Friday, November 8, 2013

मुलीच्या विक्रीची जाहिरात



  कोणत्याही उत्पादनाच्या जाहिरात केल्याशिवाय विक्री होत नाही.जाहिरात वेगवेगळ्या मध्यमाने केली जाते.साधे फेरीवालेही ओरडुन आपल्या मालाची जाहीरात करीत असतो. आताच्या युगात इंटरनेट वापरुन उत्पादनांची जाहिरात करावी लागते.



   "जितकी जाहिरात जास्त, तितका अधिक व्यवसाय " यासाठीच मालाची जाहिरात करावी लागते.


      विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते. उत्पादनाची जाहिरात ही वर्तमानपत्र-साप्ताहिके-मासिके-अंक, टीव्ही चॅनल्स, होर्डिंग्ज, पत्रके, सवलती किंवा योजना, कार्यक्रमाचे प्रायोजकत्व  घेणे, फ्री सॅम्पल अशा अनेक प्रकारे जाहिरात केली जाते. जाहिरातीने विक्रेते आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे, याचा प्रसार आणि प्रचार केला जातो. 



      मालाची, उत्पादनाची आणि वस्तूंची चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करणे.ग्राहकांना वस्तूंची सविस्तर माहिती देणे.रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिरात तयार करून त्यांचा प्रसार करणे. गॅरंटी, वॉरंटी, सर्व्हिस, संपर्क अशी माध्यमे वापरून ग्राहकांशी संपर्क वाढवून उत्तम सेवा देणे. फ्री सॅम्पल सारख्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करणे. ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे आणि तक्रारींचे निवारण करणे.अशा प्रकारे विक्रीची कला ही प्रत्येक विक्रेत्याला अवगत करावी लागते.



     सब कुछ बिकता है...च्या नावाने विविध माध्यमांवर गाजावाजा करत असलेली 'ओएलएक्स' ही जाहिरातविषयक वेबसाइट सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. आतापर्यंत केवळ विविध वस्तूंच्या जाहिरातींपर्यंत मर्यादित असलेल्या या कंपनीच्या वेबसाइटवर चक्क एका तरुणीचा फोटो टाकून तिच्या विक्रीची जाहिरात टाकण्यात आल्याने, मोठी खळबळ उडाली आहे.


    मार्केटिंगच्या जमान्यात लोक काय शक्कल काढतील याचा नेम नाही .अश्याच ए टु झेड उत्पादने ऑनलाइन विकणार्‍या ओएलएक्स 'OLX' या जाहिरातविषयक वेबसाइट सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.  एका अज्ञात व्यक्तीने या वेबसाइटवर एका तरुणीचा फोटो टाकून, दोन हजार रुपयांमध्ये विक्री करायची असल्याचा मजकूर टाकला. अशा प्रकारच्या जाहिरात करणार्‍या साइटवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. 



      जाहिरातीने प्रभावित होऊन लोकांनी उत्पादित वस्तू किंवा सेवा घ्यावी,हा जाहिरातीमागे उद्देश असतो.म्हणुन का एका मुलीची जाहिरात करावी.वेबसाईट काय करते?त्याचे जाहीरतींवर निंयत्रण नाही का?.उद्या एकादा सरकारी वास्तुही विकण्यास मांडेल.शक्यता नाकरता येत नाही.या मुलीच्या जाहीरातीमागे कोणता उद्देश आहे?त्या मुलीची बदनामी करण्याचा की नुसता टाईमपास करण्याचा? मुलीची बदनामी तर झालीच.   पण ज्यानी नुसता टाईमपास केला असेल त्यानी त्या मुलीला आयुष्यातून उठविले आहे.उत्पादक आपल्या मालाची जोरदार जाहिरात करून ती खपवू शकतात.पण मुलगी ही काय वस्तू आहे तीची विक्री करायला?

         फार पूर्वीपासून सिनेमातून मुलींची विक्री होताना दाखविले जाते.मुलीला दाखवून पैसे घेऊन जाणारे दलाल पाहिलेले आहेत.तसेच काही गांवातून गरीब कुटुंब मुलीना काही पैशात विकल्याचे वाचले होते.पण ह्या जाहीरातीने तर खुलेआम मुलींचा बाजार मांडण्यास सुरुवात केलेली दिसते.जसे काय याला सरकारी मान्यताही मिळाली असल्या सारखे हा प्रकार केला गेला आहे. 


              अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असला तरीही वेश्या व्यवसायासाठी मुलीची विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याच्या बातम्या वाचण्यात येतात.भारतामध्ये महिलांची , मुलींची विक्री आजही होत असते. त्यामुळे अशा विक्री केलेल्या व्यक्ती लैंगिक कृत्यांसाठीच नव्हे , तर अन्य कामासाठी वापरल्या जातात. त्या व्यक्तींना शरीरातील अवयवांसाठी किंवा वेठबिगार म्हणून वापरले जाते. अशा वेळी या व्यक्तींना नोकरी देणारा , त्यांची वाहतूक करणारा , त्यांना लपविणाणा-यांना  शिक्षा देण्यात येते.
                





No comments: