Friday, June 14, 2013

मॅनिकिन्सवर बंदी


  अंतर्वस्त्राची मुळात जाहिरात करण्याची गरजच नाही.लोक ते खरेदी करणारच.रस्त्यारस्त्यावर अंतर्वस्त्रांचे प्रर्दशन  केल्याने अनेकदा शाळकरी, तरुण मुलींना खूप ओशाळल्यासारखे वाटते. तरुण मुले या ठिकाणाहून जाताना अश्लिल शेरेबाजी करतात.अंतर्वस्त्रांची पुतळे हि आपली संस्कृती नाही… अशा निर्लज्य गोष्ठीना थारा देऊ नये.

   अंतर्वस्त्रांची विक्री करण्यासाठी दुकानाबाहेर अंतर्वस्त्र घातलेल्या पुतळे उभ्या करीत जाहिरात केली जाते.काय तो गलिच्छ प्रकार.कसे दिसते ते? उघड्या नागड्या बाहुल्या रस्त्यावर पडलेल्या असतात.हे पुतळे एक विशिष्ट प्रकारच्या स्त्री-सौंदर्याचा उघड प्रचार करीत असतात.गो-या,उंच-पु-या,सुंदर केस,त्वचा,नाकी-डोळी डोळस,बारीक कंबर अशा ठराविक आकारमानाचे हे पुतळे स्त्रीदेहाच्या विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित करीत असतात. विशिष्ट वस्त्र परिधान केले तर आपण कसे दिसू याची कल्पना ग्राहकाला येण्यासाठी असे पुतळे वापरले जातात असे विक्रेत्यांचे म्हणणे असते. काही दिवसानी हे विक्रेते जिवंत मॉडेलचा वापर करतील यांचा काही नेम नाही.मुंबई महापालिकेने स्त्रियांची अंतर्वस्त्रे प्रदर्शित करणा-या पुतळ्यांवर बंदी आणणारा एकमुखी प्रस्ताव मंजूर केला आहे. निर्जीव पुतळ्यांना ' ड्रेस कोड ' लावून  जिवंत स्त्रियांच्या ख-या प्रश्नांकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच होत आहे.महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या प्रदर्शनाला मनाई केल्यास पुरुषांच्याही अंतर्वस्त्राच्या जाहिरातींवर बंदी घालायला हवी.
दुकानं आणि शोरुमसमोर अंतर्वस्त्रांची जाहिरात करणा-या पुतळ्यांवर आक्षेप घेण्यात आलाय.

महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या जाहिराती करून उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी असे कपडे घातलेल्या "मॅनिकिन्स' बीभत्स पद्धतीने मांडल्या जातात. या मॅनिकिन्स दुकानाच्या दर्शनी भागात, दुकानाबाहेर अगदी पदपथावरदेखील लावल्या जातात. यातून महिलांची विटंबना होत आहे.

 
या पुतळ्यांमुळे पुरुषांची मने भ्रष्ट होतात आणि महिलांवरील अत्याचार,बलात्काराच्या घटनांना खतपाणी मिळते,असे कारण यासाठी दिले गेले.महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी केवळ पुरुषांचीच नव्हे,तर एकंदर समाजाचीच मानसिकता बदलण्याच्या आवश्यकतेकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

या पुतळ्यामुळे बाजारात फिरताना महिलांना अवघडल्यासारखे वाटते.बंदीमुळे फार फार तर हे अवघडलेपण कमी होईल.त्यापलीकडे या बंदीमुळे काही साध्य होईल,असे वाटत नाही. अशी बंदी 'मूर्खपणाची' असल्याची कठोर टीका समाजातील काही घटकांकडून होत आहे. टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून वाट्टेल ते एका क्लिकवर उपलब्ध असताना, केवळ पुतळ्यांवर बंदी घालण्याने काय साध्य होणार?दर विसाव्या मिनिटाला देशात एका महिलेवर बलात्कार होत असताना त्यांना आळा घालण्यासाठी पुतळ्यांना कपडे चढवण्याचा उपाय केवळ हास्यास्पद आहे. आता पुतळ्यांवर नतंर चित्रपट, मालिका, अशा माध्यमांमध्येही याबाबत बंदी घालू शकतो.

लोकप्रतिनिधींना पुतळ्यांवर बंदी वगैरे फारच सोपे उपाय झाले.महिलांच्या रक्षणाबाबत खरोखरच कळकळ असेल तर आपापल्या मतदारसंघात महिलांवरील अत्याचाराचे किती गुन्हे दाखल झाले आणि त्यातील किती पीडित महिलांना न्याय मिळाला याची दखल घ्यावी.

1 comment:

DipesH- said...

adult cinemache poster's ani tyache trailerpeksha tari hyacha kamich prabhav asava. apan vegaveglya styles che kapade ghalun swatahala modern asalyacha miravat asto tyachach ek to bhag asava.