Friday, October 4, 2013

नियतीचा शोध

  
    वाईट घडले की नियतीला दोष दिले जाते,यतीमुळे चांगले घडले,नियतीने तसे घडवले नाही ही वाक्ये नेहमीच  ऐकली जाते,नियती समोर कुणी काही करू शकत नाही ही नियती कोण आहे?  नियती म्हणजे काय? नियती काय आहे? 'नियती' हा एकच शब्द अनादीअनंत काळ आपल्या मनावर कोरलेला असतो.नियती नामक शक्तीला अचाट सार्मथ्य आहे का? काही झाले तरी आपण नियतीला दोष देतो.  नियती कधी,कुणाला,काय,किती अन कसे देईल याचा भरवसाच नाही.काहींच्या नशिबी आजन्म सुखाचे डोंगर तर अनेकांच्या नशिबात दारिद्य्र कायमचे पाचवीला पूजलेले असते.



   नियती ही आपल्या आयुष्यातली अटळ गोष्ट आहे,असे मानणारे अनेकजण आहेत.माणसाचे आयुष्य संपेपर्यंत माणसानेच निर्माण केलेली इष्टानिष्ट नियती त्याला सुखदु:खाच्या स्वरूपात भोग देत असते.कार्यकारण भावच न सापडणा-या किंवा तो सापडला तरी त्यातल्या प्रमाणात प्रचंड तफावत आढळणा-या सा-या घटना 'नियती' या एका शब्दाच्या आत सामावतात.




   आपण ज्याला पुण्य म्हणतो ते आणि आपल्या आयुष्यातले भोग, जी आपली नियती असते त्यांचा काहीही संबंध नसतो. 'तरीही माझ्याच वाट्याला हे का यावं?', हा विचार दु:खांचा गुणाकार करतो. पण 'माझ्या वाट्याला हे आलं ते मला भोगायला हवं; कारण ती माझी नियती आहे,' हा विचार मन स्थिर ठेवून संकटाशी धीरानं सामना करायला सार्मथ्य देतो.



    माणसांनी एकमेकांवर प्रेम करण्यासाठी, दु:खानं होरपळणे इतके आवश्यक असेल, म्हणून नियती प्रत्येकाला कोणत्यातर स्वरूपाकेचे  दु:ख देत असेल का? पाप-पुण्य परिपक्व होत होत शुभ नियती व अशुभ नियती या स्वरूपांत प्रगट होऊन माणसाच्या जीवनात सुख-दु:ख रूपाने फळाला येते.


    नियती आपल्याला अद्वैत शिकवीत असते. आपल्या भोवतालची सृष्टी आपल्याला अद्वैत शिकवीत असते. भोवतालची सृष्टी आपल्याला संकेत देत असते. पण तिकडे लक्ष देण्यासाठी कुणाला वेळ नाही. जो तो आत्मकेंदित झाला आहे.




     नियती मोठी द्वाड असते.एका बाजूनी पंखात बळ वाढवित होते,तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीते.नियती अनेक वेळा क्रूर खेळ खेळते आणि शारीरिक,मानसिक,आर्थिक.खुप वेळा नियती परीक्षा बघत असते.   


      नीती आणि नियती यात फरक काय तर नियतीपासूनच नीतीची सुरवात होते. आपल्या मनात जे विचार असतात त्या विचारांना क्रियान्वित करण्यासाठी जी क्रिया केली जाते तीच नीती असते.या नीती आणि नियतीमध्ये चांगली किंवा वाईट इच्छाशक्तीपण असते की, ज्यामुळे चांगले किंवा वाईट परिणाम घडतात.

 
     अतिशय दुर्दैवी गोष्ट शेवटी नियती पुढे कोणाचे काही चालत नाही.नियती कुणाचा कसा घात करेल,ते कळायला मार्ग नाही.घात झाल्यानंतरच ते लक्षात येते.ज्याच्या संदर्भात हा प्रकार घडतो,त्यांचे आक्रित समाजमन विषन्न करून जाते.जन्माला आलेल्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय काय करावे, हे बहुधा नियती आधीच लिहून ठेवत असावी. लाखात एखादाच वेगळे काही करण्याची प्रेरणा घेऊन ती पूर्णत्वास नेण्याचा ध्यास घेतो.



ज्याचा मृत्यू जिथे आहे तिथेच येतो; नियती कोणालाही सोडत नाही,नियती नावाच्या त्या शक्ती आपले अस्तित्व सिध्द करत असते,नियती म्हणजे अद्भुत गोष्ट असते असा आपला समज आहे असे म्हणतात.नियतीचे नियंत्रण व्यक्तीच्या हातात नसते एवढे मात्र खरे असेही म्हणतात.


  आपल्या आयुष्यात सुख-दु:खाचा खेळ सुरूच असतो, पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आपणाला कधीच येत नाही, आपण म्हणजे नियतीच्या हातामधील कळसूत्री बाहुल्या असतो, कळसूत्री बाहुली हि कोणाच्या तरी इशा-यार नाचत असते.


  नियतीनुसार असेच घडणार होते तर नियती,प्राक्तन वगैरे वर विश्वास ठेवणा-यांना असं वाटत नाही.  माणुस नियती पुढे लाचारच असतो. त्याची जाणीव कोणाला असते कोणाला नसते,कोणी जाणीव करून घेतो व कोणी मुद्दाम त्या कड़े डोळेझाक करतो.तेव्हाच तो माणुस स्वतःहाचे भविष्य घडवतो.



    प्रत्येकाला नियतीप्रमाणे वागावेच लागते.

No comments: