सचिनची अखेरची खेळी व कसोटी पाहण्यास सचिनप्रेमीनी 'वानखेडे'वर अफाट गर्दी केली होती.ज्याना तिकिटे मिळाली नाहीत त्यांनी टी.व्हीचा आसरा घेतला.देशातला सगळा माहोल सचिनमय झाला होता.मंबईत सचिनोत्सव साजरा झाला. प्रतिष्ठीत मंडळीनी 'वानखेडे'कडे धाव घेतली.सुरक्षा व्यवस्था कडक करावी लागली.मिडियाकडे तर सचिन शिवाय दुस-या बातम्याच नव्हत्या. सचिनचा शेवट सामना पाहण्यास सचिनची आई पहिल्यांदा मैदानांवर हजर होत्या.सचिनच्या शेवटच्या कसोटीसाठी तेंडुलकर कुटुंबिय वानखेडे स्टेडियमवर गेल्या दोन दिवसांपासून उपस्थित आहे. पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन. सचिन तेंडुलकरला गान कोकिळा लता मंगेशकर यांनी खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकर हे हिंदुस्थानला पडलेले एक गोड स्वप्न होते. एक अमृतानुभव होता, सौख्याचा एक अप्रतिम क्षण होता. सचिन ने अवघे क्रिकेट विश्व आपल्या अस्तित्वाने केवळ भारून टाकले होते. जनमानसावर त्याची एवढी जबरदस्त पकड होती की कधीही क्रिकेट न बघणारे महाभाग सुद्धा चवीने क्रिकेट बघु लागले होते.संस्कारक्षम खेळाडू कसा असावा, तर तो सचिनसारखा. निवृत्त होतानाचे त्याचे वानखेडे स्टेडियमवरील मनोगत त्याचीच प्रचिती देते होते. क्रिकेटमधील एका युगाचा अस्त झाला... वानखेडे स्टेडियमवर जे घडले ते होते केवळ अभूतपूर्व आणि अविस्मरणीय! गेली २४ वर्षे ज्या "मास्टर'ने आपल्या खेळातून आनंद आणि हसू दिले, त्या "मास्टर'ला अश्रू आवरत नव्हते. जागच्या जागी उभे राहिलेले त्याचे चाहते अंतर्मुख झाले होते... अशा या भावपूर्ण वातावरणात आई-वडिलांसह सामान्य चाहत्यांचे आभार मानल्यानंतर सर्वांत शेवटी खेळपट्टीला केलेला नमस्कार क्रिकेटविश्वाला भावनाविवश करणारा ठरला. "सचिन...सचिन', असा आसमंत दुमदुमणारा जयघोष क्रिकेटच्या दैवतासमोर नतमस्तक होणारा ठरला.
आपल्या लाडक्या सचिनला निरोप देण्यासाठी संपूर्ण स्टेडियम भरलेले होते... सचिनच्या निरोपाचे त्यांना साक्षीदार व्हायचे होते. तो क्षण ज्या वेळी आला तेव्हापासून ते सचिन टीमच्या गाडीतून स्टेडियममधून बाहेर जाईपर्यंत वानखेडेवरील वातावरण अतिशय भारावलेले होते.
सचिनला खेळाडू म्हणून मैदानातून परतताना पाहताना प्रेक्षक जागच्या जागी स्तब्ध झाले होते. कमालीची शांतता स्टेडियममध्ये पसरली होती...काहींच्या डोळ्यांत आसवे होती, तर काहींना हुंदके आवरत नव्हते.
१६ नोव्हेंबर २०१३ हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला.२४ वर्षाच्या क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सचिन रमेश तेंडुलकरच्या कारकिर्दीचा सुखद शेवट झाला. ज्या स्टेडियमवर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण साजरे झाले त्याच वानखेडे स्टेडियमवर सचिन समस्त क्रिकेटचाहत्यांना अलविदा केला .क्रिकेटच एक पर्व संपल.सचिन तुझ्या डोल्यातले अश्रू.मैदानातील खेळपट्टीला केलेला नमस्कार.तुच नाही सगळा भारत भावूक झालाय.तुझी 200वी कसोटी व अखेरची कसोटी.तुझ्या त्या अखेरच्या ७४ धावा. भारताने मिळवलेला मोठा विजय.आणि तुला दिलेला हा भावपूर्ण निरोप.सगळ सगळ स्मरनात राहील.
लगेचच आपल्या सचिनला 'भारतरत्न' सरकारने नागरी सन्मान पुरस्कार जाहीर केला. 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार पटकावणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण भारतीय आहे. कोट्यवधी भारतीयांची 'इच्छापूर्ती' करणाऱ्या या घोषणेनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे.
क्रिकेटच्या मैदानावरील जिवंत आख्यायिका ठरलेला सचिन जेव्हा-जेव्हा मैदानात उतरायचा, तेव्हा त्याच्या खात्यावर नवा विक्रम लिहिला जायचा. विक्रमाची ही परंपरा त्याच्या निवृत्तीनंतरही थांबली नाही. सर्वात कमी वयात आणि पहिला 'भारतरत्न' खेळाडू होण्याचा बहुमान पटकावत त्याने ही परंपरा कायम राखली आहे. सचिननेही हा सर्वोच्च पुरस्कार आपल्या आईला अर्पण करीत असल्याचे सांगत, मातृप्रेमाची प्रचिती दिली.
' क्रिकेट हा माझा ऑक्सिजन आहे. गेली २४ वर्ष मी क्रिकेटसोबतच जगलो. त्यामुळे निवृत्ती घेतली असली तरी मी क्रिकेटसोबतच राहणार आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो क्रिकेटशी जोडणार आहे.'. क्रिकेट खेळाला एक खेळाडू म्हणुन दिलेलं योगदान आणि समाजाला एक माणूस म्हणुन दिलेलं योगदान यांची तुलना करणं खरंच कठीण आहे.
'गेली २४ वर्ष तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, विश्वास दाखवला, त्याबद्दल मी अंत:करणापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. बीसीसीआयच्या माध्यमातून तुम्ही मला पाठवलेले असंख्य संदेश मिळाले, माझ्यासाठी हा भावपूर्ण क्षण होता. तुमचं प्रेम आणि विश्वास यामुळेच मी आतापर्यंत माझी सर्वोत्तम कामगिरी करु शकलो आहे,' असं सचिनने आपल्या संदेशात म्हटलं आहे.
काय योगायोग पहा सचिनने क्रिकेट मधून निवृते घेतली आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या चौदा वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
सचिन युगाचा शेवट होताना, माझ्यासारख्या अनेक लोकांच्या क्रिकेट वेडाचा, किंबहुना क्रिकेटच्या व्यसनाचाही शेवट झाला… सचिन धन्यवाद ! २४ वर्षे आम्हाला प्रत्येक परिस्थितीत आनंदी ठेवल्याबद्दल.
सचिन एकटाच खेळपट्टीवर गेला,दोन हात लावून त्याने खेळपट्टीला केलेला नमस्कार,हा तर या निरोपाचा परमोच्च क्षण होता. त्या क्षणापासून पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जाईपर्यंत पाणावलेल्या डोळ्यांनीच सचिनने क्रिकेटला अलविदा केला.
No comments:
Post a Comment