Friday, October 25, 2013

आरशातले प्रतिबिंब


  प्रत्येकजण रोजच स्वत:ला आरशात पाहतो.आपल्यात होणा-या बदलाची नोंद घेत असतो.होणा-या       बदलाची माहीती तुम्हाला फक्त आरसाच देऊ शकतो. 

  काचेला एका बाजूने मुलामा चढवून बनलेले आरसे . खोटी प्रतिमा कधी दाखवती नाहीत.ख-याचे खोटे कधी करीत नाहीत. सुंदरतेला सुंदरता तर कुरुपतेला कुरुपता,पण उलटे कधी होणे नाही.  कितीही खोटे केलेत तरी आरसासमोर कघी ते लपणार नाही.


       चेहरा हा खर्‍या अर्थाने मनाचा आरसा तर आरसाच जणू मानवाचा चेहरा
          मनातल्या गोष्टी दिसतात चेह-यावर तर चेह-यावरच्या मनात सुरु असतात.
          आरशात माणसाचे जे प्रतिबिंब दिसते,तोच माणसाचा आत्मा असतो.


      स्वःतालाच आरशात पाहून,आज मी स्वताःच घाबरतो..
          भूतकाळातल्या चुकांना,अलगद सर्वारतो...
           कधी कधी हसतो,कधी कधी रडतो...
             तर कधी कधी ,स्वःतालाच पाहून बडबडतो...
              अन भूतकाळातल्या चुका,आज मी वर्तमानात पाहतो...


          आरशात फार पाहतो मी आणि ते मला आवडते, कारण या एकाच ठिकाणी माझी नजर माझ्याच नजरेशी भिडते.



         मी आहे एक आरसा,
           दाखवतो तुम्हाला तुमचे बाह्य प्रतिबिंब, बाह्य स्वरुप.
           सुंदर चेहर्यांना मी फार आवड्तो,म्हणुण उभे राह्तात माझ्या समोर आपले रुप न्याहाळत तासन तास.
             कुरुप चेहर्यांना मी अजिबात आवड्त नाही,म्हणुण तिरास्कार करतात माझा.
               पण तुम्हीच सांगा,कामच आहे माझे ते, तुम्ही आहत तसे दाखवन्याचे.





   आरशाला बदलून प्रतिबिंब बदलत नाही.आपले प्रतिबिंब चांगले दिसण्यासाठी आपल्यातच योग्य तो बदल करावा लागेल.

    आरशातल्या प्रत्येक बघण्यातनं आपल्याला स्वतःचा चेहरा पुरता ओळखीचा होतो.हा चेहरा पाहिल्याक्षणी आपण म्हणू शकतो,हा मी आहे.ही ओळख पटवून देण्याची शक्ती छायाचित्राकडं नाही,ती फक्त आरशाकडं आहे.आपण आरशात पाहतो त्यावेळी आपल्याला काय दिसतं? उत्तर खूप सोपं आहे, आपलं प्रतिबिंब दिसतं. अगदी लहानपणी कधीतरी, स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नव्हतं तेव्हा पहिल्यांदा पाहिलेलं आणि हळूहळू आपल्या परिचयाचं होत गेलेलं, आपलं प्रतिबिंब.



    पारा उडलेल्या आरशामधुन मागील रंग उडालेली भिंत दिसते.पण तरीही मी आरशात पाहतो.पारा उडालेला भाग सोडुन इतर भागात दिसणारं माझं प्रतिबिंब न्याहळतो.  




     'मी कशाला आरशात पाहू गं..' असं म्हणत 'आपण रूपाची राणी' असल्याचं बहुतेक महिला म्हणत असल्या  तरी त्या आरशासमोर उभ्या राहील्याशिवाय राहणार नाहीत.मिळेल तिथं आपला चेहरा न्याहाळण्याची तेथील स्त्रियांना जणू सवयच आहे. दुकानांतील आरशांत, विंडो शॉपिंग करताना तेथील काचेत, मोटारींच्या आरशात आणि चक्क समोरच्या व्यक्तीच्या सनग्लासेसमध्ये स्वत:चं प्रतिबिंब त्या पाहतात.आरश्यात महिंलाशिवाय जास्त कोणीच पाहत नाही.आरसा ही त्यांच्या जीवनातील एक जवळची वस्तू असल्याने त्या कायम आपल्याजवळ आरसा ठेवतात.प्रत्येक महिला ही सुंदर दिसण्याचाच प्रयत्न करीत असते.त्यामुळं तीचे आरशात पाहणं अस्वाभाविक असते. आपण सुंदर आहोत ही भावना तिच्यात निर्माण झाली, की त्यांचा आत्मविश्वासही वाढतो...' यासाठीच त्या आरशाला खुप जपतात. लेणीत एके ठिकाणी आरशात पाहून शृंगार करणार्‍या तरुणीचे चित्र कोरलेले आहे.


      आरशातले आपले दिसणारे प्रतिबिंब असते.ते काही निर्माण झालेले नाही,केवळ आरसा कारणीभूत झाला आणि आपले मूळबिंब आपण पाहतो इतकेच. 


      काहीना राग आला की ती मंडळी आरशावर राग काढतात.आरसा कसा काय आपल्याला सुंदर दाखवणार?तुम्ही जसे असाल तसेच तो दाखवणार.त्याचा काय दोष असतो? 


       जंगलात एको माकडाला आरसा मिळाला. त्यात डोकावताच त्याला प्रतिबिंब दिसले हे दुसरे माकड आपले प्रतिस्पर्धी म्हणून आले आहे, असे त्याला वाटले. त्याने दात विचकताच त्यानेही विचकले. याने आक्रमक पवित्रा घेताच त्यानेही घेतला  हा आरशावर धावला. तोसुध्दा धावत आपल्याकडेच येतो आहे असे त्याला दिसले. याने हात उगारताच  त्यानेही उगारला. याने थप्पड मारली. त्याक्षणी आरसा फुटून गेला. हे माकड गोंधळले. प्रतिस्पर्धी  एकदम नाहिसा झाल्याने बावचळला पण आंनदीही झाला.



          आरसा नसता, तर माणसाला स्वत:ची ओळख ठरवण्यामध्ये केवढी मोठी अडचण आली असती,  चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.चेहरा तुमच्या सौंदर्यांचा आरसा असतो.



          चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

No comments: