मोबाईल कोणाकडे नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधणे तसे कठीण आहे.पण मिळाले आहे.
कोणाकडे मोबाईल नाही असे कोणी दिसत नाही.जवळजवळ सगळ्याकडे मोबाईल आला आहे.मोबाईलसाठी गरीब श्रींमत हा भेदभाव नाही.फक्त त्या मोबाईलच्या प्रकारात व किंमतीत फरक असेल. मोबाईल ही गरजेची वस्तू झाल्यापासून विद्यार्थ्यीपासून वृध्दांकडे मोबाईल असतो.मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू नसून एक गरज झाली आहे. भारतासारख्या
विकसनशील देशातसुद्धा जवळपास सगळ्यांकडे मोबाईल फोन असल्याचं आपल्याला
आढळून येतं. अनेकांकडे तर दोन मोबाईल फोनसुद्धा असतात. पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडे मोबाइल फोन नसल्याची बातमी प्रसिध्द झाली.पंतप्रधानांनाकडे मोबाईलच नाही, असे कोणी सांगितले तर पटेल का? पण हे सत्य आहे. सगळ्याकडे मोबाईल असतो व ते वापरतात.पण आपले देशाचे पंतप्रधान मोबाईल वापरत नाही ह्यावर विश्वास बसत नाही.
जगातील नेत्यांचे फोन टॅप केले जातात या कारणामुळे ते बहुतेक मोबाईल फोन वापरत नसतील.तसेच पंतप्रधान मोबाईल का वापरत नाहीत याची बरीच कारणे असतील.मोबाईल फोन हे नव्या जमान्यातील संपर्काचे आधुनिक व आवश्यक साधन आहे यात शंकाच नाही. मोबाईल फोनमुळे संपर्काबरोबरच इतरही अनेक गोष्टी साध्य होत आहेत व माणसाचे आयुष्य अधिकाधिक सुखकर होण्यास हातभार लागत आहे.
आजच्या जमान्यात मोबाईलशिवाय जगणे जवळपास अशक्य झाले असून तरुण पिढीसाठी तर मोबाईल हे व्यसन झाले आहे. मोबाईल भाजी विक्रेत्यापासून ते कॉर्पोरेट कंपन्यातील व्यक्तीकडे दिसतो. कारण मोबाईलचे महत्व हे वेळेनुसार विविध क्षेत्रात बदलत गेले आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईल ही मुलभूत गरज वाटू लागली आहे.
अलिकडच्या काळात मोबाईल बाळगणे ही अतिशय कॉमन बाब झाली आहे. एखाद्याकडे
मोबाईल नाही म्हटल्यावर लोकं डोळे विस्फारुन पाहतात. मोबाईलमुळे लोकांची
लाईफ स्टाईल बदलली. आधी केवळ बोलण्यासाठीच वापरण्यात येणारा मोबाईल आता
'स्मार्ट' झाला आहे.
हल्ली स्मार्ट मडंळी तर किंमती मोबाईल वापरत आहेत.तसेच ही मंडळी ती स्मार्ट मोबाईल वापरत आपले स्टेटस उंचावतात.इंटरनेट चा उपयोग करण्यासाठी, पाहण्यासाठी मोबाईल फोनचा वापर दिवसागणिक अधिकाधिक होत चालला आहे.खास करुन आता अधुनिक मोबाईल बाजारात येऊ लागले आहेत आणि 3G नेटवर्क सुद्धा सर्वत्र पसरवत ग्राहकांना भुलवत आहेत. तंत्रज्ञानातल्या या अभूतपूर्व प्रगतीमुळे मोबाईल फोनचा उपयोग आपण केवळ
दुसर्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी न करता इतर अनेक प्रकारे सर्रास
केला जात असल्याचं आपल्याला आढळतं.
मोबाईल गरज बनली आहे हे पूर्वी मोबाईलला विरोध करणारेही आता कबूल करू लागले आहेत. मोबाईल दिनक्रमाचा भाग बनला हेच कळत नाही. नंतर तो आपल्या पकडीतून सुटत नाही की आपण त्याचा, हा प्रश्न आजूबाजूला पाहिले की पडतो. तसे पाहिले तर मोबाईल संपर्काचे साधन! परंतु मोबाईलमुळे संवाद कमी झाला आहे, अशीही ओरड सुरू झाली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते.
दहा बारा वर्षांपूर्वी चैनीची आणि प्रतिष्ठेची वस्तू म्हणून समजला जाणारा मोबाईल फोन आता घड्याळ आणि हातरूमालाइतकाच आवश्यक झाला आहे. वेळ देणे, वेळ पाळणे आणि वेळ वाचविणे ही जीवनशैली असणार्या आधुनिक युगात मोबाईल फोन हे मोठेच वरदान ठरले आहे.
मोबाईल फोन म्हणजे जणू माणसाची सावलीच बनला आहे.तुम्ही जिथ-जिथं जाता.तिथं तिथं तो तुमच्या सोबत असतो.आज मोबाईल शिवाय जीवन अशक्य होवून बसलं आहे.मोबाईल जवळ नसेल तर तुम्ही आम्ही बेचैन होतो. मोबाईल घरी विसरला तर चूकल्या चुकल्या सारखं वाटतं.मोबाईल जवळ असेल तर आवघं जग मुठीत असल्या सारखं वाटतं.
मोबाईल प्रेम प्रचंड वाढत चालले आहे.दहशतवाद्यापासून ते भिका-यापर्यत सर्वच मंडळी मोबाईल वापरु लागले आहे.
आम जनता आपल्या रोजच्या व्यवहारात मोबाईल वापरत आहे.यामुळेच आपल्या पंतप्रधानानी मोबाईल वापरावे असे आपल्याला वाटते.

No comments:
Post a Comment