Friday, October 18, 2013

निर्णय घेणे



     यश मिळविण्या साठी नेमका निर्णय नेमक्या वेळी घेणे महत्वाचे असते.निर्णय घेतल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो.


   निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर नेहमीच येते.काही क्षुल्लक असतात तर काही महत्त्वाचे. मग आपल्या मनात एक निर्णयप्रक्रिया सुरू होते.खुपवेळा टोकाचे निर्णय घेण्याची वेळ येते.निर्णय घेतल्यानतंर क्रिया घडते.


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही निर्णय घ्यावेच लागत असतात त्या वेळी चुकीचे निर्णय घातक ठरू शकतात, मन:स्ताप देऊ शकतात अशी वेळ येऊ न देता उज्वल भवितव्यासाठी अचूक निर्णय घ्यावे लागतात.
  
   बहुतेक वेळा एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा निर्णय घेणे तुलनेने सोपे जाते; पण ज्या प्रसंगी फक्त दोनच पर्याय उपलब्ध असतात ... आपली कार्यक्षमता किती टिकू शकते, याचा नीट विचार करावा व त्यानुसार निर्णय घ्यावा.

   व्यक्तीच्या मनात निर्णय घेण्याची प्रक्रिया त्याच्याही नकळत घडून येत असते. दैनंदिन आयुष्यातील नित्याचे  कित्येक निर्णय हे माणसाचे मन घेत असते व त्याला आपण हा निर्णय घेतला हे कळतही नाही.  निर्णय हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. वेळोवेळी आपण किंवा आपल्याशी संबंधित इतर लोकांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच आपले जीवन हे वर्तमानस्थितीत आहे तसे असते.


  निर्णय का घ्यावे लागतात याची अनेक कारणे आहेत.वैयक्तिक हितासाठी आपण काही निर्णय घेत असतो. सामाजिक हितासाठीही काही वेळेस निर्णय घ्यावे लागतात. समाजाचे व्यापक हित साधले जात असेल तर काही लोक वैयक्तिक सुखाचा त्याग करतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते. देशहितासाठी, समाजहितासाठी अनेक वेळा देशातील प्रमुख व्यक्तींना कठोर निर्णय घ्यावे लागतात.  


  व्यक्तीनुसार निर्णय घेण्याच्या पद्धती बदलत असतात. व्यक्तीचा अनुभव,स्वभाव, संस्कार, शिक्षण, दृष्टीकोन इत्यादी गोष्टी त्याची विचार आणि निर्णय घेण्याची पद्धत ठरवत असतात. परिस्थिती आणि गरजेनुसारही निर्णय घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. निर्णय घेतल्याने त्या निर्णयाची क्षमता पाहणे देखील आवश्यक आहे. कारण या लोकांमध्ये असते प्रचंड निर्णयक्षमता. समाजाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या लोकांमध्ये तर या गुणाची नितांत आवश्यकता असते.

   निर्णयक्षमता प्रत्येकात कमी-जास्त प्रमाणात असते. काहींना स्वतः बद्दलचेच नाही तर इतरांबद्दलाचेही निर्णय घ्यायला आवडते. तर काहींना जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णयच घेता येत नाही. काही लोक निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करतात. तर काही एक घाव दोन तुकडे असे ताबडतोब निर्णय घेतात.  व्यक्तीच्या निर्णयक्षमतेला विविध घटक प्रभावित करीत असतात. त्या घटकांचा आणि त्यांचा या क्षमतेवर परिणाम होत असतो.


  व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर पुर्वानुभव, दृष्टीकोन, स्वभाव, संस्कृती, शिक्षण, त्याची बांधिलकी, सामाजिक-आर्थिक स्तर, व्यक्तिगत मतमतांतरे इत्यादी अनेक गोष्टीचा परिणाम होत असतो. कुठलाही निर्णय घेताना व्यक्ती पुर्वानुभवाचा विचार करते. त्या बाबतीतला पुर्वानुभव चांगला असेल, व्यक्तीचा एखाद्या क्षेत्रातील अनुभव जितका अधिक तितकी त्याची त्या क्षेत्रातील निर्णयक्षमता वाढते असा सर्वसाधारण नियम आहे. 


  कुठलाही निर्णय घेतल्यावर त्याचा परिणाम काय होईल हे जसं आपण सांगू शकत नाही तसंच परिस्थितीने आपल्यावर लादलेल्या निर्णयाचा परिणाम देखील काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही.चुकीच्या निर्णयाचे परिणाम प्रदीर्घ काळ आम आदमीला भोगावे लागतात.याचा विचार निर्णय घेणा-यानी केला पाहिजे.   त्याच्या निर्णयाचे जे काही परिणाम असतील तेही भोगायची त्याची तयारी असली पाहिजे.त्यामुळे मला परिस्थितीला तोंड देताना,झगडताना वाईट वाटणार नाही की जेव्हा मला संधी होती तेव्हा मी काहीच केलं नाही.याची त्याला खंत राहील.निर्णयाचे चांगले वाईट परिणाम सामान्यांवर होत असतात.त्या निर्णयांचा फायदा आणि तोटादेखील होतो. निर्णयाच्या बाबतीत लोकांमध्ये सकारात्मक जागृती केली तर त्याचा फायदा सर्वाना होतो.पण जर त्या निर्णयाचा गैरवापर केला गेला तर सर्वाना तोटा देखील होतोच.

No comments: