दारू पिणे हे आजकाल फँशन व प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे त्यामुळेच चांगल्या मनोवृतीला मागास म्हणून हिणवण्यात येते. तसेच सरकारला या माध्यमातून कर रुपाने मोठा पैसा मिळतो त्यामुळे कोणी काही बोलत नाही.पण ही परिस्थिती भयावह आहे.
भारतात मद्य पिण्याचा परवाना वयाची १८ वर्षे ओलांडल्यानंतर दिला जात असला तरी १४ वर्षे वयोगटापर्यंतची बहुसंख्य मुले या व्यसनाच्या आहारी गेली आहेत. ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये त्यांचे दारू पिण्याचे प्रमाण तिप्पट होते.वेगवेगळा आनंद साजरा करण्यासाठी दारूचा आधार घेतला जातो.दारु पिण्यासाठी कारणे शोधली जातात.मित्राची वाढदिवसाची पार्टी असो की, एखादी हुल्लड रात्र ‘गाजवायची’ असो किंवा कॉलेजचा सेंडॉफ…‘बूझिंग तो बनता है बॉस’ अशी आजकालच्या तरुणांची मानसिकता झाली आहे. केवळ आता मद्यानंदासाठी एखादं निमित्त शोधताना महाविद्यालयीन तरुण दिसतायेत. मोठ्या प्रमाणात तरुणाई या व्यसनाच्या आहारी जात आहे.
कोवळी मुलं मुली दारुच्या आहारी का जात आहेत असा प्रश्न निर्माण होतो. आजच्या आधुनिक समाजात दारु पिणं ही फॅशन बनलीय? की बदलत्या जीवनशैलीमुळे ही पिढी ताणतणावाला नशेत बुडवू पहातेय? कोवळ्या मनावर दारुनं अशी काय मोहिनी घातली?
भारतातील तरुण पिढी दारुच्या आहारी गेली आहे,असे वाक्य कधी तरी आपल्या कानावर पडते.आता तर तरुणांप्रमाणे तरुणींनाही दारुचे व्यसन जडले आहे.परंतु,ही संस्कृती काही आपल्या देशातील नाही.
भारतातील तरुण पिढी दारुच्या आहारी गेली आहे,असे वाक्य कधी तरी आपल्या कानावर पडते.आता तर तरुणांप्रमाणे तरुणींनाही दारुचे व्यसन जडले आहे.परंतु,ही संस्कृती काही आपल्या देशातील नाही.
कधी बिअरच्या फेसात तर कधी दारुतल्या बुडबुड्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न आजची युवा पिढी करत आहेत. सगळा ताण-तणाव नशेत बुडवून टाकण्याचा प्रयत्न तरुणाईकडून केला जातोय. तर कधी फॅशन, कल्चर,ट्रेंडच्या नावाखाली दारुचे पेग रिचवले जातात. या सगळ्या मागचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.आजच्या युवा पिढीचं हे वास्तव असून त्याकडं दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
सिगारेट,दारू, तंबाखूचं व्यसन वयाच्या तिशीनंतरच केलं जातं , असा जो समज आपल्याकडे आहे , तो अगदी चुकीचा आहे.अगदी बारा ते सतरा वर्षांची मुलंही तंबाखू,दारू,सिगारेटच्या व्यसनात गुरफटलेली दिसून येतात. भूक, राग, एकटेपणा आणि थकवा हे चारही दारूकडे नेणारे धोक्याचे सिग्नल आहेत.
आता कुटुंबाचा आकार छोटा असतो.आई - वडील दोघेही नोकरी करणारे असतात.काही जोडप्यांच्या कामाच्या वेळा निरनिराळ्या असतात.अशा घरातला कर्ता पुरुष दारूकडे व सिगारेटच्या व्यसनात गुरफटलेला असतो.घरातलीमुलं हे सारं पाहत असतात.ऑफिसमधून आल्यावर वडील बीअर घेत असतील,जेवणानंतर सिगारेट ओढतअसतील,तर मुलांकडून निश्चितच त्याचं अनुकरण केलं जातं.घरात चालणाऱ्या पार्ट्या,सोशल ड्रिकिंग याचं आकर्षण मुलांच्या मनात आपोआप रुजतं. टेन्शन येतं म्हणून वडील दारू पितात,टेन्शन-फ्री होण्यासाठी किंवा सहज रोजचे रुटिन म्हणून सिगारेट ओढतात,हे पाहिलेला मुलगा जेव्हा मोठा होतो,तेव्हा त्याला आलेले टेन्शन घालविण्यासाठी तो आपोआप सिगारेट किंवा दारूकडे वळतो .
आपली मुलं व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत,असं वाटत असणाऱ्या प्रत्येक पालकानं हे लक्षात घ्यायला हवं , की त्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे.व्यसनी पालकांची मुलेच व्यसनात गुरफटलेली असतात, असे नाही. ज्यांच्या पालकांना अजिबात व्यसनं नाहीत,आई संपूर्ण वेळ घरातच आहे अशा पालकांची मुलंही सिगारेट किंवा ड्रग्जसारख्या व्यसनांत अडकलेली असतात.याचं मुख्य कारण म्हणजे मुलांच्यात आणि पालकांच्यात संवाद नसतो. दिवसभरात त्यांच्यात बोलणंच होत नाही.अनेकदा आम्ही कौन्सिलिंगच्या वेळी मुलांना आणि पालकांना विचारतो , की तुम्ही एकमेकांसोबत रात्रीतरी जेवता का? या प्रश्नाचं उत्तर बहुसंख्य लोक नकारार्थी देतात.अनेकांची जेवणं टीव्ही समोरच संवादाविना पार पडतात.
सध्या नोकरी उद्योगात असणाऱ्या तरुण वर्गाने त्यांच्या एंजॉयमेंटची व्यसनांशी सांगड घातली आहे.आठवडाभर खूप काम केल्यावर इतकी एंजॉयमेंट तर हवीच,असं त्यांचं म्हणणं असतं;पण ही एंजॉयमेंट त्यांच्या आरोग्यासाठी घातक असते,याचा त्यांना विसर पडलेला असतो.यात मुलीही अजिबात मागे नाहीत.अजूनही त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे,पण ते वेगाने वाढते आहे.
दारू पिणं, दारू पिऊन टल्ली होणं हे तरुण मुलांमध्ये मर्दानगीचं लक्षण मानलं जातं. मुलांच्या मांडीला मांडी लावून बसून दारू पिणं याला मुलीही स्टेटस सिंबॉल जपणं म्हणतात.आजच्या तरुण पिढीला दारुच्या व्यसनाने आजगरी विळखा घालण्यास सुरुवात केली असून हळूहळू ही पिढी व्यसनाच्या खाईत ढकलली जात आहे.
दारु ही शरीराला अपायकारक असल्याचा संदेश शहरापासून खेड्यापर्यंत पहायला मिळतो. बार,पब आणि डिस्कोमध्ये प्रवेश दिला जाण-या व्यक्तीच्या वयासंदर्भात सूचनाही लिहिलेली असते.पण हे सगळं काही केवळ त्या सूचना फलका पुरतंच मर्यादीत असतं. महानगरांमध्ये ८१ टक्के मुलांनी वयाची १८ वर्ष पूर्ण होण्या आधीच दारुची चव चखलीय. तर मुलींमध्ये हेच प्रमाण ६० टक्के इतकं आहे...कुणी ताणतणावाच्या नावाखाली तर कुणी फॅशन म्हणून दारुचा ग्लास ओठाला लावतो...आणि त्यामुळेच युवा पिढी दारुच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता निर्माण झालीय.
आयुष्यात पुढे जाण्याचा चढाओढीत तुमचा मुलगा किंवा मुलगी चूकीच्या मार्गावर तर जात नाही ? याकडं लक्ष देण्याची आज प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे.
बर-याच वेळा व्यसन,अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामागे नैराश्य हे कारण असते.पण अशा वेळी हार मानता कामा नये.कारण प्रत्येक गोष्टींसाठी उपाय असतो.व्यसन कोणतेही असो.दारु,कोकेन,हेरोइन,पण आपण प्रयत्न केले तर आपण व्यसनातुन नक्कीच मुक्त होऊ शकता.
बर-याच वेळा व्यसन,अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामागे नैराश्य हे कारण असते.पण अशा वेळी हार मानता कामा नये.कारण प्रत्येक गोष्टींसाठी उपाय असतो.व्यसन कोणतेही असो.दारु,कोकेन,हेरोइन,पण आपण प्रयत्न केले तर आपण व्यसनातुन नक्कीच मुक्त होऊ शकता.
दरवर्षी ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये तरुणाईचे दारू पिण्याचे प्रमाण वाढत आहे.वेगवेगळा आनंद साजरा करण्यासाठी दारूचा आधार घेतला जात आहे .नशेशिवाय आनंद साजरा करायला दुसरे पर्याय शिल्लक राहीले नाहीत का?तरुण वर्गाने त्यांच्या आनंदाची व्यसनांशी सांगड घातली पाहिजे का? ह्या पिढीला व्यसनाच्या खाईत जाण्याअगोदर शुध्दी आणावे लागेल.सरकार महसुल जमा करण्यात गुंतल्याने त्यांना तरुणाईकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
No comments:
Post a Comment