधीचे परकीय चलन मिळत असले तरी सरकारकडून या व्यवसायासाठी पायाभूत सुविधा मात्र उपलब्ध करून देण्यात येत नाही.

रासायनिक पदार्थांचा वापर करून पिकवलेले आंबे आरोग्यास अपायकारक असतात त्यामुळे असा वापर वाढला आहे.आंबे महाग झाले असल्याने लवकर पिकवून पैसे कमाविण्याचा हा उपक्रम आहे.अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. कॅल्शिअम कार्बाईडचा वापर केल्यास दाखल होणार गुन्हा आरोग्यास हानीकारक असल्याने कॅल्शिअम कार्बाइडचा वापर केल्या प्रकरणी संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो.
आता आंबा पिकविण्यासाठी इथिलिन गॅसचा वापर करण्यात येणार आहे. आंबा
पिकण्याच्या नैसर्गिक क्रियेला समोर ठेऊन ही प्रक्रिया वापरण्यात येत आहे. इथिलिन गॅस वापरणे हा आरोग्यासाठी घातक नसून , आंबा पिकविण्यासही फायदेशीर ठरणार आहे.कार्बाइडच्या वापराने आंबाचा एकच भाग पिकतो. मात्र तो पिकल्यानंतर त्याला कार्बाइडचाच वास येतो. मात्र इथिलिन गॅसमुळे आंबा सर्व बाजूने सारखा पिकतो. त्यामुळे चवीलाही चांगला लागत असल्याचे लक्षात आले आहे. आंबे खादाडाना आला अनैसर्गिक पध्दतीने म्हणजेच कार्बाइडऐवजी इथिलिन गॅस वापर करुन पिकवलेला आंबा खाण्यास मिळणार आहे.
No comments:
Post a Comment